Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सर जे. जे. रुग्णालयात खळबळ! अस्थिरोग विभागातील प्राध्यापकावर भ्रष्टाचारासह रुग्णाच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप

मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयातील ऑर्थोपेडिक्स विभागाचे प्राध्यापक डॉ. नितीन महाजन यांच्यावर आर्थिक शोषण, बनावट सह्या आणि रुग्णाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचे गंभीर आरोप.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 02, 2026 | 05:52 PM
सर जे. जे. रुग्णालयात खळबळ! (Photo Credit- X)

सर जे. जे. रुग्णालयात खळबळ! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • सर जे. जे. रुग्णालयात खळबळ!
  • ऑर्थोपेडिक्स विभागाच्या वरिष्ठ प्राध्यापकावर मानसिक छळ
  • हलगर्जीपणा आणि बनावट सह्यांचे गंभीर आरोप
(नीता परब) मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क: मुंबईतील प्रसिद्ध राज्य सरकारच्या अंतर्गत असलेले सर जे. जे. रुग्णालयाच्या अस्थिरोगशास्त्र (आर्थॉपेडिक्स) विभागात एका वरिष्ठ प्राध्यापकाविरुद्ध अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप झाल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात  खळबळ उडाली आहे. प्राध्यापक डॉ. नितीन महाजन यांच्यावर निवासी डॉक्टरांचा मानसिक व आर्थिक छळ करणे, बनावट सह्या करणे आणि वैद्यकीय हलगर्जीपणामुळे एका रुग्णाचा बळी जाण्यास कारणीभूत असल्याचा आरोप निवेदने व तक्रारींमधून रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्याकडे  करण्यात आला आहे. सध्या रुग्णालयात आणि वैद्यकीय क्षेत्रात या आरोपांची जोरदार चर्चा असून, विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या सर्व आरोपांचे लेखी पुरावे आणि तक्रारींचे तपशील उघड झाले आहेत, ज्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.

निवासी डॉक्टरांना वेठीस धरून त्यांच्याकडून अक्षरशः आर्थिक खंडणी वसूल केल्यासारखा प्रकार

ऑर्थोपेडीक विभागात चालत असल्याचे आरोपांवरून समोर आले आहे. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी तब्बल १५ कनिष्ठ निवासी डॉक्टरांनी अधिष्ठातांना (डीन) दिलेल्या सामायिक पत्रात म्हटले आहे की, डॉ. महाजन यांच्या जेवणावळी, महागडी घड्याळे, इयरफोन्स आणि सण-उत्सवांतील भेटवस्तूंचा वैयक्तिक खर्च निवासी डॉक्टरांवर सक्तीने टाकला जातो.  तसेच, नाव न छापण्याचा अटीवरून एका निवासी डॉक्टर यांनी म्हटले आहे की,  ५ मार्च २०२६ रोजी दिलेल्या स्वतंत्र पत्रात या बेकायदेशीर आणि वैयक्तिक कामांमुळे आपण नैराश्यात गेलो असल्याचे धक्कादायक वास्तव मांडण्यात आले आहे. जे विद्यार्थी या आर्थिक लुटीला आणि वैयक्तिक कामांना नकार देतात, त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करून अपमानास्पद वागणूक दिली जाते, असाही आरोप या पत्रांमध्ये करण्यात आला आहे.

गैरकारभार निष्पाप रुग्णाच्या जीवावर!

या सर्व गैरकारभाराचा सर्वात भयंकर फटका एका निष्पाप रुग्णाला बसल्याचा खळबळजनक आरोप एका घटना अहवाल (इन्सीडन्स रिपोर्ट)मध्ये नमूद करण्यात आला आहे. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी भास्कर मुगम या अत्यंत गंभीर जखमी रुग्णाला डॉ. महाजन यांच्या युनिटमध्ये दाखल करून घेण्यास व वेळेवर उपचार देण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्याला योग्य संदर्भ पत्रांविनाच सायन आणि केईएम रुग्णालयात रेफर करून वाऱ्यावर सोडण्यात आले. या वेळेच्या अपव्ययामुळे आणि वैद्यकीय हलगर्जीपणामुळे केईएम रुग्णालयात त्या रुग्णाचा पाय कापावा लागला आणि अखेर त्याचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. एका प्राध्यापकाच्या बेजबाबदारपणामुळे व प्रवेश नाकारल्यामुळे रुग्णाला जीव गमवावा लागल्याच्या या अत्यंत संतापजनक घटनेची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.

मुंबईत उघड्यावर कचरा फेकलात तर खैर नाही! CCTVच्या निगराणीखाली दंडात्मक कारवाई

विद्यार्थ्यांच्या बनावट सह्या

भ्रष्टाचाराची आणि मनमानी कारभाराची ही साखळी इथेच थांबत नाही, तर यात थेट बनावटगिरी (फोर्जरी)चाही समावेश असल्याचा आरोप आहे. ५ मार्च २०२६ रोजी पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी थेट महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट)कडे धाव घेत एक गंभीर तक्रार दाखल केली आहे. विद्यार्थ्यांच्या संमतीशिवाय आणि माहितीशिवाय त्यांचे पदव्युत्तर मार्गदर्शक (पीजी गाईड) बदलून डॉ. महाजन यांची नियुक्ती करण्यासाठी कागदपत्रांवर विद्यार्थ्यांच्या बनावट सह्या केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. याशिवाय, बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी)  अत्यंत अनादरपूर्वक वर्तन करून विभागात हुकूमशाहीचे वातावरण निर्माण केल्याचेही आरोप कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. या प्रकारामुळे कर्मचारी व विध्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

