सहलीत उलटी आणि बेशुद्ध, १३ वर्षांच्या आयुषच्या मृत्यूचं खरं कारण समोर
नवी मुंबईतील महापालिकेच्या शाळेच्या पिकनिकसाठी गेलेल्या एका विद्यार्थ्याचा काल मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. नवी मुंबईतील मनपा शाळा क्रमांक ७६ची पिकनिक काल खोपोली येथील इमॅजिका येथे गेली होती. या सहलीमध्ये इयत्ता आठवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय आयुष सिंग या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास आयुषला उलटी झाली आणि तो बेशुद्ध झाला होता. त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
दरम्यान, आयुषचा मृत्यू कशामुळे झाला? याची प्राथमिक माहिती आता समोर आली आहे. १३ वर्षीय आयुष सिंग याचा मृत्यू उष्माघाताने झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, खोपोली येथील इमॅजिका वॉटर पार्कमध्ये ही दुर्दैवी घटना घडली. वॉटर पार्कमध्ये इतर मुलांसोबत राईड खेळून झाल्यानंतर हा मुलगा थकला होता, त्यानंतर त्याला अचानक उलट्या सुरू झाल्या. स्थानिक डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला अॅम्ब्युलन्सद्वारे रुग्णालयात पाठवण्याचा प्रयत्न केला गेला, पण वाटेमध्येच मुलाचा मृत्यू झाला, अशी माहिती देण्यात आली होती पण आयुषचा मृत्यू उष्माघाताने झाला असल्याची प्राथमिक माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
पेण येथील वरवणे येथील शासकीय आश्रमशाळेत शिकत असलेल्या नऊ वर्षाच्या मुलीचा मृत्यू शासनाच्या बेजबाबदार पणामुळे झाला असल्याचा आरोप पेण तालुक्यातील जेष्ठ सामाजिक कार्यक्रर्त्या नंदा म्हात्रे यांनी केला आहे. राजीव गांधी पंचायतराज संघटन यांच्या माध्यमातून खुशबू ठाकरे मृत्यू प्रकरणी सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत. दरम्यान,या प्रकरणी राज्याचे आरोग्य मंत्री आणि आदिवासी विकास मंत्री यांनी मागील एका महिन्यात कोणत्याही प्रकारचे ठोस निर्णय घेतले नाहीत आणि त्यामुळे सरकार हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आमचा जाहीर आरोप आहे. त्यामुळे राज्याचे आरोग्य मंत्री आणि आदिवासी विकास मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी आम्ही आग्रही मागणी केली असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या नंदा म्हात्रे यांनी केली आहे.
खुशबू ठाकरे हिचा मृत्यूला आरोग्यमंत्री जबाबदार पुरेशी आरोग्य यंत्रणा नसतांना कुष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्र सारखे कुसुम अभियान राबवत आहे.सरकार आपली पाठ थोपटून घेण्यासाठी कुसुम अभियान राबवत असल्याचा आरोप पेण तालुक्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागात कार्य करणाऱ्या राजीव गांधी पंचायतराज संघटन यांनी केली आहे. अशा अभियानात दरम्यान झालेल्या तपासणी दरम्यान योग्य निदान तथा उपचारादरम्यान आवश्यक तज्ञांचा सहभाग घेतला गेलेला नाही हे सुदृढ असलेल्या खुशबू चे मृत्यूमुळे सिद्ध झाले आहे.निर्मल अभियानात वरवणे येथील शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या चौथी मधील खुशबू ठाकरे या विद्यार्थिनीला औषध सुरू केल्यानंतर औषधांमुळे तीच्या किडनी आणि यकृतावर होणारे दुष्परिणाम झाले.यकृताला सूज आल्याने कुष्टरोगावरील औषधे बंद करण्याची नामुष्की आली आणि नंतर त्यातुन खुशबूला आपला जीव गमवावा लागला आहे.