Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mangal Prabhat Lodha यांनी केला केईएम रूग्णालयाचा दौरा; गैरसोयीबाबत प्रशासनाला थेट…

रुग्णांच्या अडचणी सोडवून त्यांना सुविधा देण्याकरिता केईएममध्ये मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वात दक्षता समिती स्थापन करण्यात येणार असून यात नागरिकांचा ही समावेश करण्यात येणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 12, 2025 | 07:40 PM
Mangal Prabhat Lodha यांनी केला केईएम रूग्णालयाचा दौरा; गैरसोयीबाबत प्रशासनाला थेट...

Mangal Prabhat Lodha यांनी केला केईएम रूग्णालयाचा दौरा; गैरसोयीबाबत प्रशासनाला थेट...

Follow Us
Close
Follow Us:

केईएममध्ये नोंदीसाठी दहा नवी केंद्र
औषधांचा तुटवडा भरून काढणार
खाजगी एमआरआय ही पालिका दरानुसार करण्यासाठी निविदा काढणार

मुंबई: 
मुंबईचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केईएम रुग्णालयाचा पाहणी दौरा करून तिथल्या प्रशासनाला गैरसोयीबाबत धारेवर धरल्या नंतर आता तिथे व्यवस्थेत बदल करण्याचे आश्वासन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहे. येत्या १५ दिवसात  केईएम रुग्णालयात रुग्णांच्या नोंदीसाठी दहा नवी केंद्र उभारली जाणार आहेत. तसेच खाजगी एमआरआय ही पालिका दरानुसार करण्यासाठी निविदा काढली जाणार आहे. त्यामुळे रुग्णांचा पैसा आणि वेळ ही वाचणार आहे. के.ई.एम. रुग्णालयातील रुग्णांची गैरसोय, अपुऱ्या सुविधा, नागरिकांच्या सूचना आणि उपाययोजनांबाबत कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमित साटम यांची आज पालिका मुख्यालयात संयुक्त आढावा बैठक झाली. या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येत्या १५ दिवसात रुग्ण सेवा सुधारण्याचे आश्वासन दिले आहे.

केईएममध्ये होत असलेली नागरिकांची गैरसोय, आणि खाजगी चाचण्यांमुळे रुग्णांची लूट पाहून मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी तीव्र संताप व्यक्त करत डीन डॉ.संगीता रावत यांना जाब विचारला होता. यासंदर्भात मंत्री लोढा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रुग्णांच्या अनेक तक्रारींचा विचार करण्यात आला. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त  बिपिन शर्मा, उपायुक्त शरद उघडे, वैद्यकीय संचालक डॉ. नीलम अंद्राडे, केईएमच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, भाजप दक्षिण मुंबई अध्यक्षा श्रीमती शलाका साळवी आणि पदाधिकारी सतीश तिवारी उपस्थित होते.

दोन वर्ष पुरेल एवढा औषधांचा साठा

या बैठकीत औषधांच्या टंचाई बाबतही चर्चा करण्यात आली. यावर मंत्री लोढा आणि भाजप मुंबई अध्यक्ष साटम यांनी अधिकाऱ्यांना पुन्हा धारेवर धरले. या चर्चेदरम्यान पुढील दोन वर्ष आवश्यक औषधांचा साठा करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यांनतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर स्टॉक करण्याचे आश्वासन यावेळी दिले.

खाजगी एमआरआय ही पालिका दरानुसार
अनेक नागरिकांनी गेल्या अनेक महिन्यांपासून के.ई.एम एमआरआय मशीन नादुरुस्त असल्याची तक्रार केली होती. तब्बल सहा सहा महिने एमआरआयसाठी तारीख मिळत नसल्याचेही रुग्णांनी सांगितले होते. यावर मार्ग काढण्यासाठी जोंपर्यंत केईएम मधील एमआरआय मशीन दुरुस्त होऊन व्यवस्था सुरळीत होत नाही, तो पर्यंत खाजगी केंद्रात पाठवण्यात येणाऱ्या रुग्णांकडून महापालिकेच्या दरानुसारच एमआरआय चाचणीची आकारणी करावी, अशी सूचना यावेळी करण्यात आली. त्यानुसार पुढच्या सात दिवसात खाजगी एमआरआय केंद्रासाठी निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी दिली.

नागरिकांनी व्यक्त केलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर १० नोव्हेंबर रोजी के.ई.एम. रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांना दिलासा देण्यासाठी तात्काळ सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने आज मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार श्री.अमितजी साटम यांच्या… pic.twitter.com/J38uo1kgUE — Mangal Prabhat Lodha (@MPLodha) November 12, 2025

रुग्णांच्या अडचणी सोडवण्यासाठी दक्षता समिती
रुग्णांच्या अडचणी सोडवून त्यांना सुविधा देण्याकरिता केईएममध्ये मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वात दक्षता समिती स्थापन करण्यात येणार असून यात नागरिकांचा ही समावेश करण्यात येणार आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसात कूपर रुग्णालयात पूर्ण वेळ अधिष्ठाता नसल्याने तिथे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचा मुद्दाही या बैठकीत चर्चिला गेला. त्यावर माहिती देताना वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. नीलम अंद्राडे यांनी स्पष्ट केले की, लवकरच रिक्त पदे भरली जाणार असून तिथे पूर्ण वेळ अधिष्ठाता नेमण्यात येणार आहे.

“रूग्णांना योग्य वेळेत उपचार मिळाले नाही तर…”, मंगलप्रभात लोढा यांचा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी सांगितले की, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांचा बारकाईने पाठपुरावा करण्यात येणार असून त्यांना आवश्यक शासकीय साह्य ही देण्यात येईल. तसेच यापुढे तक्रारी येत असलेल्या पालिकेच्या अन्य रुग्णालयात ही पाहणी दौरा आयोजित केला जाईल. गेल्या २५ वर्षात महापालिकेची सत्ता उपभोगणाऱ्यानी जी दलाली आणि कुचकामी व्यवस्था उभारली आहे, ती व्यवस्था आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लवकरच मोडीत काढली जाईल,असेही मंत्री लोढा यांनी सांगितले.

Web Title: Mangal prabhat lodha and amit satam visit kem hospital and check all problems

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 07:37 PM

Topics:  

  • Mangal Prabhat Lodha
  • Mumbai News

संबंधित बातम्या

प्रवास होणार आणखी सुसाट! वर्सोवा कोस्टल रोड इतर रस्त्यांनाही जोडणार, मुंबई महानगरपालिका संपादित करणार ३५० हेक्टर जमीन
1

प्रवास होणार आणखी सुसाट! वर्सोवा कोस्टल रोड इतर रस्त्यांनाही जोडणार, मुंबई महानगरपालिका संपादित करणार ३५० हेक्टर जमीन

“रूग्णांना योग्य वेळेत उपचार मिळाले नाही तर…”, मंगलप्रभात लोढा यांचा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा
2

“रूग्णांना योग्य वेळेत उपचार मिळाले नाही तर…”, मंगलप्रभात लोढा यांचा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा

Mumbai News: महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर तब्बल 51, 582 झोपड्या, पुनर्विकास रखडला
3

Mumbai News: महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर तब्बल 51, 582 झोपड्या, पुनर्विकास रखडला

मुंबईतील पहिल्या थीम पार्कची दुरवस्था, निविदा प्रक्रियेमुळे रखडले उद्यानाचे काम
4

मुंबईतील पहिल्या थीम पार्कची दुरवस्था, निविदा प्रक्रियेमुळे रखडले उद्यानाचे काम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.