Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yashomati Thakur : “विकसित भारताचा नव्हे विकसित भाजपचा अर्थसंकल्प”, यशोमती ठाकुर यांची टिका

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा आर्थिक अर्थसंकल्प २०२६ सादर केला आहे. हा अर्थसंकल्प सामान्य माणूस, महिला, शेतकरी आणि तरुणांवर लक्ष केंद्रित करणारा असल्याचे म्हटले जाते.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 01, 2026 | 06:09 PM
"विकसित भारताचा नव्हे विकसित भाजपचा अर्थसंकल्प", यशोमती ठाकुर यांची टिका

"विकसित भारताचा नव्हे विकसित भाजपचा अर्थसंकल्प", यशोमती ठाकुर यांची टिका

Follow Us
Follow Us:

मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा आर्थिक अर्थसंकल्प २०२६ सादर केला असून हा अर्थसंकल्प सामान्य माणूस, महिला, शेतकरी आणि तरुणांवर लक्ष केंद्रित करणारा असल्याचे म्हटले जाते. या अर्थसंकल्पाचा एकूण आकार ५३ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. याच अर्थसंकल्पावर आता काँग्रेसकडून टिका करण्यात आली.

केंदीय अर्थसंकल्प जिथे निवडणूका आहेत. त्यांच्यासाठी चांगला, जिथे निवडणुका नाहीत, त्यांच्यासाठी काही नाही. म्हणजे विकसित भारतासाठीचा नव्हे, तर विकसित भाजपचा अर्थसंकल्प आहे, अशी टिका काँग्रेस नेत्या, माजी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली.

“जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था निर्माण…”; Union Budget 2026 वर मंत्री मंगलप्रभात लोढांची प्रतिक्रिया

अर्थसंकल्पीय अधिवेशनात रविवारी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी २०२६-२७ साठीचा अर्थसंकल्प सादर केला. देशात सध्या महागाई, बेरोजगारी, उद्योगधंद्याचे संकट अशी बिकट परिस्थिती आहे. देशाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा, सामाजिक विकास आणि लोककल्याणकारी योजनांबाबतही हा अर्थसंकल्प दिशाहीन वाटतो. विशेष म्हणजे ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत, त्यांच्यासाठीच अधिक तरतुदी केल्याचे स्पष्टपणे जाणवते, तर ज्या राज्यांमध्ये निवडणुका नाहीत त्यांना पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आले आहे. देशातील सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. अशावेळी सामान्य जनतेला आधार देईल, देशाच्या अर्थचक्राला गती देईल असा अर्थसंकल्प मांडला जाईल अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा होती. मात्र केंद्रातील भाजप सरकारने सर्वसामान्यांना कोणताही दिलासा देणारा अर्थसंकल्प सादर केला नाही.

या अर्थसंकल्पावर यशोमती ठाकूर यांनी जोरदार टिका केली, केंद्रीय अर्थसंकल्प अतिशय निराशाजनक आणि हास्यास्पद आहे. या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, मध्यमवर्गीयांसाठी काहीही ठोस तरतूद दिसत नाही. जीएसटीचा फटका एवढ्या मोठ्या प्रमाणात बसत आहे. त्याचे निराकरण कसे करता येईल याचे देखील काही निराकरण या अर्थ संकल्पात दिसत नाही. विकासकामे दिसत नाहीत, असे ठाकूर यांनी म्हटले आहे.

महागाईवर उपाययोजना नाहीत !

या अर्थसंकल्पात महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी, महागाई कमी करण्यासाठी काहीच उपाययोजना दिसत नाहीत. सर्वसामान्य माणूस आज महागाईमध्ये होरपळून निघाला आहे. मात्र सरकारला यावर उपाययोजना या अर्थसंकल्पात करता आलेल्या नाहीत. त्यामुळे हा अर्थसंकल्प सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारा नाही, असे ठाकूर यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे !

आज देशातील शेतकरी अत्यंत संकटात आहे, या शेतकऱ्यांना आधार देणाऱ्या ठोस अशा कोणत्याही तरतुदी अर्थसंकल्पात दिसत नाहीत. शेतकरी आस्मानी सुलतानी अशा दोन्ही संकटांना तोंड देत आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. अशा गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीबाबत, कर्जमाफीबाबत किंवा शेतीमालाला हमीभाव देण्याबाबत या अर्थसंकल्पात कोणतीही ठोस तरतूद करण्यात आलेली नाही. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे, अशी टिका यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

Feat वसूली ताई…! Budget 2026 जाहीर होताच नेटकऱ्यांनी अर्थमंत्र्यांना घेरलं, मजेदार MEMES VIRAL

Web Title: Criticism by yashomati thakur on the bjp budget it not a developed india budget but a developed bjp budget

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 06:09 PM

Topics:  

  • BJP
  • budget 2026
  • Yashomati Thakur

संबंधित बातम्या

‘हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे…’, बंडखोर खासदारांवर एकनाथ शिंदेचं सूचक विधान; तर विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
1

‘हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे…’, बंडखोर खासदारांवर एकनाथ शिंदेचं सूचक विधान; तर विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

Aaditya Thackeray: ‘तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकलं…’; ६ खासदारांच्या बंडानंतर आदित्य ठाकरेंचा पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
2

Aaditya Thackeray: ‘तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकलं…’; ६ खासदारांच्या बंडानंतर आदित्य ठाकरेंचा पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

‘आदित्य ठाकरे म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे ‘अभिषेक बॅनर्जी’…’, नितेश राणेंचा घणाघात, थेट ‘हेल्मेट’ गिफ्ट पाठवण्याचा टोला
3

‘आदित्य ठाकरे म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे ‘अभिषेक बॅनर्जी’…’, नितेश राणेंचा घणाघात, थेट ‘हेल्मेट’ गिफ्ट पाठवण्याचा टोला

NEET पेपर लीक झाला तर फेरपरिक्षा, मग खासदारांच्या फुटीनंतर…? रोहित पवारांचा सरकारला बोचरा सवाल
4

NEET पेपर लीक झाला तर फेरपरिक्षा, मग खासदारांच्या फुटीनंतर…? रोहित पवारांचा सरकारला बोचरा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.