
US Senator Mark Warner
“युद्ध थांबवा नाहीतर भरमसाठ कर लावेल” ; पंतप्रधान मोदींना धमकी दिल्याचा ट्रम्प यांचा दावा
मार्क वॉर्नर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा दावा फेटाळून लावला आहे. त्यांच्या मते, भारत पाकिस्तान युद्धबंदीत ट्रम्प अनावश्यकपणे स्वत:चे महत्व वाढवून घेत आहेत. माध्यमांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, भारत सरकारचे उत्तर, अमेरिकेची गुप्तचर यंत्रणेचा अहवाल, तसेच सीनेट इंटेलिजेंसकडून मिळालेल्या अहवालामधून भारत पाकिस्तानमदील युद्धाचा अंत हा दोन्ही देशांच्या DGMO च्या चर्चेतूनच झाला आहे. अमेरिकेने केवळ यामध्ये मध्यस्थीची भूमिका बजावली असेल, परंतु ट्रम्प यांच्या हस्तक्षेपामुळे युद्ध थांबल्याचा दावा वॉर्नर यांनी नाकारला आहे.
वॉर्नर यांनी हेही स्पष्ट केले की, दोन अण्वस्त्रधारी देशांमध्ये तसेच पहलगाम हल्ल्यानंतर झालेल्या संघर्षाची परिस्थिती तेवढी भयंकर नव्हती. आतापर्यंत अनेक वेळा दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही देशांमध्ये दहशतवादी हल्ल्यांमुळे अनेकदा युद्ध झाले आहे. परंतु दोन्ही देशांतील समस्या सोडवण्यासाठी इस्लामाबाद आणि नवी दिल्ली चर्चेचा मार्ग मोकळाच राहिला आहे.
तसेच त्यांनी हेही सांगितले की, पाकिस्तान त्यांच्या आर्थिक समस्यांसाठी सतत भारताला दोष देत असतो, त्यांच्यावर आरोप करत असतो. परंतु भारत आता स्पर्धेपलीकडे गेला असून त्याचे अमेरिकेसोबत दीर्घकालीन संबंध आहेत असे वॉर्नर यांवी म्हटले.
वॉर्नर यांनी ट्रम्पवर टीका करत म्हटले की, त्यांना परराष्ट्र व्यवहारतील समस्या अतिशय रंगवून सांगण्याची सवय आहे. त्यांच्या अशा विधानांमुळे मित्र राष्ट्रातील विश्वासाला तडा जात असून प्रादेशिक तणाव अधिक वाढण्याची शक्यता आहे. वॉर्नर यांनी भारतासोबतच्या टॅरिफ वादावर बोलताना सांगितले की, भारताने युद्धबंदीचे श्रेय अमेरिकेला दिले नाही यामुळे हा तणाव वाढला आहे. वॉर्नर यांच्या या खुलास्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. यामुळे भारत-पाकिस्तान युद्धबंदी ही संवादातूनच झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Ans: अमेरिकेचे सिनेटर मार्क वॉर्नर यांच्या मते, भारत पाकिस्तान संघर्षात अमेरिकेने मध्यस्थी केली असले, परंतु दोन्ही देशांतील युद्धबंदी ही परस्पर संवादातूनच झाली आहे.
Ans: अमेरिकेचे सिनेटर मार्क वॉर्नर यांनी भारत-पाकिस्तानमधील संभाव्य अण्वस्त्र युद्ध थांबवले असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. त्यांच्या मते दोन्ही देशांमध्ये परिस्थितीत अण्वस्त्र युद्ध होईल इतकीही गंभीर नव्हती.