Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्यमंत्रिपदावरून एकमत होत नसतानाच आता एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; संजय शिरसाट म्हणाले…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. याला आता आठवडा होत आहे. तरी नव्या सरकारबाबतचा मुद्दा अजूनही अडकला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 30, 2024 | 07:31 AM
मुख्यमंत्रिपदावरून एकमत होत नसतानाच आता एकनाथ शिंदे घेणार मोठा निर्णय

मुख्यमंत्रिपदावरून एकमत होत नसतानाच आता एकनाथ शिंदे घेणार मोठा निर्णय

Follow Us
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीचा निकालही जाहीर झाला आहे. यामध्ये भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला चांगले यश मिळाले असून, बहुमताचा आकडाही पार केला आहे. या निकालाला आता आठवडा होत आहे. तरी नव्या सरकारबाबतचा मुद्दा अजूनही अडकला आहे. शुक्रवारी मुंबईत होणारी महायुतीची महत्त्वाची बैठक पुढे ढकलून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक साताऱ्यात गेले. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

हेदेखील वाचा : ७ दिवसांत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली नाही तर..; काय सांगतात नियम अन् राज्यपाल कोणता निर्णय घेऊ शकतात? वाचा सविस्तर

शिवसेनेने मुख्यमंत्रिपदावरील आपला दावा सोडला असला तरी गृह आणि अर्थ यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांवर डोळा आहे. ही खाती मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यातच एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील आपल्या मूळ गावी गेले आहेत. त्यावरच शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट म्हणाले, ‘एकनाथ शिंदे यांना कोणताही मोठा निर्णय घ्यायचा असेल तेव्हा ते त्यांच्या मूळ गावी जातात. उद्या संध्याकाळपर्यंत ते मोठा निर्णय घेतील. शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारतील असे मला वाटत नाही’, असे शिरसाट यांनी यापूर्वी म्हटले होते.

त्याचवेळी महायुतीची बैठक 1 डिसेंबरला होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी भाजपचे 2 निरीक्षक मुंबईत येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होऊन मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी सोहळा होऊ शकतो.

गृह आणि अर्थ मंत्रालयावर चर्चा अडकली

शिंदे सरकारमध्ये गृहखाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तर अर्थखाते अजित पवार यांच्याकडे होते. मुख्यमंत्रिपद सोडायचे झाल्यास शिवसेनेने गृह आणि अर्थ मंत्रालयावर दावा केल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, भाजपला गृह आणि अजित पवार यांना अर्थमंत्रालय सोडायचे नाही. एकनाथ सरकारमध्ये गृहखाते उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे होते, असा शिवसेनेचा युक्तिवाद आहे. त्यानुसार शिंदे उपमुख्यमंत्री झाले तर त्यांना गृहमंत्रालय मिळावे.

बिहार पॅटर्न महाराष्ट्रात राबवावा

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला एवढा मोठा विजय मिळाला. त्यामुळे बिहारच्या धर्तीवर तेच मुख्यमंत्री व्हावेत, असे शिवसेनेच्या काही नेत्यांचे म्हणणे आहे. बिहारमध्ये जेडीयूच्या जागा कमी असूनही मुख्यमंत्री नितीशकुमार आहेत. त्याचवेळी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री व्हावे, असे पक्षातील काही नेत्यांचे मत आहे.

भाजप करतंय मराठा नेत्यांचाही विचार 

288 जागांच्या विधानसभेत मराठा समाजाचे आमदार मोठ्या संख्येने असल्यामुळे मुख्यमंत्री निवडण्यात जातीय अंकगणित मोठी भूमिका बजावू शकते, असे मानले जाते. देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत. अशा स्थितीत भाजप नेतृत्वही काही मराठा नेत्यांचा मुख्यमंत्रिपदासाठी विचार करेल, असे म्हटले जात आहे.

हेदेखील वाचा : सत्ताधारी पक्षाला मिळाला निवडणुका जिंकण्याचा नवा प्लॅन; लालची योजना फेका अन् विजय मिळवा

Web Title: Eknath shinde may take big decision soon says sanjay shirsat nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2024 | 07:18 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Sanjay Shirsat

संबंधित बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरील टीका खपवून घेणार नाही; शिवसेना खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांचा जरांगे पाटील यांना इशारा
1

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरील टीका खपवून घेणार नाही; शिवसेना खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांचा जरांगे पाटील यांना इशारा

Eknath Shinde: पालघरमध्ये डॉक्टरांसोबत गैरवर्तन भोवले; शिवसेना पालघर शहर प्रमुख राहुल घरत यांचे निलंबन
2

Eknath Shinde: पालघरमध्ये डॉक्टरांसोबत गैरवर्तन भोवले; शिवसेना पालघर शहर प्रमुख राहुल घरत यांचे निलंबन

Washim News: नागरिकांना दिलासा; रिसोडचा पाणीप्रश्न सुटण्याच्या मार्गावर; ७५ कोटींच्या पाणी योजनेला हिरवा कंदील
3

Washim News: नागरिकांना दिलासा; रिसोडचा पाणीप्रश्न सुटण्याच्या मार्गावर; ७५ कोटींच्या पाणी योजनेला हिरवा कंदील

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ
4

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.