Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव

Mumbai Dahi Handi 2026: मुंबईतील मालाड पश्चिमच्या मालवणी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान दुर्दैवी दुर्घटना घडली. दहीहंडीसाठी दोरी बांधण्यात आलेला विटांचा खांब अचानक कोसळल्याने 7 वर्षीय रुद्र कदम गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने मालवणी जनरल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 05, 2026 | 05:04 PM
उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव (फोटो सौजन्य-ChatGPT)

उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव (फोटो सौजन्य-ChatGPT)

Follow Us
Follow Us:
  • दहीहंडीच्या जल्लोषात काळाचा घाला!
  • मालवणीत विटांचा खांब कोसळून 7 वर्षीय रुद्रचा मृत्यू
  • दहीहंडीची दोरी बांधलेला खांब अचानक कोसळला
Mumbai Dahi Handi 2026: मुंबईत उत्साहात सुरू असलेल्या दहीहंडी उत्सवाला मालाड पश्चिममध्ये एका दुर्दैवी घटनेने गालबोट लागले आहे. मालवणी परिसरात दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न सुरू असताना विटांचा खांब अचानक कोसळल्याने 7 वर्षीय रुद्र कदम याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.(Mumbai Dahi Handi 2026)

नेमकी घटना कशी घडली?

मिळालेल्या माहितीनुसार, 5 सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास मालवणीतील चिकूवाडी परिसरातील एकता वेल्फेअर सोसायटीमध्ये काही मुले स्थानिक पातळीवर दहीहंडी उत्सव साजरा करत होती.

Mumbai Dahi Handi 2026: दहीहंडीच्या जल्लोषात अपघातांची नोंद; मुंबईत 22 गोविंदा जखमी, एकावर उपचार सुरू

दहीहंडी उभारण्यासाठी दोरीचे एक टोक झाडाला, तर दुसरे टोक तळमजल्यावरील विटांच्या खांबाला बांधण्यात आले होते. मुले दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करत असतानाच अचानक हा विटांचा खांब कोसळला.

रुद्रच्या डोक्याला गंभीर दुखापत

खांब कोसळला तेव्हा सात वर्षीय रुद्र कदम जवळच होता. कोसळलेल्या खांबामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दुर्घटना घडताच परिसरातील नागरिकांनी त्याला तातडीने उपचारासाठी मालवणी जनरल हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

पोलीस घटनास्थळी दाखल

या घटनेची माहिती मिळताच संबंधित वॉर्डचे कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दुर्घटना नेमकी कशी घडली आणि दहीहंडी उभारताना आवश्यक सुरक्षिततेची खबरदारी घेण्यात आली होती का, याबाबत पुढील तपास केला जाण्याची शक्यता आहे.

दहीहंडीतील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

या घटनेमुळे दहीहंडी उत्सवातील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. विशेषतः लहान मुले सहभागी असलेल्या स्थानिक दहीहंडी कार्यक्रमांमध्ये हंडी बांधण्यासाठी वापरण्यात येणारे खांब, दोरी आणि इतर संरचना किती मजबूत आहेत, याची खात्री करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मानवी मनोऱ्यांच्या सुरक्षेबरोबरच हंडी उभारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तात्पुरत्या संरचनांची सुरक्षितताही तितकीच महत्त्वाची असल्याचे या दुर्घटनेतून अधोरेखित झाले आहे.

अवघ्या सात वर्षांच्या रुद्रच्या मृत्यूमुळे मालवणी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, उत्सव साजरा करताना सुरक्षेच्या उपाययोजनांकडे कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

Dombivali : नशामुक्ती, नारीशक्तीचा संदेश देत डोंबिवलीत ‘स्वराज्य काला महोत्सवा’चा दहीहंडी थरार; रवींद्र चव्हाणांची प्रमुख उपस्थिती

Web Title: Even year old govinda dies during dahi handi celebration in malad mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 05:04 PM

Topics:  

  • Accident
  • Dahi Handi 2026
  • Mumbai

संबंधित बातम्या

Tiger Shroff: टायगर श्रॉफवरील हल्ल्यामागे कोण? तीन आरोपी १० दिवस पोलीस कोठडीत; शस्त्रपुरवठ्याच्या साखळीचाही तपास
1

Tiger Shroff: टायगर श्रॉफवरील हल्ल्यामागे कोण? तीन आरोपी १० दिवस पोलीस कोठडीत; शस्त्रपुरवठ्याच्या साखळीचाही तपास

Mumbai forest firing: मुंबईच्या वेशीवर चेना जंगलात गोळीबार! एकाचा मृत्यू, दोघे जखमी; मृतदेहावर शवविच्छेदनाविनाच अंत्यसंस्कार?
2

Mumbai forest firing: मुंबईच्या वेशीवर चेना जंगलात गोळीबार! एकाचा मृत्यू, दोघे जखमी; मृतदेहावर शवविच्छेदनाविनाच अंत्यसंस्कार?

BMW Vision CE : स्टँडशिवाय स्वतःच उभी राहणार BMW ची इलेक्ट्रिक बाइक! भारतात पेटंट, काय आहेत खास फीचर्स?
3

BMW Vision CE : स्टँडशिवाय स्वतःच उभी राहणार BMW ची इलेक्ट्रिक बाइक! भारतात पेटंट, काय आहेत खास फीचर्स?

Google Maps चा नाद नको गं बाई! ग्वाल्हेर अपघातानंतर पुन्हा प्रश्न ऐरणीवर; चुकीच्या मार्गाला जबाबदार कोण?
4

Google Maps चा नाद नको गं बाई! ग्वाल्हेर अपघातानंतर पुन्हा प्रश्न ऐरणीवर; चुकीच्या मार्गाला जबाबदार कोण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.