Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! राज्यातील तरुणांसाठी खूशखबर; ‘रोजगार महाकुंभ’द्वारे हजारो नोकऱ्यांची संधी

Mangal Prabhat Lodha: विविध उद्योग, कंपन्या, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, स्टार्टअप्स तसेच सेवा क्षेत्रातील संस्थांना या उपक्रमाशी जोडण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. उपलब्ध रिक्त पदे, आवश्यक शैक्षणिक पात्रता, कौशल्य, अनुभव, कामाचे ठिकाण आणि अपेक्षित भरतीची माहिती संकलित करण्यात येणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 16, 2026 | 07:25 PM
रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ला नवी बळकटी

रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ला नवी बळकटी

Follow Us
Follow Us:
  • रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ला नवी बळकटी
  • महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी–सृजन ट्रस्टमध्ये सामंजस्य करार
  • युवकांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी
मुंबई: राज्यातील युवकांना त्यांच्या जिल्हा, तालुका आणि स्थानिक परिसरात अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला नवी बळकटी मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, कौशल्य, रोजगार, (Mangal Prabhat Lodha) उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि सृजन ट्रस्ट, पुणे यांच्यात यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला आहे.

येत्या २९ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या रोजगार महाकुंभाची व्याप्ती वाढविणे, विविध उद्योग व आस्थापनांचा सहभाग वाढविणे आणि जास्तीत जास्त रोजगार इच्छुक युवकांना प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हा या कराराचा प्रमुख उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत राज्यभर विविध ठिकाणी रोजगार मेळावे आणि प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात येणार असून, रोजगार इच्छुक युवक आणि नोकरी देणाऱ्या कंपन्यांना एकाच व्यासपीठावर आणले जाणार आहे. मेळाव्यांमध्ये उमेदवारांच्या मुलाखती घेऊन पात्र उमेदवारांची निवड केली जाणार असून, शक्य तेथे निवड झालेल्या उमेदवारांना ऑफर लेटर किंवा नियुक्तीपत्र देण्यासाठी कंपन्यांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे.

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पा मोरया! गणेशभक्तांना घेऊन ‘नमो एक्स्प्रेस’ कोकणकडे रवाना

विविध उद्योग, कंपन्या, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, स्टार्टअप्स तसेच सेवा क्षेत्रातील संस्थांना या उपक्रमाशी जोडण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. उपलब्ध रिक्त पदे, आवश्यक शैक्षणिक पात्रता, कौशल्य, अनुभव, कामाचे ठिकाण आणि अपेक्षित भरतीची माहिती संकलित करण्यात येणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी, आयटीआय व कौशल्य प्रशिक्षणार्थी, पदवीधर, पदविकाधारक तसेच इतर रोजगार इच्छुक युवकांपर्यंत या उपक्रमाची माहिती पोहोचविण्यासाठी शैक्षणिक संस्था, युवा संघटना आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केली जाणार आहे. महिला, दिव्यांग, ग्रामीण युवक आणि रोजगाराच्या संधींपासून वंचित घटकांच्या सहभागावर विशेष भर देण्यात येणार आहे.

रोजगार मेळाव्यांच्या प्रभावी आयोजनासाठी उमेदवार नोंदणी, कंपन्यांसाठी हेल्प डेस्क, मुलाखत व्यवस्था, गर्दी व्यवस्थापन आणि स्वयंसेवकांचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच, निवड झालेल्या उमेदवारांच्या जॉईनिंग स्टेटसचा पाठपुरावा करून या उपक्रमातून प्रत्यक्ष किती युवकांना रोजगार मिळाला, याचे परिणामाधारित मूल्यमापनही करण्यात येणार आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या अपर सचिव मनिषा वर्मा, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे आयुक्त अमित सैनी, सृजन ट्रस्टचे विश्वस्त प्रा. मिलिंद मराठे, दिपक मुकादम, प्रा. वैद्य कैलास सोनमनकर, विशेष कार्य अधिकारी पंकज पाठक, अमित पटले, श्रेयस जोगळेकर, अलका यादव आदींच्या उपस्थितीत करार झाला.

‘बेरोजगार युवक-युवतींची संख्या मोठी असली, तरी…’; काय म्हणाले Mangal Prabhat Lodha?

राज्यातील लाखो युवकांसाठी सुवर्णसंधी!

राज्यातील युवकांना केवळ रोजगाराची माहिती नव्हे, तर प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’च्या माध्यमातून युवक, उद्योग आणि उद्योग व आस्थापनांना एकाच व्यासपीठावर आणले जात आहे. शासन आणि सामाजिक संस्थांच्या समन्वित प्रयत्नातून हा उपक्रम राज्यातील लाखो युवकांसाठी नवी संधी निर्माण करेल.
– मंगल प्रभात लोढा, मंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग.

Web Title: Good news for maharashtra youth opportunity for thousands of jobs through the rojgar mahakumbh mangal prabhat lodha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 07:25 PM

Topics:  

  • Mangal Prabhat Lodha
  • Mumbai News
  • New employment

संबंधित बातम्या

Tukaram Mundhe: महाराष्ट्रात मोठा घोळ! 11 रुपयांचा IV Set 325 ला विक्री, तुकाराम मुंडेंनी केंद्रीय हस्तक्षेपाची केली मागणी
1

Tukaram Mundhe: महाराष्ट्रात मोठा घोळ! 11 रुपयांचा IV Set 325 ला विक्री, तुकाराम मुंडेंनी केंद्रीय हस्तक्षेपाची केली मागणी

Manoj Jarange Patil : ‘समाजाच्या लेकरांसाठी लढून मरेन, आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही,’ जरांगे पाटील मुंबईकडे रवाना
2

Manoj Jarange Patil : ‘समाजाच्या लेकरांसाठी लढून मरेन, आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही,’ जरांगे पाटील मुंबईकडे रवाना

मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट! दहिसर – भाईंदर लिंक रोडच्या कामाला गती; कुठपर्यंत आलंय काम?
3

मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट! दहिसर – भाईंदर लिंक रोडच्या कामाला गती; कुठपर्यंत आलंय काम?

मुलांच्या सुरक्षेसाठी ‘खुली बात’! मिसिंग लिंक ट्रस्टचा मोठा पुढाकार; मुंबईतील १०० पालिकेच्या शाळांमध्ये AI…
4

मुलांच्या सुरक्षेसाठी ‘खुली बात’! मिसिंग लिंक ट्रस्टचा मोठा पुढाकार; मुंबईतील १०० पालिकेच्या शाळांमध्ये AI…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.