२०१९ मध्ये विद्यार्थ्याचे करिअर उद्ध्वस्त

२०१९ च्या एका चौकशी अहवालानुसार डॉ. महाजन यांचा पूर्वेतिहासही वादग्रस्त राहिला असल्याचे निष्पन्न झाले आहे. डॉ. कांता राजू एच या विद्यार्थ्याला प्राध्यापकांमधील वैयक्तिक मतभेद आणि अंतर्गत राजकारणातून जाणीवपूर्वक प्रात्यक्षिक परीक्षेत नापास करण्यात आले होते, असा थेट निष्कर्ष डॉ. विनायक काळे यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने काढला होता. वारंवार विद्यार्थ्यांना वेठीस धरणे, प्रबंधाचे विषय न देणे आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणे अशा प्रवृत्तींमुळे विभागात संतापाची लाट आहे. या सर्व पुराव्यांच्या आणि लेखी तक्रारींच्या आधारे आता या प्रकरणाची अत्यंत सखोल, निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी आक्रमक मागणी केली जात आहे.

थोडक्यात महत्त्वाचे

आर्थिक लूट आणि शोषण: डॉ. नितीन महाजन यांच्याकडून महागड्या भेटवस्तू, वैयक्तिक घड्याळे आणि जेवणावळीसाठी १५ निवासी डॉक्टरांवर आर्थिक दबाव टाकल्याचा थेट आरोप (तक्रार दिनांक: ६ फेब्रुवारी २०२६).

हलगर्जीपणाने रुग्णाचा बळी: भास्कर मुगम या रुग्णाला वेळेवर उपचार न दिल्याने आणि प्रवेश नाकारून इतरत्र पाठवल्यामुळे पाय कापावा लागला व नंतर मृत्यू झाल्याचा ‘इन्सीडंट रिपोर्ट’ मध्ये गंभीर आरोप.

बनावट सह्यांचे प्रकरण: विद्यार्थ्यांच्या संमतीविना कागदपत्रांवर बनावट सह्या करून पीजी मार्गदर्शक बदलल्याच्या प्रकरणाची थेट महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट)कडे ५ मार्च २०२६ रोजी तक्रार.

मानसिक छळ: निवासी विद्यार्थ्यांचा वैयक्तिक कामांसाठी मानसिक छळ; विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रबंध विषय न देता सूडबुद्धीने वागणूक दिल्याची चर्चा.

वादग्रस्त पूर्वेतिहास: २०१९ मध्येही अंतर्गत राजकारणातून एका विद्यार्थ्याला (डॉ. कांता राजू) जाणीवपूर्वक नापास केल्याचा तत्कालीन चौकशी समितीचा ठपका.

या सर्व प्रकरणाबाबत माहिती घेऊन संबधित विभागात चौकशी करून योग्य कारवाई लवकरात लवकर करण्यात येईल. -डॉ.अजय भंडारवार (अधिष्ठाता सर जे.जे.रुग्णालय) संबधित निवासी डॉक्टराना वरिष्ठ डॉक्टरांकडुन होत असलेल्या त्रासाबाबत माहिती घेण्यात येईल व या प्रकरणी मार्ड संघटना डॉक्टरांच्या मागे खंबीरपणे उभी राहिली. -डॉ. विनायक शहा (अध्यक्ष, मार्ड संघटना, सर जे.जे.रुग्णालय)

एसटीतून प्रवास करताना सवलतीचा लाभ घेताय? तर आता तुमचंही होणार सर्वेक्षण

Web Title: Jj hospital orthopedics doctor nitin mahajan harassment allegations marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 05:51 PM

Topics:  

  • J J Hospital Mumbai
  • Mumbai
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mumbai News: ध्वनिप्रदूषणावर मुंबई हायकोर्टाची सुमोटो दखल! उत्सवांचा अधिकार आहे; पण नागरिकांच्या हक्कांवर गदा नको
1

Mumbai News: ध्वनिप्रदूषणावर मुंबई हायकोर्टाची सुमोटो दखल! उत्सवांचा अधिकार आहे; पण नागरिकांच्या हक्कांवर गदा नको

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या विसर्जनानंतर विद्यार्थ्यांनी उचलला स्वच्छतेचा विडा; गिरगाव चौपाटीवर राबवली मोहीम
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या विसर्जनानंतर विद्यार्थ्यांनी उचलला स्वच्छतेचा विडा; गिरगाव चौपाटीवर राबवली मोहीम

‘संपूर्ण महाराष्ट्रात एक हजार रोजगार मेळावे…’; Mangal Prabhat Lodha यांचे तरुणांना आवाहन
3

‘संपूर्ण महाराष्ट्रात एक हजार रोजगार मेळावे…’; Mangal Prabhat Lodha यांचे तरुणांना आवाहन

Mumbai News : मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये जेवणात आढळले झुरळ; नामांकित डॉक्टरांसोबत घडला धक्कादायक प्रकार
4

Mumbai News : मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये जेवणात आढळले झुरळ; नामांकित डॉक्टरांसोबत घडला धक्कादायक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.