देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ
Maharashtra New CM Swearing-in Ceremony Live Updates: महाराष्ट्रात आज (5 डिसेंबर) महायुतीचे सरकार स्थापन होणार असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. याशिवाय दोन उपमुख्यमंत्रीही शपथ घेणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री पदासाठी संघर्ष सुरू होता. काल म्हणजेच बुधवारी हा संघर्ष अखेर थांबला. फडणवीस यांची एकमताने विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. याचपार्श्वभीवर मुंबईतील आझाद मैदानावर आज (5 डिसेंबर) संध्याकाळी 5.30 वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय 19 राज्यांचे मुख्यमंत्रीही सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात सुमारे 40 हजार लोक सहभागी होण्याची शक्यता आहे. २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका झाल्या आणि २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर झाला. महायुतीने निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत 132 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. याशिवाय शिंदे यांच्या शिवसेनेला 57 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या आहेत.
05 Dec 2024 05:44 PM (IST)
अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची घेतली शपथ
05 Dec 2024 05:41 PM (IST)
एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची घेतली शपथ
05 Dec 2024 05:36 PM (IST)
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
05 Dec 2024 05:34 PM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपीठावर उपस्थित झाले असून थोड्याच वेळातच देवेंद्र फडणीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील.
05 Dec 2024 05:32 PM (IST)
शपथविधी सोहळ्यासाठी अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित आहेत.
#WATCH | Mumbai | Union Home Minister Amit Shah, BJP national president JP Nadda, Defence Minister Rajnath Singh, UP CM Yogi Adityanath and CMs & Deputy CMs of NDA-ruled states, Union Ministers, NDA leaders present at Maharashtra government swearing-in ceremony
(Video source:… pic.twitter.com/FHnNm3QKkX
— ANI (@ANI) December 5, 2024
05 Dec 2024 05:23 PM (IST)
देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे व्यासपीठावर उपस्थित झाले आहेत.
05 Dec 2024 05:05 PM (IST)
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी आईचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांना त्यांच्या आईने औक्षण करून टिळक लावला अन् आशीर्वाद दिले.
मायेचे औक्षण!
आईच्या आशीर्वादाने नव्या पर्वाचा आरंभ...#Maharashtra #Mumbai #OathCeremony pic.twitter.com/oayX9xcF4a— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 5, 2024
05 Dec 2024 05:03 PM (IST)
गृहमंत्री अमित शहा व्यासपीठावर उपस्थित झाले आहे. तप पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा ही मुंबईत दाखल झाला आहे.
05 Dec 2024 04:51 PM (IST)
शपथविधीसाठी मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आलाय. दरम्यान या सोहळ्यासाठी मुंबई बाहेर वाहने आली असल्याने शहरातील ट्रफिक वाढलंय. वाहतूक कोंडीचा फटका काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना बसला आहे.
05 Dec 2024 04:48 PM (IST)
मुख्यमंत्रीपदासाठी नामांकित देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शपथविधी सोहळ्यापूर्वी सांगितले की, “देवेंद्रजी सहाव्यांदा आमदार झाले आहेत. आता ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत. आनंदापेक्षा जबाबदारीची भावना आहे कारण त्यांना महाराष्ट्रातील लोकांसाठी खूप काम करायचे आहे.”
05 Dec 2024 04:09 PM (IST)
शिवसेना नेते उदय सामंत, भरत गोगावले हे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर गेले होते. या भेटीनंतर त्यांनी एकनाथ शिंदे हे आज संध्याकाळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं जाहीर केलं. तसंच शपथविधी संदर्भातील पत्र राज्यपालांना दिल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
05 Dec 2024 03:46 PM (IST)
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महायुतीच्या शपथविधी सोहळ्यासाठी मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत. शपथविधीआधी ते भाजप आणि महायुतीच्या नेत्यांसोबत बैठक घेणार असल्याची माहिती आहे.
05 Dec 2024 03:19 PM (IST)
शपथविधी समारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन तास वीस मिनिटांचा मुंबई दौरा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी चार वाजून 35 मिनिटांनी मुंबई विमानतळावर उतरणार .तसेच हेलिकॉप्टरने आय एम एस शिखरा हेलिपॅड येथे जाणार आहे.
05 Dec 2024 02:34 PM (IST)
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याबाबतचं पत्र थोड्याच वेळात राजभवनवर जाणार आहे. तर याबाबतची माहिती शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी देखील थोड्या वेळापूर्वी दिली होती. त्यामुळे आता अखेर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही याबाबतचा सस्पेन्स अखेर संपला आहे.
05 Dec 2024 02:27 PM (IST)
महाराष्ट्रातील महायुती मित्र पक्षाचे मंत्री आठवडाभरात शपथ घेतील, असे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी गुरुवारी सांगितले. पत्रकारांशी बोलताना भुजबळ म्हणाले की, सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांची अर्थखात्यावर चांगली पकड आहे.
05 Dec 2024 02:27 PM (IST)
शपथविधीपूर्वी शिवसेना नेते उदय सामंत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. शिंदे उपमुख्यमंत्री झाले नाहीत तर शिवसेनेतील कोणीही उपमुख्यमंत्री होणार नाही, असे सामंत यांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्रीपदासाठी शिंदे यांनी अद्याप संमती दिलेली नाही.
05 Dec 2024 02:26 PM (IST)
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग यांनी महाराष्ट्राचे नामनिर्देशित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी समारंभात सांगितले की, महाराष्ट्रातील जनतेने भाजप आणि पंतप्रधान मोदींना खुलेआम आशीर्वाद दिला आहे. हा आशीर्वाद म्हणजे पंतप्रधानांच्या कामांसाठी आणि गरीब आणि मागासलेल्या लोकांसाठीच्या योजनांसाठी जनतेचा आदेश आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे पंतप्रधान मोदींचे गरीब आणि मागासवर्गीयांसाठीचे व्हिजन पुढे नेतील.
