Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाखो रुपयांची सक्शन कम जेटिंग मशीन धूळखात; दौंड नगरपरिषदेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

: दौंड नगरपरिषद आरोग्य विभागाची नवीन सक्शन कम जेटिंग मशीन मागील सहा महिन्यांपासून धूळखात पडून आहे. लाखो रुपये खर्चून खरेदी केलेली मशीन वॉटर ट्रीटमेंट प्लांटवर पडून असल्याने नागरिकांच्या पैशांचा अपव्यय होत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 19, 2026 | 03:56 PM
लाखो रुपयांची सक्शन कम जेटिंग मशीन धूळखात; दौंड नगरपरिषदेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

लाखो रुपयांची सक्शन कम जेटिंग मशीन धूळखात; दौंड नगरपरिषदेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

Follow Us
Follow Us:
  • लाखो रुपयांची सक्शन कम जेटिंग मशीन धूळखात
  •  दौंड नगरपरिषदेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
  • स्वाती सावंत यांनी प्रशासनला विचारला जाब
पाटस : दौंड नगरपरिषद आरोग्य विभागाची नवीन सक्शन कम जेटिंग मशीन मागील सहा महिन्यांपासून धूळखात पडून आहे. लाखो रुपये खर्चून खरेदी केलेली मशीन वॉटर ट्रीटमेंट प्लांटवर पडून असल्याने नागरिकांच्या पैशांचा अपव्यय होत आहे. स्वच्छतेअभावी नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच, या प्रश्नाबाबत नगरसेविका स्वाती सावंत यांनी नगरपरिषद प्रशासनला याबाबत निवदेनाद्वारे जाब विचारला आहे. तसेच हा प्रश्न त्वरित मार्गी लावण्याची मागणी केली आहे.

 

निवेदनात म्हटले आहे, दौंड नगरपरिषदेच्या आरोग्य विभागासाठी शहरातील सांडपाणी वाहिन्यांची स्वच्छता, तुंबलेल्या ड्रेनेज लाईन मोकळ्या करणे तसेच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या ड्रेनेजच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी नवीन सक्शन कम जेटिंग मशीन लाखो रुपये खर्च करून खरेदी करण्यात आली आहे. मात्र, ही मशीन सध्या वॉटर ट्रीटमेंट प्लांट परिसरात धूळखात का पडून असल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

शहरातील ड्रेनेज लाईन तुंबणे, सांडपाण्याचा निचरा न होणे, अस्वच्छता आणि दुर्गंधी अशा समस्या वारंवार निर्माण होत असताना ही अत्याधुनिक मशीन प्रत्यक्ष कामासाठी वापरात का आणली जात नाही, असा सवाल नागरिक विचारत आहेत. नगरपरिषदेने कररुपाने जमा होणाऱ्या पैशातून लाखो रुपये खर्च करून मशीन खरेदी केली असेल, तर तिचा उपयोग शहराच्या स्वच्छतेसाठी होणे अपेक्षित आहे. मात्र, मशीन वापराविना पडून असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

या मशीनसाठी चालक, ऑपरेटर तसेच आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती कधी करणार? मशीनच्या वापराबाबत नियोजन सहा महिने उलटून गेले तरी का केले नाही? तसेच मशीन कार्यान्वित न होण्यामागील नेमकी कारणे काय आहेत? असे प्रश्न नगरसेविका सावंत यांनी उपस्थित केले आहेत.

हे सुद्धा वाचा : २४x७ पाणीपुरवठ्यावर १,६०० कोटी खर्च, तरी पाणीगळती सुरु; अमोल बालवडकरांचा भाजपवर निशाणा

गटाराचे पाणी नागरिकांच्या घरात

“माझ्या प्रभागात ड्रेनेजमुळे लोकांच्या घरात पाणी जात आहे. सक्शन जेटिंग मशीन सुरू नसल्याने आणि ओपन गटार असल्याने पाणी वाहत आहे. नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी आणि आरोग्य विभागाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन मशीनची प्रत्यक्ष पाहणी करावी, ती त्वरित कार्यान्वित करावी आणि शहरातील ड्रेनेज स्वच्छतेसाठी तिचा नियमित वापर सुरू करावा, अशी मागणी असल्याचे नगरसेविका सावंत यांनी केली आहे. “जनतेच्या पैशातून खरेदी केलेली यंत्रसामग्री धूळखात पडण्यासाठी नव्हे, तर जनतेच्या सेवेसाठी वापरण्यासाठी आहे. याबाबत नगरप्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी,” अशी मागणीही सावंत यांनी केली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: दौंड नगरपरिषदेची सक्शन कम जेटिंग मशीन का चर्चेत आली आहे?

    Ans: दौंड नगरपरिषदेच्या आरोग्य विभागासाठी लाखो रुपये खर्चून खरेदी केलेली सक्शन कम जेटिंग मशीन मागील सहा महिन्यांपासून वॉटर ट्रीटमेंट प्लांट परिसरात वापराविना पडून असल्याने हा प्रश्न चर्चेत आला आहे.

  • Que: नगरसेविका स्वाती सावंत यांनी कोणती मागणी केली आहे?

    Ans: मशीनची तातडीने पाहणी करून ती कार्यरत करावी आणि शहरातील ड्रेनेज स्वच्छतेसाठी नियमित वापर सुरू करावा, अशी मागणी स्वाती सावंत यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे केली आहे. तसेच चालक, ऑपरेटर आणि आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

  • Que: मशीन वापरात नसल्याने नागरिकांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे?

    Ans: शहरातील ड्रेनेज लाईन तुंबणे, सांडपाण्याचा निचरा न होणे, अस्वच्छता आणि दुर्गंधीच्या समस्या निर्माण होत आहेत. काही ठिकाणी गटाराचे पाणी नागरिकांच्या घरात जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

Web Title: The daund municipal council health departments new suction cum jetting machine is lying idle and gathering dust nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 03:56 PM

Topics:  

  • Daund
  • Daund News
  • maharashtra

संबंधित बातम्या

Dharashiv News: १५५ कामांची पडताळणी होऊनही संशय कायम! ‘नाम फाउंडेशन’च्या कामांवर योजनेचा निधी खर्च केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
1

Dharashiv News: १५५ कामांची पडताळणी होऊनही संशय कायम! ‘नाम फाउंडेशन’च्या कामांवर योजनेचा निधी खर्च केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

Water Supply: चिपळूणकरांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार? कोळकेवाडी ग्रॅव्हिटी योजनेतील अडचणी सोडवण्यासाठी भास्कर जाधव सरसावले
2

Water Supply: चिपळूणकरांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार? कोळकेवाडी ग्रॅव्हिटी योजनेतील अडचणी सोडवण्यासाठी भास्कर जाधव सरसावले

Nagpur News: महाराष्ट्रात अद्ययावत ॲम्ब्युलन्स सेवा सुरू होणार; रुग्णवाहिकेतच मिळणार ICU आणि डॉक्टरांची सुविधा
3

Nagpur News: महाराष्ट्रात अद्ययावत ॲम्ब्युलन्स सेवा सुरू होणार; रुग्णवाहिकेतच मिळणार ICU आणि डॉक्टरांची सुविधा

ST Employees: एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडणार? डिसेंबरचा पगार देण्यासाठी १६५ कोटींची तूट; कर्मचारी काँग्रेसची सरकारकडे मागणी
4

ST Employees: एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडणार? डिसेंबरचा पगार देण्यासाठी १६५ कोटींची तूट; कर्मचारी काँग्रेसची सरकारकडे मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.