Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

POP गणेशमूर्तींवर तूर्तास बंदी? मुंबई हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

गणेशोत्सवाआधी मुंबई उच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय घेतला असून यंदाच्या गणेशोत्वात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी नसणार आहे. मात्र सरकारला केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 2020 च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 30, 2024 | 05:35 PM
POP गणेशमूर्तींवर तूर्तास बंदी? मुंबई हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय (फोटो सौजन्य-X )

POP गणेशमूर्तींवर तूर्तास बंदी? मुंबई हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय (फोटो सौजन्य-X )

Follow Us
Close
Follow Us:

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे गणेशोत्सव पर्यावरणपूरक आणि आनंददायी व्हावा याकरिता सर्वत्र ठिकाणी प्रयत्न सुरु आहे. तर दुसरीकडे साल २०२० पासूनच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती बनवण्यास बंदी घातली आहे. असं असताना देखील मागील चार वर्षांत त्याची पूर्ण अंमलबजावणीच झाली नसल्याने आणि अजूनही तशा मूर्ती बनवल्या जात असल्याने मुंबई हायकोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

कोणत्याही पीओपी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करायची नाही, अशी अट सार्वजनिक गणेशोत्सल मंडळांना घाला, असे निर्देश मुंबई उच्च न्यायलयाने मुंबईसह राज्यातील सर्व महापालिकांना दिले आहेत. पीओपी गणेशमूर्तींना बंदीच्या प्रश्नावर हायकोर्टात पुन्हा सुनावणी पाड पडली. यावेळी गणेश मूर्तींकारांना आणि पीओपीने बनलेल्या मूर्तींचा उपयोग करणाऱ्यांना जरब बसेल, अशा स्वरुपाच्या दंडाची तरतूद करणे आवश्यक आहे. जेणेकरुन पुढच्या वेळेपासून पीओपी मूर्तीच बनवण्यात येणार नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने याप्रश्नी योग्य तो धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी सूचना मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्यय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी केला आहे.

दरम्यान राज्य सरकारबरोबरच सर्व महापालिकांना जनहित याचिकेतील मुद्द्यांबाबत प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करण्याचे निर्देश देऊन खंडपीठाने २१ ऑक्टोबर रोजी सुनावणी ठेवली. तसेच त्या सुनावणीनंतर पीओपी मूर्तींवरील बंदीसोबत सीपीसीबीच्या अन्य मार्गदर्शक तत्त्वांचे खऱ्या अर्थाने पालन होण्याबाबत योग्य ते आदेश देण्याचे स्पष्ट संकेतही खंडपीठाने दिले. दरम्यान नागपूर खंडपीठाने २८ ऑगस्ट रोजी याच प्रश्नावर काही निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार, तूर्तास आम्ही त्याप्रमाणेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी आदेश काढत आहोत. राज्य सरकारसह महापालिकांचे प्रतिज्ञापत्रावर उत्तर आल्यानंतर या समस्येचे विश्लेषण करून अंमलबजावणी होण्याकरिता योग्य तो आदेश जारी करू, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

पीओपी गणेशमूर्ती नेमकं प्रकरण काय?

पीओपी बंदीला राष्ट्रीय हरित लवादासह विविध राज्यांतील उच्च न्यायालयांमध्ये आव्हान देण्यात आले आहे. तरी पीओपी मूर्तींच्या उत्पादकांना यश आले नव्हते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंदीच्या आदेशाला अंतिम रूप आले आहे. त्या अनुषंगानेच सीपीसीबीने १२ मे २०२० रोजी प्रसिद्ध केलेल्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार देशभरात पीओपी मूर्तींवर पूर्ण बंदी घालण्यात आली. 2020 मध्ये बंदी जाहीर झाल्यानंतर गणेशोत्सवातील पीओपी मूर्तींबाबतची बंदी पुढील वर्षापासून लागू होईल, असे केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी सोशल मीडियावर जाहीर केले होते. म्हणजे किमान 2021 पासून बंदी पूर्णपणे लागू व्हायला हवी होती. प्रत्यक्षात आजतागायत बंदीची प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही.

Web Title: Ganesh chaturthi no ban on pop ganesh idols as of now bombay high court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2024 | 05:28 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2025
  • Ganpati festival 2024
  • Hindu Festival

संबंधित बातम्या

Mhaswad News: म्हसवडमध्ये हिंदुत्वाची ललकार! ३ एप्रिलला भव्य ‘हिंदू संमेलना’चे आयोजन; महिलांना मिळणार विशेष भेट
1

Mhaswad News: म्हसवडमध्ये हिंदुत्वाची ललकार! ३ एप्रिलला भव्य ‘हिंदू संमेलना’चे आयोजन; महिलांना मिळणार विशेष भेट

Ram Navami 2026: प्रभू श्रीरामांच्या नैवेद्यासाठी झटपट बनवा ‘केसर पनकम’, उन्हाळ्यासाठी प्रभावी थंडगार पेय
2

Ram Navami 2026: प्रभू श्रीरामांच्या नैवेद्यासाठी झटपट बनवा ‘केसर पनकम’, उन्हाळ्यासाठी प्रभावी थंडगार पेय

Ram Navami 2026:  छंद नाही रामाचा तो देह…! रामनवमीनिमित्त नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींना पाठवा भक्तिमय शुभेच्छा
3

Ram Navami 2026: छंद नाही रामाचा तो देह…! रामनवमीनिमित्त नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींना पाठवा भक्तिमय शुभेच्छा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.