05 Dec 2024 02:24 PM (IST)
उपमुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांनी अद्याप संमती दिलेली नाही. शिंदे यांना भेटण्यासाठी पक्षातील पाच बडे नेते आले आहेत. शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे, अशी शिवसेना नेत्यांची मागणी आहे.
05 Dec 2024 01:58 PM (IST)
"एकनाथ शिंदे आमची विनंती ऐकतील आणि ते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, आमचा विश्वास आहे. ते आमचे नेते आहेत आणि त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी, अशी आमची इच्छा आहे. आम्ही सर्व एकनाथ शिंदे यांच्याकडे जात आहोत, आम्ही त्यांना पटवून शपथविधीसाठी तयार करू, असं शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी सांगितले.
05 Dec 2024 01:14 PM (IST)
शपथविधी सोहळ्याच्या पत्रिकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नावाचा उल्लेख असून याच पत्रिकेवर मात्र एकनाथ शिंदे यांचं नाव नसल्याचे पहायला मिळत आहे.
05 Dec 2024 12:56 PM (IST)
शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर म्हणाले की, आम्ही सर्व आमदार काल एकत्र येऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि त्यांना मंत्रिमंडळात सहभागी करून घ्यावे, अशी विनंती आम्ही सर्वांनी केली. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे. यावर सकारात्मक विचार करण्याचे त्यांनी मान्य केले आहे. आमचे पक्ष वेगवेगळे असले तरी आमची विचारसरणी आणि तत्वे एकच आहेत. आमच्यासाठीही नेते म्हणजे पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. आमचे सर्वोच्च नेते एकनाथ शिंदे आहेत पण त्यांच्या वरती आम्ही पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारतो. आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत.
05 Dec 2024 12:49 PM (IST)
राज्याचे नावनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे पदभार स्वीकारल्यानंतर प्रथेनुसार ठिक 6.30 वाजता पत्रकार कक्षास भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधतील.
05 Dec 2024 12:44 PM (IST)
शपथविधी सोहळ्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर गोमातांचं पूजन केलं जात आहे. हिंदू धर्मात कोणत्याही शुभप्रसंगी गोमातांचं पूजन केलं जातं.
#WATCH | Mumbai: Maharashtra CM-designate Devendra Fadnvais arrives at his residence after offering prayers at Shree Siddhivinayak Temple and Shree Mumbadevi Temple, ahead of his swearing-in ceremony today. pic.twitter.com/kga0czysoX
— ANI (@ANI) December 5, 2024
05 Dec 2024 12:18 PM (IST)
7 तारखेला इतर मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज भवनात उर्वरित मंत्र्यांचा शपथ विधी होणार असल्याची माहिती आहे. आज तीन जणांच्या शपथ विधीनंतर उर्वरित मंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम मुंबईत होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
05 Dec 2024 12:10 PM (IST)
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी सिद्धिविनायक आणि मुंबादेवीचं दर्शन घेतले.
05 Dec 2024 12:08 PM (IST)
फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा मुंबईत पोहोचले आहेत. मुंबईला पोहोचल्यानंतर त्यांनी सिद्धिविनायक मंदिर गाठले. महायुती आणि भाजपच्या विजयानिमित्त मंदिर परिसरात लाडू वाटण्यात आले.
05 Dec 2024 12:07 PM (IST)
देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याला शरद पवार आणि उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नाहीत.
05 Dec 2024 12:01 PM (IST)
शपथ घेण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणेशाचे दर्शन घेतील. फडणवीस सकाळी साडेअकरा वाजता मंदिरात पोहोचतील.
05 Dec 2024 12:00 PM (IST)
शिवसेना उद्धव गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. शिंदे कधीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. हे लोक एकनाथ शिंदे यांचा पक्षही फोडू शकतात, असे राऊत म्हणाले. शिंदे यांचे युग आता संपले आहे, ते फक्त दोन वर्षे टिकले.
#WATCH | Delhi: Ahead of the swearing-in ceremony of Maharashtra CM-designate Devendra Fadnavis today, Shiv Sena (UBT) leader Sanjay Raut says, "Shinde era is over, it was just for two years. His usage is now over and he has been tossed aside. Shinde will never be the CM of this… pic.twitter.com/4kyySN4uEZ
— ANI (@ANI) December 5, 2024
05 Dec 2024 11:59 AM (IST)
२० नोव्हेंबरला महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका झाल्या आणि २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर झाला. महायुतीने निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला होता. 132 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. याशिवाय शिंदे यांच्या शिवसेनेला 57 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या आहेत
05 Dec 2024 11:58 AM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय 19 राज्यांचे मुख्यमंत्रीही सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात सुमारे 40 हजार लोक सहभागी होण्याची शक्यता आहे.
05 Dec 2024 11:58 AM (IST)
फडणवीस यांच्यासोबत महाराष्ट्र सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्रीही असतील. यापैकी एक नाव राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे, तर दुसरे नाव एकनाथ शिंदे यांचे असल्याचे मानले जात आहे. यापूर्वी त्यांच्या नावावर काहीही स्पष्ट नव्हते पण आता शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे निश्चित झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
05 Dec 2024 11:56 AM (IST)
देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत. महाराष्ट्र भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड झाल्याने त्यांचा तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांचा पहिला टर्म 2014 ते 2019 दरम्यान पाच वर्षांचा होता. त्यानंतर त्यांचा दुसरा टर्म नोव्हेंबर 2019 मध्ये सुमारे 80 तासांचा होता.