Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Beed Direct Train: पुणे-बीड थेट रेल्वेचा आज शुभारंभ; किती तासांचा प्रवास,कोणाला होणार फायदा,

Pune Beed Train: पुणे-बीड रेल्वेला १६ डबे असून, एकावेळी सुमारे दोन हजार प्रवाशांची वाहतूक करण्याची क्षमता असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुण्यात शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायासाठी येणाऱ्या बीड व परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 17, 2026 | 05:45 PM
Pune Beed Train, Pune Beed Direct Train,

Pune Beed Train, Pune Beed Direct Train,

Follow Us
Follow Us:
  • पुणे-बीड बहुप्रतीक्षित थेट रेल्वेसेवेचा गुरुवारी (१७ सप्टेंबर) भव्य शुभारंभ
  • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बीड स्थानकावर दाखवला जाणार हिरवा झेंडा
  • रेल्वे बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर; पुणे ते बीड प्रवास आता ७ तासांत पूर्ण होणार
Pune Beed Direct Train:  पुणे आणि बीडदरम्यान थेट रेल्वेसेवेची प्रवाशांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. पुणे-बीड ही बहुप्रतीक्षित रेल्वेसेवा गुरुवारी (१७ सप्टेंबर) सुरू होत असून, बीड स्थानकावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते नवीन रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून सेवेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यावेळी पुणे रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

रेल्वे बोर्डाने बुधवारी या गाडीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले. या सेवेमुळे पुणे ते बीडदरम्यानचा प्रवास सुमारे सात तासांत पूर्ण करता येणार आहे. दररोज रेल्वेसेवा उपलब्ध असल्याने बीडसह परिसरातील नागरिकांना पुण्याशी थेट रेल्वे जोडणी मिळणार आहे. Indian Railway

‘शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण देताना काय निकष होते?’ सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला सवाल

१६ डब्यांची गाडी :

पुणे-बीड रेल्वेला १६ डबे असून, एकावेळी सुमारे दोन हजार प्रवाशांची वाहतूक करण्याची क्षमता असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुण्यात शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायासाठी येणाऱ्या बीड व परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा हा रेल्वे मार्ग प्रवाशांसाठी महत्त्वाचा पर्याय ठरणार आहे.

या स्थानकांवर थांबा :

पुणे-बीड रेल्वेला उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, श्रीगोंदा रोड, अहिल्यानगर, नारायणडोहो, नवीन आष्टी आणि अमळनेर या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांनाही पुणे आणि बीडदरम्यानच्या थेट रेल्वेसेवेचा लाभ घेता येणार आहे.

असे असेल वेळापत्रक :

पुणे ते बीड (गाडी क्र. ११४३३)
पुण्याहून रात्री १०.४५ वाजता सुटणार असून, दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता बीड येथे पोहोचेल.

बीड ते पुणे (गाडी क्र. ११४३४)
बीडहून रात्री ९.३० वाजता सुटणार असून, दुसऱ्या दिवशी पहाटे ५.२० वाजता पुणे येथे पोहोचेल.

Devendra Fadnavis : मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी फडणवीसांनी दिला शब्द! कृष्णाखोरे आणि

पुणे-बीड रेल्वेसेवा :

दररोज थेट रेल्वेचा पर्याय :
पुणे–बीड : गाडी क्र. ११४३३
पुण्याहून सुटणार : रात्री १०.४५
बीडला पोहोचणार : सकाळी ६.००
बीड–पुणे : गाडी क्र. ११४३४
बीडहून सुटणार : रात्री ९.३०
पुण्यात पोहोचणार : पहाटे ५.२०
महत्त्वाचे थांबे : उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, श्रीगोंदा रोड, अहिल्यानगर, नारायणडोहो, नवीन आष्टी, अमळनेर.
१६ डबे | सुमारे २ हजार प्रवाशांची क्षमता | दररोज सेवा

 

Web Title: Pune newspune beed direct train service inaugurated by sunetra pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 05:45 PM

Topics:  

  • Beed
  • Pune
  • railway
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Chakan Traffic Congestion Solution: चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार! जिल्हाधिकाऱ्यांचे PWD आणि MIDC ला आदेश
1

Chakan Traffic Congestion Solution: चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार! जिल्हाधिकाऱ्यांचे PWD आणि MIDC ला आदेश

बीडकरांचं पुणे कनेक्शन अखेर सुरू! बीड-पुणे रेल्वेला हिरवा झेंडा; सुनेत्रा पवार म्हणाल्या, ‘अजितदादांचा शब्द पाळला’
2

बीडकरांचं पुणे कनेक्शन अखेर सुरू! बीड-पुणे रेल्वेला हिरवा झेंडा; सुनेत्रा पवार म्हणाल्या, ‘अजितदादांचा शब्द पाळला’

Baramati News : बारामतीच्या शाळांसाठी सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय! पुणे जिल्ह्यातील 600 ZP शाळा होणार ‘मॉडेल स्कूल’
3

Baramati News : बारामतीच्या शाळांसाठी सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय! पुणे जिल्ह्यातील 600 ZP शाळा होणार ‘मॉडेल स्कूल’

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी इंदापुरात मोर्चेबांधणी; भरणेवाडीत सहकारातील दिग्गजांची संयुक्त बैठक
4

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी इंदापुरात मोर्चेबांधणी; भरणेवाडीत सहकारातील दिग्गजांची संयुक्त बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.