महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारच्या घटना वाढल्या असल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना ताजी असताना मुंबईत देखील अशीच एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मुंबईच्या जोगेश्वरी परिसरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे.
मुंबई जोगेश्वरी भागात 12 वर्षांच्या एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पाच नराधमांनी हा गुन्हा केल्याचे समोर आले आहे. अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी 5 आरोपीना अटक केली आहे. जोगेश्वरी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, ही अल्पवयीन मुलगी आपल्या काकांसोबत राहते. एके दिवशी शाळा सुटल्यानंतर ती बेपत्ता झाली होती. त्यामुळे तिच्या काकांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. दरम्यान ही मुलगी दादर रेल्वे स्थानकात भटकत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तिची विचारपूस केली असटा तिच्यावर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. पीडित मुलीच्या तक्रारीनंतर पोस्को कायद्यानंतर्गत 5 नराधमांना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आले आरोपी एसी मेकॅनिक असल्याचे समजते आहे. शाळा सुटल्यावर मुलगी एकटी असल्याचे पाहून आरोपीतील घेऊन त्यांच्या घरी गेले. त्यानंतर त्या अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने अत्याचार करण्यात आला. पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. सीसीटीव्हीच्या मदतीने पुढील तपास केला जात आहे.
स्वारगेट अत्याचार प्रकरणात समोर आली धक्कादायक माहिती
कोठडीत असलेला आरोपी दत्तात्रय गडेची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. त्यामध्ये अनेक बाबी समोर येत आहेत. चौकशीतून एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा पोलिसांचा गणवेश परिधान करून बस स्थानकाच्या परिसरात वावरत असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.
आरोपीने पोलिसांचा गणवेश परिधान केल्याचा फोटो पोलिसांना मिळाला आहे. त्यामुळे या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. आरोपीच्या मोबाईलचे विश्लेषण पोलिसांनी केले आहे. पुण्यातील शिवाजीनगर , स्वारगेट, शिरूर, अहिल्यानगर, सोलापूर बसस्थानकात वावर असल्याचे समोर आले आहे. तसेच आशा प्रकारचे आणखी काही गुन्हे गाडेने केले असल्याचा संशय पोलिसांना आहे.
पुण्यातील स्वारगेट एसटी बसस्थानकावरील शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या अत्याचारानंतर संबंधित आरोपी हा घटनास्थळावरून पळून गेला होता. अखेर पुणे पोलिसांनी या नराधमला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला कोर्टात हजर करण्यात आले. दरम्यान पुणे कोर्टाने आरोपी दत्ता गाडेला 12 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.