Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मिळाला मोठा दिलासा; परीक्षाशुल्क माफीचा शासन निर्णय जारी

दुष्काळाचा परिणाम केवळ शेती आणि शेतकऱ्यांपुरता मर्यादित राहत नाही. शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याने मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवणे कठीण होत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 27, 2026 | 07:06 AM
परीक्षाशुल्क माफीचा शासन निर्णय जारी; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मिळाला मोठा दिलासा

परीक्षाशुल्क माफीचा शासन निर्णय जारी; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मिळाला मोठा दिलासा

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यात यंदा अपुरा पाऊस आणि पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करून एकूण ३५८ तालुक्यांपैकी २६५ तालुक्यांचा समावेश केला आहे. सुमारे ७५ टक्के तालुक्यांना दुष्काळाचा फटका बसला असल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित ९३ तालुक्यांमध्ये तुलनेने समाधानकारक पाऊस झाल्याने त्यांना या यादीतून वगळण्यात आले आहे. ट्रिगर एक निकष लागू झालेल्या भागांचाच समावेश करण्यात आला आहे.

दुष्काळाचा परिणाम केवळ शेती आणि शेतकऱ्यांपुरता मर्यादित राहत नाही. शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याने मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवणे कठीण होत आहे. आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या उद्देशाने सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दुष्काळग्रस्त भागातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या पाल्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Pune : गणेश विसर्जनात ‘१०८’ची आपत्कालीन सेवा कुठे अडकली? महिला पत्रकारासाठी रुग्णवाहिका मिळवताना धावपळ

दरम्यान, परीक्षा शुल्क माफीमुळे आर्थिक बोजा कमी होऊन विद्यार्थी नियमितपणे शिक्षण सुरू ठेवू शकतील. शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश, परीक्षा आणि संबंधित प्रक्रिया सुरळीत राहण्यास मदत होईल. शुल्कमाफीसाठी कोणत्या परीक्षा आणि संस्थांचा समावेश होणार, याबाबतचे तपशील संबंधित शासकीय आदेशांमधून लवकरच स्पष्ट होणार असल्याचे कळवण्यात आले आहे.

दुष्काळग्रस्त कुटुंबाच्या मुलांना मोठा दिलासा

सरकारचा हा निर्णय दुष्काळग्रस्त कुटुंबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी दिलासा देणारा आहे. आर्थिक संकटामुळे शिक्षण खंडित होण्याची भीती दूर करून विद्यार्थ्यांना पुढे जाण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना थेट लाभ होण्याची शक्यता आहे. शिक्षणाच्या माध्यमातून भविष्यात स्थिरता मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

आता आर्थिक मदत कधी?

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. सरकारने राज्यातील मोठ्या भागात दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आणि भरीव आर्थिक मदत कधी मिळणार, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आधी थेट मदत जमा करा आणि त्यानंतर पंचनाम्याचे सोपस्कार करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Web Title: Government resolution regarding examination fee waiver issued

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 07:03 AM

Topics:  

  • drought news

संबंधित बातम्या

Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त रत्नागिरीसाठी उदय सामंतांचा मास्टर प्लॅन; चारा-पाणी ते कर्ज पुनर्गठन
1

Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त रत्नागिरीसाठी उदय सामंतांचा मास्टर प्लॅन; चारा-पाणी ते कर्ज पुनर्गठन

‘नवराष्ट्र’च्या बातमीची ठिणगी अन शासनाला जाग! अहिल्यानगरमध्ये अखेर दुष्काळ जाहीर; आता ‘सरसकट कर्जमाफी’साठी स्वाभिमानी आक्रमक
2

‘नवराष्ट्र’च्या बातमीची ठिणगी अन शासनाला जाग! अहिल्यानगरमध्ये अखेर दुष्काळ जाहीर; आता ‘सरसकट कर्जमाफी’साठी स्वाभिमानी आक्रमक

Maharashtra Drought : ’99 टक्के भागात दुष्काळाची स्थिती’; नाना पटोलेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
3

Maharashtra Drought : ’99 टक्के भागात दुष्काळाची स्थिती’; नाना पटोलेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

Supriya Sule : ‘मंत्र्यांच्या गाड्या अडवा, जेलमध्ये जायची माझी तयारी’ पंढरपुरात दुष्काळाच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळे आक्रमक
4

Supriya Sule : ‘मंत्र्यांच्या गाड्या अडवा, जेलमध्ये जायची माझी तयारी’ पंढरपुरात दुष्काळाच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळे आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.