मनुष्यबळ कमतरतेमुळे डासजन्य आजारांमध्ये वाढ! मंजूर २,२०० पदांपैकी सुमारे ४० टक्के पदे रिक्त असल्याची माहिती
मुंबईत फॉगिंग मशीनच्या कमतरतेमुळे डेंग्यू, मलेरिया आणि लेप्टो यांसारख्या पावसाळी आजारांचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. उपलब्ध यंत्रांपैकी तब्बल ५० टक्के मशीन सदोष असून, वेळेवर फवारणी होत नसल्याने डास नियंत्रणावर परिणाम होत आहे. त्यामुळे आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर कीटकनाशक विभागातील मनुष्यबळाची कमतरताही गंभीर आहे. मंजूर २,२०० पदांपैकी सुमारे ४० टक्के पदे रिक्त आहेत. यातून यंदा पावसाळ्यापूर्वी आवश्यक उपाययोजना न झाल्यास रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.(फोटो सौजन्य – istock)
कीटकनाशक विभागातील मनुष्यबळाची कमतरताही गभीर आहे. मंजूर २,२०० पदांपैकी केवळ १,२०० ते १,३०० कर्मचारी कार्यरत असून सुमारे ४० टक्के पदे रिक्त आहेत. उर्वरित काम कंत्राटी पद्धतीने चालवले जात असल्याची माहिती मजदूर युनियनच्या प्रदीप नारकर यांनी दिली. त्यामुळे यंदा पावसाळ्यापूर्वी आवश्यक उपाययोजना न झाल्यास रुग्णसख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. अनेक मशीन जुनी व भादुरुस्त अवस्थेत आहेत. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त बिपिन शर्मा यानी यावर उपाय म्हणून सुमारे १७ कोटी रुपयांच्या कंत्राटाचा प्रस्ताव तयार केल्याची माहिती दिली.
काँग्रेसच्या नगरसेविका ट्युलिप मिरांडा यांनी पुरेशा यंत्रसामग्रीच्या अभावामुळे नियमित फवारणी होत नसल्याची तक्रार केली, तर एमआयएमच्या नगरसेविका शबाना आतिफ शेख यांनी गोवंडीसारख्या झोपडपट्टी भागात फवारणी क्वचितच केली जात असल्याचे सांगितले.
“… आता अल्पसंख्यांकांमधून बाहेर पडण्याची वेळ”; Mangal Prabhat Lodha यांचे विधान
२६ प्रशासकीय प्रभागांपैकी केवळ काही व्हीआयपी भागांमध्येच पुरेशी यंत्रे उपलब्ध असल्याचीही टीका करण्यात आली. सध्या परिस्थिती अशी आहे की, तीन वॉडीसाठी एकच फॉगिंग मशीन वापरले जात आहे. त्यामुळे डासांच्या अळ्या नष्ट करण्यासाठी आवश्यक असलेली वेळेवर फवारणी होत नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, अनेक मशीन जुनी व नादुरुस्त अवस्थेत आहेत. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त बिपिन शर्मा यांनी यावर उपाय म्हणून १७ कोटी रुपयांच्या कंत्राटाचा प्रस्ताव तयार केल्याची माहिती दिली.






