Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! शेवटच्या वर्षातील वेतनवाढ नाकारणे चुकीचे; थकबाकी देण्याचे आदेश

निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी उच्च न्यायालयाकडून महत्त्वाचा दिलासा देणारा निर्णय समोर आला आहे. निवृत्तीपूर्वीच्या सेवाकाळाशी संबंधित वेतनवाढीच्या प्रकरणात न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 09, 2026 | 12:36 PM
निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! शेवटच्या वर्षातील वेतनवाढ नाकारणे चुकीचे; थकबाकी देण्याचे आदेश

निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! शेवटच्या वर्षातील वेतनवाढ नाकारणे चुकीचे; थकबाकी देण्याचे आदेश

Follow Us
Follow Us:
  • निवृत्तीच्या काळातील वेतनवाढीबाबत न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले.
  • संबंधित कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबतही प्रशासनाला निर्देश देण्यात आले.
  • निर्णयामुळे अनेक निवृत्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता.
कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या शेवटच्या वर्षात वार्षिक वेतनवाढ नाकारणे चुकीचे असे सांगत निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा देताना उच्च न्यायालयाने प्रशासनाला ९० दिवसांत कर्मचाऱ्यांची थकबाकी देण्याचे आदेश दिले. कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे अतिरिक्त महासचिव रावजी गंगाराम यादव यांनी ही माहिती दिली. या संदर्भात यादव यांनी म्हटले की, ‘निवृत्तीच्या शेवटच्या काळात ६ महिने किंवा त्याहून जास्त सलग सेवा करूनही वेतनवाढ देण्यास महाराष्ट्र शासनाने मंत्रालयातून आदेश देऊनही शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषद, शासन अनुदानित विविध महामंडळ, विविध संस्थांकडून टाळाटाळ केली जात असल्याचे पिटीशनद्वारे न्यायालयाच्या निदर्शनास पुराव्यासह आणण्यात आले. तशी धाव घेतल्यामुळेच निवृत्त कर्मचारी/अधिकाऱ्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळत आहे.’ निवृत्तीच्या शेवटच्या वर्षात किमान ६ महिने सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ नाकारणे चुकीचे असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने सेवानिवृत्ताना वार्षिक वेतनवाढ देण्याचे आदेश दिले.

MBBS चे शिक्षण झाले आता महाग; शुल्कात 17 लाखांपर्यंत वाढ, विद्यार्थ्यांसह पालकांनाही बसणार फटका

न्यायालयांमध्ये दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती वेणेगावकर यांनी त्यांच्या खंडपीठांसमोर सुनावणी घेतली. याचिकाकर्त्यांच्या वतीने विधीतज्ज्ञाकडून युक्तिवाद करताना खंडपीठाला सांगण्यात आले की, सेवेत कायम झालेल्या कर्मचाऱ्यांची वेतन आयोगानुसार वेतनवाढ १ जुलै आणि १ जानेवारी देय्य होती. मात्र ते कर्मचारी ३० जून आणि ३१ डिसेंबरला निवृत्त झाल्यामुळे संबंधित प्रशासनाने त्यांनाही वेतनवाढ देण्यास जाणून बुजून टाळाटाळ केल्याची बाब खरी असून, त्या निर्देशानुसार त्यांनाही वेतनवाढ मिळायला हवी होती. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी प्रशासनातर्फे बाजू मांडताना या मागणीला विरोध केला असता याचिकाकर्त्यांच्या वकिलांकडून वेतन निश्चितीचे शासन निर्णय शासन परिपत्रक दिलेले निर्देश न्यायमूर्ती यांच्याकडे दिले.

न्यायालयाने कोणकोणती निरीक्षणे नोंदवली

  • वार्षिक वेतनवाढ ही आगाऊ दिली जात नसून ती वर्षभर केलेल्या कामाचा मोबदला असते.
  • महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम २००९ मधील नियम १० नुसार ज्या कर्मचाऱ्यांनी संबंधित वर्षात किमान ६ महिने सेवा पूर्ण केली आहे ते वेतनवाढीस पात्र ठरतात.
  • याचिकाकर्त्यांनी निवृत्तीपूर्वी ६ महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ सेवा दिली आहे, त्यांच्या शेवटच्या पगारात ही वार्षिक वेतनवाढ गृहीत धरून पेन्शनची पुन्हा गणना करण्यात यावी, फेर गणनेनंतर निवृत्ती वेतनातील फरकाची रक्कम याचिका कर्त्यांना ९० दिवसांत अदा करावी.
हजारो शिक्षकांना मोठा दिलासा! तीन महिन्यांचा घरभाडे भत्ता फरक मिळणार; ३५ हजार कर्मचाऱ्यांना लाभ

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: High court relief to retired employees annual salary increment pension arrears maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 12:35 PM

Topics:  

  • Court
  • Mumbai News
  • Retirement

संबंधित बातम्या

Chhagan Bhujbal : भुजबळांना मोठा दिलासा! ‘त्या’ प्रकरणाचा निकाल लागला; विशेष कोर्टाचा मोठा निर्णय
1

Chhagan Bhujbal : भुजबळांना मोठा दिलासा! ‘त्या’ प्रकरणाचा निकाल लागला; विशेष कोर्टाचा मोठा निर्णय

aditya thackeray : अखेर 500 कोटींच्या नोटिशीला आदित्य ठाकरेंचं उत्तर, नेमकं काय म्हणाले पहा…
2

aditya thackeray : अखेर 500 कोटींच्या नोटिशीला आदित्य ठाकरेंचं उत्तर, नेमकं काय म्हणाले पहा…

Big Breaking: क्रिकेटविश्वात प्रचंड खळबळ; ‘या’ दिग्गज खेळाडूने अचानक जाहीर केली निवृत्ती
3

Big Breaking: क्रिकेटविश्वात प्रचंड खळबळ; ‘या’ दिग्गज खेळाडूने अचानक जाहीर केली निवृत्ती

मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला मिळणार नवी झेप; ५ वर्षांनी दुसरे जहाज दाखल, २३ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत
4

मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला मिळणार नवी झेप; ५ वर्षांनी दुसरे जहाज दाखल, २३ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.