Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Local: ऐन गर्दीच्या वेळी रेल्वेचा खोळंबा; मालगाडीचे कपलिंग तुटले; मुंबईकडे जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक पाऊण तास विस्कळीत

Central Railway News: नेरळ जंक्शनजवळ लोणावळा-कल्याण रिकाम्या मालगाडीचे सीबीसी कपलिंग आणि एअर ब्रेक होस पाईप तुटल्याने गाडीचे १६ डबे रेल्वे फाटकात अडकले. या तांत्रिक बिघाडामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक सुमारे पाऊण तास विस्कळीत झाली असून ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 25, 2026 | 07:11 PM
ऐन गर्दीच्या वेळी रेल्वेचा खोळंबा; मालगाडीचे कपलिंग तुटले; मुंबईकडे जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक पाऊण तास विस्कळीत

ऐन गर्दीच्या वेळी रेल्वेचा खोळंबा; मालगाडीचे कपलिंग तुटले; मुंबईकडे जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक पाऊण तास विस्कळीत

Follow Us
Follow Us:
  • ऐन गर्दीच्या वेळी रेल्वेचा खोळंबा
  • मालगाडीचे कपलिंग तुटले
  • मुंबईकडे जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक पाऊण तास विस्कळीत
Central Railway News: कर्जत तालुक्यातील नेरळ जंक्शनजवळ शनिवारी (25 जुलै 2026) दुपारी रिकाम्या मालगाडीच्या सीबीसी (CBC) कपलिंग आणि एअर ब्रेक होस पाईपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची मुंबईकडे जाणारी वाहतूक सुमारे पाऊण तास विस्कळीत झाली. या घटनेमुळे लोकल रेल्वे सेवा ठप्प झाल्याने ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळ्यावरून कल्याण जंक्शनच्या दिशेने जाणारी रिकामी मालगाडी दुपारी सुमारे ३.४५ वाजता नेरळ स्थानकाजवळ पोहोचली असता तिचे सीबीसी कपलिंग आणि एअर ब्रेक होस पाईप अचानक तुटले. त्यामुळे मालगाडीचे तब्बल १६ डबे नेरळ रेल्वे फाटकाच्या मध्यभागीच अडकले, तर इंजिनासह पुढील भाग नेरळ स्थानकाच्या दिशेने पुढे गेला.

Video : धावत्या लोकलच्या दारात लटकणाऱ्या महिलेचा थरार; पुलाच्या खांबाला साडी अडकली अन्…, रेल्वे सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

या तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे फाटकावरील रस्ते वाहतुकीसह मुंबईकडे जाणारी मुख्य रेल्वे वाहतूकही ठप्प झाली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू केले. सीबीसी कपलिंग आणि एअर ब्रेक होस पाईप दुरुस्त केल्यानंतर सायंकाळी सुमारे ४.३० वाजता मालगाडी पुन्हा मार्गस्थ करण्यात आली.

मात्र या काळात मध्य रेल्वेच्या मुंबईकडे जाणाऱ्या अनेक लोकल गाड्या विविध स्थानकांवर खोळंबून राहिल्या. ऐन गर्दीच्या वेळेत सेवा विस्कळीत झाल्याने हजारो प्रवाशांना उशीर, गर्दी आणि गैरसोयीचा सामना करावा लागला.

या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाच्या देखभाल आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. प्रवाशांनी चिंता व्यक्त करत सांगितले की, हा बिघाड मालगाडीत झाला ही बाब सुदैवाची ठरली. जर अशीच घटना प्रवाशांनी भरलेल्या लोकल गाडीत घडली असती, तर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता आली नसती. त्यामुळे रेल्वेच्या तांत्रिक तपासणी आणि देखभाल व्यवस्थेत अधिक काटेकोरपणा आणण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

Mumbai Local सुरक्षित राहिली का? सीटवरून वाद, लोकलमध्ये कोयत्याने थरार! ठाकुर्लीजवळ प्रवाशावर जीवघेणा हल्ला; तिघे फरार

Web Title: Freight train coupling breaks near neral junction disrupts central railway services

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 07:11 PM

Topics:  

  • central railway
  • Mumbai Local
  • railway

संबंधित बातम्या

Pune Beed Direct Train: पुणे-बीड थेट रेल्वेचा आज शुभारंभ;  किती तासांचा प्रवास,कोणाला होणार फायदा,
1

Pune Beed Direct Train: पुणे-बीड थेट रेल्वेचा आज शुभारंभ; किती तासांचा प्रवास,कोणाला होणार फायदा,

Namo Bharat Recruitment 2026: नमो भारत प्रकल्पात ६७ जागांसाठी भरती; NCRTC मध्ये अर्ज करण्याची सुवर्णसंधी
2

Namo Bharat Recruitment 2026: नमो भारत प्रकल्पात ६७ जागांसाठी भरती; NCRTC मध्ये अर्ज करण्याची सुवर्णसंधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.