Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्राच्या जलसुरक्षेवर उष्णसंकट! कोकण-गोव्यात उष्ण मान्सून हवामान पट्टा वाढला

महाराष्ट्रातील बदलत्या हवामानामुळे जलव्यवस्थापनासमोर नवी आव्हाने निर्माण होण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन तापमानाच्या नोंदींच्या अभ्यासातून राज्यातील काही भागांच्या हवामान स्वरूपात बदल झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याचे नियोजन करताना बदलत्या हवामानाचाही विचार करावा लागणार आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 03, 2026 | 10:21 AM
Ladakh : लडाखमधील २८ सामरिक ठिकाणे भारताच्या नकाशावर; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Ladakh : लडाखमधील २८ सामरिक ठिकाणे भारताच्या नकाशावर; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्रातील काही भागांच्या हवामान वर्गीकरणात दीर्घकालीन बदलाची नोंद
  • कोकण आणि गोवा भागात उष्ण मान्सून हवामान पट्ट्याचा विस्तार
  • वाढते तापमान आणि बदलत्या पावसामुळे पाणलोट क्षेत्रांच्या नियोजनाकडे अधिक लक्ष देण्याची गरज
मुंबई : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाळ्यात घट दिसून आली असून, आता नवे संकटही घोंगावत आहे. पश्चिम विदर्भ, मराठवाड्यात अर्ध शुष्क अन् कोकण-गोव्यात उष्ण मान्सून हवामान पट्टयात वाढ होत असल्याचे संकेत असून, त्यामुळे बाष्पीभवन वेगाने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी आधीच पाणलोटक्षेत्रात साठा कमी असताना वेगाने बाष्पीभवन झाल्यास पाणीटंचाईची तीव्रता वाढणार आहे. भारताच्या हवामान क्षेत्रांच्या स्वरूपात दीर्घकालीन बदल होत असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या ‘मौसम’ या संशोधन अभ्यासातून समोर आले आहे.

या संशोधनात महाराष्ट्रातील पश्चिम विदर्भआणि मराठवाड्याचा समावेश अर्ध-शुष्क हवामानाच्या पट्टधात झाल्याचे, तर कोकण आणि गोवा भागात उष्ण मान्सून हवामानाचा पट्टा वाढल्याचे अभ्यासात नोंदवले आहे. यामुळे आता मुंबईसह महाराष्ट्रातील धरणे, तलाव, पिण्याच्या पाण्याचे स्रोत आणि पाणलोट क्षेत्रांचे नियोजन बदलत्या हवामानाच्या दृष्टिकोनातून तपासण्याची गरज अधिक ठळक होत आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांच्यासह पाच शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात १९५१ ते २०२० या कालावधीतील तापमानाच्या नोंदीचे निरिक्षण मांडले.

Mumbai News: रेल्वे स्थानकातच मिळणार किराणा, झेरॉक्स! नायगाव, विरार स्थानकातील मोकळ्या जागेत व्यावसायिक कियोस्क

हवामानाचा विचार करावा लागणार

पावसाचे प्रमाण, तीव्रता किवा वितरण बदलल्यास चरणांच्या पाणलोट क्षेत्रांत जमा होणा-या पाण्यावर परिणाम होऊ शकतो. कमी कालावधीत अतिवृष्टी झाल्यास मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाण्याची शक्यता असते, तर पावसातील खंडामुळे जलसाठ्यांची पुनर्भरण प्रक्रियेवर परिणाम होऊ शकते. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढण्याचीही शक्यता असते. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमान, तापमान आणि बाष्पीभवनाचे दीर्घकालीन निरीक्षण अधिक महत्वाचे ठरते. मराठवाड़ा आणि विदर्भातील जलसाठ्यांसाठीही पाणी उपलब्धतेचे अंदाज, भूजल पुनर्भरण आणि सिंचनाचे नियोजन करताना बदलत्या हवामानाचा विचार करावा लागेल.

महाराष्ट्राच्या जलसुरक्षेचा प्रश्न

संशोधनानुसार, १९६१-१९९० या कालखंडाच्या तुलनेत १९९१-२०२० या कालखंडात पश्चिम विदर्भआणि मराठवाडयाचा हवामान वर्ग उष्ण स्वरूपाकडून अर्ध-शुष्क हवामानाकडे बदलल्याचे दिसते. तर दुसरीकडे, कोकण आणि गोवा विभागात उष्ण मान्सून हवामान क्षेत्राचा विस्तार नोंदवण्यात आला आहे. हे निष्कर्ष महाराष्ट्रातील सर्व भागांमध्ये पाणीटंचाई वाढल्याचे बेट सिद्ध करत नसले तरी प्रादेशिक हवामानातील बदलांचा जलव्यवस्थापनाच्या दृष्टीने अभ्यास करण्याची गरज स्पष्ट करत आहेत.

मुंबईत घर खरेदीत झाली मोठी वाढ; सप्टेंबरमध्ये घर नोंदणीचा नोंदवला नवा उच्चांक

जुन्या सरासरी पुरेशा ठरणार?

हवामान क्षेत्राचे वर्गीकरण बदलणे आणि प्रत्यक्ष धरणसाठा घटणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जलसाठ्यांवर नेमका किती परिणाम होईल, हे ठरवण्यासाठी स्थानिक पर्जन्यमान, तापमान, बाष्पीभवन आणि पाणलोट क्षेत्रांच्या स्वतंत्र आकडेवारीचे विश्लेषण आवश्यक आहे. मात्र, पाण्याचे नियोजन करताना केवळ ऐतिहासिक सरासरीवर अवलंबून न राहता बदलत्या हवामानाचे संभाव्य परिणामही विचारात घेण्याची गरज या संशोधनामुळे स्पष्ट होत आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Ladakh 28 strategic places in india official map gogra hot springs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 10:21 AM

Topics:  

  • maharashtra
  • NAVARASHTRA
  • Weather

संबंधित बातम्या

चीनला धक्का? लडाखमधील 28 ठिकाणांची नावे आता भारताच्या अधिकृत नकाशावर; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश
1

चीनला धक्का? लडाखमधील 28 ठिकाणांची नावे आता भारताच्या अधिकृत नकाशावर; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश

Gondiya News: गोंदियात ‘राहुल गांधीं’नी थांबवली गाडी; कार्यकर्त्याशी साधला संवाद! मृत आदिवासी मुलांच्या कुटुंबीयांची घेतली भेट
2

Gondiya News: गोंदियात ‘राहुल गांधीं’नी थांबवली गाडी; कार्यकर्त्याशी साधला संवाद! मृत आदिवासी मुलांच्या कुटुंबीयांची घेतली भेट

ST Bus News: एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज! ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ पास आता घरबसल्या ऑनलाइन
3

ST Bus News: एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज! ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ पास आता घरबसल्या ऑनलाइन

Dombivli News: आणखी किती जणांचा जीव धोक्यात जाणार? गोग्रासवाडीतील अनधिकृत गोठ्याच्या दलदलीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
4

Dombivli News: आणखी किती जणांचा जीव धोक्यात जाणार? गोग्रासवाडीतील अनधिकृत गोठ्याच्या दलदलीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.