India-Pakistan match politics
आशिया चषक क्रिकेट सामन्यांमध्ये भारत आणि पाकिस्तान सामन्यामुळे राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात सामन्याशी संबंधित चर्चा जोर धरली होती. एका गटाकडून भारत पाकिस्तान सामना व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे एक गट भारत पाकिस्तान सामन्याला विरोध करताना दिसत आहे. पहलगाम हल्ला आण ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तान सामन्याला विरोध होऊ लागला आहे.
भारत पाकिस्तान सामन्याचे राजकीय संदर्भांमध्ये अर्थ लावला जात आहेत. राजकीय नेतेही सोशल मीडियाद्वारे आपल्या भूमिका मांडत आहे. त्यामुळे आजचा सामना हा केवळ मैदानापुरता मर्यादित राहिला नसन आता राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय झाला आहे. क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साह तर दिसला, मात्र सामन्याशी संबंधित राजकीय दृष्टीकोनांनी वातावरण थोडे तणावग्रस्त केले आहे. खेळ आणि राजकारण यामध्ये हा सामन्याद्वारे झालेला संगम चर्चेचा विषय ठरला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने भारत पाकिस्ताना सामन्याला विरोध केल्यानंतर आता काँग्रेस कडूनही या सामन्याला विरोध होताना दिसत आहे. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी या सामन्याला विरोध केला आहे. पक्षाकडून आंदोलन देखील करण्यात येत आहे. आता काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी एक व्हिडीओच्या माध्यमातू या सामन्याला विरोध केला आहे.
ठाकूर म्हणाल्या, “व्वा मोदीजी व्वा, काय देशभक्ती आहे तुमची? एकीकडे तुम्ही म्हणता ऑपरेशन सिंदूर सुरू आहे आणि दुसरीकडे भारताची भूमी सोडून दुबईमध्ये पाकिस्तानसोबत तुम्ही क्रिकेट खेळायला तयार झाला आहात. जय शाहाच्या पुढे सगळ्या भाजप नेत्यांनी गुडघे टेकले, दुसरीकडे, ज्या प्रकारे अनुराग ठाकूर, जय शहा ज्या प्रकारे पाकिस्तानी क्रिकेटसोबत बसतायेत, बोलतायेत ते पटण्यासारखे नाहीये. जे शहीद झाले, ज्यांचं बलिदान गेलं, ज्यांचे नवरे हिसकावून नेले त्यांचा तरी विचार करा ना थोडा.” की दरवेळी तुम्ही व्यवहारांचाच विचार करणार, यापलीकडे जाऊन तुम्ही या सामन्यांना नाही म्हणायलाच पाहिजे होतं. तुम्ही पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याची परवानगी का दिली. देशातील केंद्र सरकार काय करत आहेत. की मोदीजी देखील जय शहाला नाही बोलायला घाबरत आहेत.
London far-right protest : ‘लढा नाहीतर मरा… ‘, अमेरिकेत बसून लंडनमध्ये निदर्शने का भडकावत आहेत
ठाकूरांनी सरकारच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत पुढे म्हटले: “बीसीसीआय कसा निर्णय घेऊ शकते? काय सुरू आहे या देशामध्ये?” त्या म्हणाल्या की याप्रकरणी कणखर भूमिका घेणेआवश्यक आहे. यापूर्वीही आपल्या देशाने पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार दिला आहे. पण आज तुम्ही तुमच्या पाठिचा मणका मोडल्यासारखे का वागताय. या देशाच्या युवकांनी जागृत झालंच पाहिजे, काय सुरू आहे या देशात, एकीकडे एका जातीला दुसऱ्या जातीशी भिडवायचे एकीकडे ट्रम्पकडेनतमस्तक व्हायचं, दुसरीकडे ऑपरेशन सिंदूर अजून जारी आहे, असंही म्हणायचं पण फक्त इंव्हेंट सुरू आहे. यातच तुमचा गोंधळ सुरू आहे. बंद करा हे सगळं आणि जर खरे देशप्रेम असेल तर भारताने पाकिस्तानसोबत सामना नाही झाला पाहिजे या देशाच्या सैनिकांचा, येथील नागरिकांचा स्वाभिमान खेळापेक्षा मोठा नाही का? त्यांचा स्वाभिमान बळकट राहिला पाहिजे, ही जबाबदारी या सरकारची आहे.” असही यशोमती ठाकूर यांनी म्हटल आहे.
मोदीजीना भारतीय सैनिकांपेक्षा क्रिकेट जास्त प्रिय आहे का ? हा प्रश्न आता प्रत्येक नागरिकाने सरकारला विचारायची वेळ आली आहे.#AsiaCup2025 #BoycottAsiaCup #DeshdrohiBCCI#boycottindvspak pic.twitter.com/mw8Y0xXsrf
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) September 13, 2025