Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganesh Naik on Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी पण..; गणेश नाईकांनी आरसा दाखवला

गेल्या काही दिवसांपासून ठाणे आणि परिसरातील नेतृत्वावरून वाद सुरू आहे. आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा वरचष्मा दिसतो की महायुतीतील दोन्ही घटक पक्षांना यश मिळते,

  • By anuradha sagar
Updated On: Aug 16, 2025 | 12:56 PM
Ganesh Naik on Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी पण..; गणेश नाईकांनी आरसा दाखवला
Follow Us
Follow Us:

Ganesh Naik on Eknath Shinde:  “एकनाथ शिंदे यांनाही लॉटरी लागली आणि ते मुख्यमंत्री झाले, पण लॉटरी प्रत्येकाला लागत नाही, ज्यांना ती लागलेली आहे, त्यांनीती योग्यरित्या टिकवली पाहिजे, असा शब्दांत राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. पालघरमधील दुर्वेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजनावेळी ते बोलत होते. पण या वक्तव्यामुळे भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत वाद सुरूच असल्याचे दिसत आहे.

मुंबईत मुसळधार पावसाचा कहर! प्रवासी घरातून बाहेर पडले अन् अडकले, मध्य आणि हार्बर रेल्वेला लेटमार्कचा फटका

गणेश नाईक म्हणाले, ” प्रत्येकाचे नशीब आहे. एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली ही आनंदाची गोष्ट आहे. पण कमावलेलं टिकवता आलं पाहिजे. किती कमवलं यापेक्षा कसं कमवलं आणि किती टिकवलं हे महत्त्वाचं आहे, असा टोला गणेश नाईक यांनी लगावला. गेल्या काही दिवसांपासून गणेश नाईक ठाणे जिल्ह्यासह त्यांच्या मतदारसंघात चांगलेच सक्रिय झाल्याचे दिसत आहेत. गणेश नाईकांचे जनता दरबाराचे ही कौतुक होताना दिसत आहे. पण एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेवरून विरोधकांनीही शिंदे सेनेला डिवचले आहे. या विधानानंतर आता शिंदे काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या काही दिवसांपासून ठाणे आणि परिसरातील नेतृत्वावरून वाद सुरू आहे. आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा वरचष्मा दिसतो की महायुतीतील दोन्ही घटक पक्षांना यश मिळते, यासाठी नेते सज्ज झाले आहेत. मात्र, त्यापूर्वी महायुती नेत्यांमधील फटकेबाजी चर्चेचा विषय ठरत आहे. पालघर-ठाणे जिल्ह्याचे आपण पालकमंत्री असताना शिंदेसह माजी मंत्री विष्णु सावरा आणि खासदार चिंतामण वनगा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सहभागी होत असत, अशी आठवण नाईकांनी करून दिली. त्यानंतर त्यांनी शिंदेंकडे बोट दाखवत म्हटलं की, “प्रत्येकालाच लॉटरी लागत नाही, पण प्रत्येकाने कमावलेलं टिकवता आलं पाहिजे. जनतेची नजर त्या टिकवण्यावरच असते.”

Sanjay Raut News: ज्या दिवशी सत्ता नसेल त्या दिवशी…; संजय राऊतांनी तोफ डागली

गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंमधील जुने वाद

एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील वाद हा नवीन नसून जुना आहे. ठाणे जिल्ह्यातील सत्ता आणि वर्चस्वाची लढाई हे या संघर्षाचे प्रमुख कारण मानले जाते. ठाणे जिल्ह्यातील गावांच्या हद्दी, आर्थिक भार आणि प्रशासनात प्रमुख कोण? या मुद्यांवरून दोघांमध्ये यापूर्वीही अनेकदा वादाच्या ठिणग्या पडल्या आहेत. विधानसभा निवडणुकीनंतरही ठाण्यात सत्ता संघर्ष उफाळला होता. गणेश नाईक यांनी १४ गावांचे नवी मुंबईमध्ये विलिनीकरण हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला होता.

नाईक यांची ‘जनता दरबार’ मोहिम देखील त्यांना सत्ता दाखवण्याचे माध्यम असल्याचे मानले गेले. त्यामुळे वाद अधिकच गडद झाला. यापूर्वी ठाण्यातील एका बैठकीत विविध प्रशासकीय मुद्द्यांवरून आणि अधिकाऱ्यांवरील कारवाईवरून शिंदे–नाईक संघर्ष समोर आला होता.

Web Title: Eknath shinde is a lottery for the chief ministers post ganesh naiks criticism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2025 | 12:56 PM

Topics:  

  • Chief Minister Of Maharashtra
  • Eknath Shinde
  • Ganesh Naik

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी
1

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास
2

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
3

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Nashik Politics: तू मागच्या निवडणुकीत वाचलास, आता वाचणार नाही!; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला आमदारपुत्राकडून धमकी?
4

Nashik Politics: तू मागच्या निवडणुकीत वाचलास, आता वाचणार नाही!; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला आमदारपुत्राकडून धमकी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.