Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Child Mortality : महाराष्ट्रात बालमृत्यूचे प्रमाण घटले तरीही दररोज 35 बालकांचा होतोय मृत्यू

गेल्या काही वर्षांत बालमृत्यूंच्या संख्येत घट झाली आहे. ती आणखी कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. प्रत्येक बालमृत्यूचे परीक्षण करण्यासाठी विविध समित्या कार्यरत आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 06, 2026 | 08:24 AM
चिंताजनक ! राज्यात मुलींचा जन्मदर पुन्हा घटला; सेक्स रेशो 912 वरून 897 वर

चिंताजनक ! राज्यात मुलींचा जन्मदर पुन्हा घटला; सेक्स रेशो 912 वरून 897 वर

Follow Us
Follow Us:

मुंबई : बालमृत्यू हा एक अद्याप न सुटलेला प्रश्नच आहे. बालमृत्यू रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग सातत्याने विविध योजना राबवत आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांमध्ये बालमृत्यूचे प्रमाण घटत असले, तरी आव्हान कायम आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, २०२५-२६ या वर्षात राज्यात १२७९२ बालमृत्यू नोंदविले गेले. दररोज सरासरी ३५ मुलांचा मृत्यू होत असल्याचे चित्र समोर आले आहे. पाच वर्षांपूर्वी ही संख्या ४५ इतकी नोंदवली जात होती.

आरोग्यसेवा विभागाचे संयुक्त संचालक डॉ. संदीप सांगळे म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांत बालमृत्यूंच्या संख्येत घट झाली आहे. ती आणखी कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. प्रत्येक बालमृत्यूचे परीक्षण करण्यासाठी विविध समित्या कार्यरत आहेत. महिला व बालविकास विभागासोबत समन्वय साधून महिलांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित केले जाते; कारण मुलांचे आरोग्य हे मातांच्या आरोग्यावर अवलंबून असते. लसीकरण पथकेही तळागाळात काम करून एकही मूल लसीकरणापासून वंचित राहू नये, याची काळजी घेत आहेत.’

काय आहेत बालमृत्यूची कारणे?

अकाली जन्म, जन्मतः कमी वजन, जन्मावेळी श्वास न लागणे (बर्थ ॲस्फिक्सिया), श्वसनावरील ताण, न्यूमोनिया, सेप्सिस, जन्मजात विकृती आणि आकस्मिक मृत्यू ही बालमृत्यूंची प्रमुख कारणे आहेत.

बालमृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न सुरु

बालमृत्यू रोखण्यासाठी महाराष्ट्रातील पाच आदिवासी भागातील जिल्हयांमध्ये लसीकरण करण्याचा निर्णय यापूर्वी सिद्धीविनाययक गणपती मंदिर न्यास विश्वस्तांनी घेतला आहे. आदिवासी बांधवाबाबत आरोग्य योजनांबाबत माहिती दिली गेली. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील आदिवासी बांधव आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून शासन पाऊले उचलत आहे ही बाब निदर्शनास आणली. या सर्व परिस्थितीत शासनाला मदत केली जावी या हेतूने सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाकडून पुढाकार घेण्यात आला आहे.

कुपोषणामुळेही होत आहेत मृत्यू

दुसरीकडे, कुपोषणामुळे मेळघाट परिसरात लहान मुलांच्या मृत्यूच्या घटना अद्यापही थांबलेल्या नाहीत. चिखलदरा आणि धारणी परिसरात काही बालकांचा यापूर्वी मृत्यू झाला असल्याची माहिती दिली गेली. त्यातच आता कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू कुठेतरी थांबायला हवेत, बालमृत्यू रोखण्याला प्रथम प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे निरीक्षण नोंदवत सरकारने यासाठी ठोस पावले उचलायलाच हवीत असे न्यायालयाने एका प्रकरणात म्हटले आहे.

Mahabaleshwar : ‘आपले सरकार’ पोर्टलवर महाबळेश्वरचा उल्लेखच नाही! तक्रार निवारण प्रणालीतील त्रुटींमुळे नागरिक आणि पर्यटक संतप्त

Web Title: Despite a decline in the child mortality rate in maharashtra 35 children are still dying every day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 08:24 AM

Topics:  

  • Child Health
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Nitesh Rane: सुळेंच्या टीकेला राणेंचं प्रत्युत्तर; २०१९च्या राजकारणाची करून दिली आठवण
1

Nitesh Rane: सुळेंच्या टीकेला राणेंचं प्रत्युत्तर; २०१९च्या राजकारणाची करून दिली आठवण

Jalgaon News: अभिमानाचा क्षण! महाराष्ट्राच्या दियानाची वर्ल्ड कपसाठी निवड; साऊथ आफ्रिकेत चमकणार
2

Jalgaon News: अभिमानाचा क्षण! महाराष्ट्राच्या दियानाची वर्ल्ड कपसाठी निवड; साऊथ आफ्रिकेत चमकणार

Beed Marethon Viral Video:  लेकीच्या स्वप्नासाठी आईची अनवाणी झेप! पायात बूट नव्हते, पण मॅरेथॉन जिंकण्याचा जिद्दीचा विक्रम
3

Beed Marethon Viral Video: लेकीच्या स्वप्नासाठी आईची अनवाणी झेप! पायात बूट नव्हते, पण मॅरेथॉन जिंकण्याचा जिद्दीचा विक्रम

Ratnagiri CBSE School News: रोटरी स्कूल वैध की बेकायदेशीर? शिक्षणमंत्र्यांच्या विधानानंतर नवा वाद!
4

Ratnagiri CBSE School News: रोटरी स्कूल वैध की बेकायदेशीर? शिक्षणमंत्र्यांच्या विधानानंतर नवा वाद!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.