Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“माघार घ्या, नाहीतर सरकारी रोष सहन करा!” इंडियन मेडिकल असोसिएशन माजी अध्यक्ष व सभासदांनी तयार केलेल्या पॅनलमधील उमेदवारांना धमकी

आयएमएच्या निवडणुकीत माजी पदाधिकाऱ्यांच्या पॅनलमधील उमेदवारांना माघार घेण्याची धमकी दिल्याचा आरोप समोर आला असून, यामुळे वाद निर्माण झाला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 28, 2026 | 06:14 PM
“माघार घ्या, नाहीतर सरकारी रोष सहन करा!” इंडियन मेडिकल असोसिएशन माजी अध्यक्ष व सभासदांनी तयार केलेल्या पॅनलमधील उमेदवारांना धमकी

“माघार घ्या, नाहीतर सरकारी रोष सहन करा!” इंडियन मेडिकल असोसिएशन माजी अध्यक्ष व सभासदांनी तयार केलेल्या पॅनलमधील उमेदवारांना धमकी

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हस्तक्षेप आणि दबावाच्या गंभीर आरोपांनी वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. २६ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीत माजी अध्यक्ष व सभासदांनी तयार केलेल्या पॅनलमधील उमेदवारांना धमकीचे फोन येत असल्याचा आरोप डॉ. सुहास पिंगळे यांनी केला आहे. भारतीय वैद्यक संघटना म्हणजेच आयएमएचे महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ. पिंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘माघार घ्या… आमच्याकडे या… अन्यथा सरकारी रोष ओढवून घ्याल,’ अशा आशयाचे फोन उमेदवारांना येत आहेत. या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, वैद्यकीय स्वायत्ततेवर गदा येत असल्याची चिंता व्यक्त होत आहे.

Mumbai Local: मध्य रेल्वेवरील गर्दी कमी होणार! आता ठाणे-डोंबिवली मार्गावरून धावणार 15 डब्यांची लोकल

या दबावामुळे संबंधित पॅनलमधील एका उमेदवाराने माघार घेतल्याची माहितीही समोर आली आहे. उर्वरित उमेदवारांवरही अशाच प्रकारचा दबाव टाकण्यात आल्याचे सांगितले जात असून, मात्र उरलेले सदस्य निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे डॉ. पिंगळे यांनी स्पष्ट केले. ‘लढा अद्याप संपलेला नाही,’ असा संदेश त्यांनी दिला. दरम्यान, या घडामोडींमुळे वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे. ‘ही केवळ निवडणूक नसून वैद्यकीय स्वायत्तता टिकवण्याची लढाई आहे,’ असे मतही डॉ. पिंगळे यांनी व्यक्त केले. दबाव, दडपशाही आणि भीतीचे राजकारण लोकशाही प्रक्रियेला घातक असल्याची टीका त्यांनी केली. या पार्श्वभूमीवर एमएमसी निवडणूक अधिकच चुरशीची होण्याची शक्यता असून, डॉक्टरांनी सजग राहून मतदानातून उत्तर द्यावे, असे आवाहनही करण्यात येत आहे.

दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA)च्या अंतर्गत निवडणुकांदरम्यान गंभीर वाद निर्माण झाला आहे. माजी अध्यक्ष व काही सभासदांनी तयार केलेल्या पॅनलमधील उमेदवारांना माघार घेण्याचा दबाव टाकण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे. माहितीनुसार, काही उमेदवारांना “माघार घ्या, आमच्यात सामील व्हा, अन्यथा सरकारी रोष ओढवून घ्यावा लागेल” अशा प्रकारच्या धमक्या देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे आयएमएच्या अंतर्गत राजकारणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून, संघटनेतील गटबाजी उघड झाल्याचे चित्र आहे. संबंधित उमेदवारांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करत निष्पक्ष आणि दबावमुक्त निवडणूक प्रक्रियेची मागणी केली आहे. दरम्यान, या आरोपांवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी, हा वाद वैद्यकीय क्षेत्रात चर्चेचा विषय ठरत आहे. भविष्यात या प्रकरणात चौकशी किंवा स्पष्टीकरण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

औद्योगिक विकास की अधोगतीची वाटचाल; शहरीकरणात घुसमटले पक्षी, ‘या’ दुर्मिळ प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर

Web Title: Ima election candidates threatened with government action panel allegations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 06:14 PM

Topics:  

  • Hospital
  • Mumbai

संबंधित बातम्या

Mumbai CNG Price Hike: मुंबईत सीएनजीचा भडका! सलग दुसऱ्यांदा दरात वाढ; आता ऑटो आणि टॅक्सीच्या भाड्यातही वाढ होणार?
1

Mumbai CNG Price Hike: मुंबईत सीएनजीचा भडका! सलग दुसऱ्यांदा दरात वाढ; आता ऑटो आणि टॅक्सीच्या भाड्यातही वाढ होणार?

मुख्यमंत्र्याचां मोठा निर्णय! मंत्र्यांच्या ताफ्यांची संख्या निम्म्यावर; सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याच्या सूचना
2

मुख्यमंत्र्याचां मोठा निर्णय! मंत्र्यांच्या ताफ्यांची संख्या निम्म्यावर; सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याच्या सूचना

मुंबईत ‘मराठी पाटी’ सक्तीचा शेवटचा इशारा; महिनाभरात अंमलबजावणी न केल्यास BMC करणार मोठी कारवाई
3

मुंबईत ‘मराठी पाटी’ सक्तीचा शेवटचा इशारा; महिनाभरात अंमलबजावणी न केल्यास BMC करणार मोठी कारवाई

Jaslok Hospital : श्वास घेणंही झालं कठीण; प्रचंड हर्नियाग्रस्त महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करून दिलं नवजीवन
4

Jaslok Hospital : श्वास घेणंही झालं कठीण; प्रचंड हर्नियाग्रस्त महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करून दिलं नवजीवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.