Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काश्मीरसाठी शिवसेना कटिबद्ध; द्रास रुग्णालयाला CT स्कॅन मशीन, रुग्णवाहिका सुपूर्द : डॉ. श्रीकांत शिंदे

काश्मीरमधील नागरिकांसाठी शिवसेना कटिबद्ध असल्याची ग्वाही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. द्रास रुग्णालयाला CT स्कॅन मशीन आणि रुग्णवाहिका सुपूर्द करत मोठी घोषणा केली.

  • By विवेक
Updated On: Jul 05, 2026 | 05:30 PM
काश्मीरसाठी शिवसेना कटिबद्ध; द्रास रुग्णालयाला CT स्कॅन मशीन, रुग्णवाहिका सुपूर्द : डॉ. श्रीकांत शिंदे

काश्मीरसाठी शिवसेना कटिबद्ध; द्रास रुग्णालयाला CT स्कॅन मशीन, रुग्णवाहिका सुपूर्द : डॉ. श्रीकांत शिंदे

Follow Us
Follow Us:

शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि काश्मीरमध्ये मैत्रीचा नवा अध्याय सुरु झाला आहे. काश्मीरमधील लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याची ग्वाही शिवसेना संसदीय पक्षाचे नेते संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.

लडाखमधील द्रास जिल्हा रुग्णालयाला शिवसेनेने उपलब्ध केलेली सीटी स्कॅन मशीन व रुग्णवाहिका खासदार डॉ. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुपूर्द करण्यात आली. यावेळी आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्राचे राज्यमंत्री योगेश कदम, शिवसेना राज्य संघटक आनंद परांजपे, बाजीराव चव्हाण, नितीन राठोड, सरहद संस्थेचे प्रमुख संजय नाहर लडाखचे खासदार हाजी मोहम्मद हनीफा, डॉ. मोहम्मद जाफर, अब्दुल वाहिद तसेच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक व भारतीय लष्कराचे अधिकारी उपस्थित होते.

खासदार डॉ. शिंदे म्हणाले की मागील काही वर्षांत शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि कश्मीरमधील मैत्री वृद्धींगत झाली आहे. त्यांच्या नेतृत्वात कुपवाडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. कारगील युद्ध स्मारकासाठी ३ कोटींचा निधी देण्यात आला. आता वर्षभरात द्रासमधील जिल्हा रुग्णालयासाठी शिवसेनेकडून रुग्णवाहिका आणि सीटी स्कॅन मशीन देण्यात आली. शिवसेना हा शब्द पाळणारा पक्ष आहे, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.

पावसाळ्यात नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; महापौर रवि लांडगे यांचे प्रशासनाला ‘अलर्ट’ राहण्याचे निर्देश

खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, देशात कुठेही नैसर्गिक संकट आले तर शिंदे साहेब स्वत: तिथे पोहोचतात. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर शिंदे साहेब स्वत: काश्मीरला आले. इथे अडकून पडलेल्या शेकडो महाराष्ट्रीय पर्यटकांना विमानाने पुन्हा राज्यात सुरक्षितपणे नेण्याचे काम त्यांनी केले होते. याच हल्ल्यात पर्यटकांना वाचवताना शहिद झालेल्या सय्यद आदिल हुसेन शाह याच्या कुटुंबियांना शिवसेनेने घर बांधून दिले. शिवसेना केवळ मतांसाठी नाही तर माणसुकीच्या नात्याने काम करते, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. काश्मीरमधील लोकांना जे जे आवश्यक असेल त्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले.

सीमेवर काम करणाऱ्या भारतीय जवानांचे देशाप्रती असलेले समर्पण वाखणण्याजोगे आहे, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. कर्तव्यावर असताना सहा सहा महिने जवान कुटुबियांना भेटत नाही, देशासाठी जवानांचे सर्वोच्च समर्पण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि लष्कराच्या हातात देश सुरक्षित आहे, असे ते म्हणाले. सरहद संस्थेने कश्मीरमध्ये राबवलेल्या विविध उपक्रमांचे खासदार डॉ. शिंदे यांनी कौतुक केले.

‘लालपरी’ची ज्ञानयात्रा, लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना एसटीचे सुरक्षित पंख! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

सरहद शौर्यथॉनचा खासदार डॉ. शिंदेंच्या हस्ते शुभारंभ

लडाखमधील द्रास येथे सरहद फाउंडेशन आणि भारतीय लष्कराने आयोजित केलेल्या सरहद शौर्यथॉनचा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. सरहद शौर्यथॉनमध्ये जवळपास तीन हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर खासदार खासदार डॉ. शिंदे यांनी कारगीलमधील युद्ध स्मारक येथे वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.

Web Title: Shiv sena dr shrikant shinde drass hospital ct scan ambulance kashmir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • Dr Shrikant shinde
  • indian army
  • jammu kashmir
  • shivsena

संबंधित बातम्या

Gen Z वर राजकीय पक्षांचा फोकस वाढला; राहुल गांधी, फडणवीसांनंतर आता श्रीकांत शिंदे साधणार तरुणांशी संवाद
1

Gen Z वर राजकीय पक्षांचा फोकस वाढला; राहुल गांधी, फडणवीसांनंतर आता श्रीकांत शिंदे साधणार तरुणांशी संवाद

बारामतीत संजय राऊतांच्या रामरक्षा आंदोलनात राडा; ‘भाजपवाला दिसला की कॉलर पकडा’, वक्तव्याने खळबळ
2

बारामतीत संजय राऊतांच्या रामरक्षा आंदोलनात राडा; ‘भाजपवाला दिसला की कॉलर पकडा’, वक्तव्याने खळबळ

‘मला संधी मिळण्याचे चान्सेस 100%’, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेत शिंदेगटाच्या खासदाराचा मोठा दावा
3

‘मला संधी मिळण्याचे चान्सेस 100%’, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेत शिंदेगटाच्या खासदाराचा मोठा दावा

‘वारसाहक्काने पैसा मिळतो, पक्ष मिळत नाही’, रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना टोला
4

‘वारसाहक्काने पैसा मिळतो, पक्ष मिळत नाही’, रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.