Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MLA अस्लम शेखांविरुद्ध नागरिक एकवटणार; बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात मालवणीत मोर्चा

राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा सातत्याने मुंबईच्या सुरक्षेबाबत भाष्य करत असतात. तसेच ते सातत्याने रोहिंगे आणि घुसखोर बांग्लादेशींचा मुद्दा उचलून धरताना आपल्याला पाहायला मिळते.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 22, 2025 | 07:49 PM
MLA अस्लम शेखांविरुद्ध नागरिक एकवटणार;  बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात मालवणीत मोर्चा
Follow Us
Close
Follow Us:

रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात उद्या मालवणीत मोर्चा
शेख यांच्या घरासमोर स्थानिक नागरिक एकवटणार
अस्लम शेख यांनी मंत्री लोढा यांना दिली धमकी 

मुंबई/Mangal Prabhat Lodha: बांगलादेशी आणि रोहिंग्यांची मुंबईत मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत असून या विरोधातील लढा आता अधिक तीव्र होत आहे. यासंदर्भात मालवणी मध्ये स्थानिक नागरिक उद्या रविवार 23 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता मालवणी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढणार आहेत. तसेच स्थानिक काँग्रेस आमदार अस्लम शेख यांच्या घरावरही मोर्चा नेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबईच्या सुरक्षेसंदर्भात सातत्याने रोहिंगे आणि घुसखोर बांग्लादेशींचा मुद्दा उचलून धरणारे मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना मालाड मालवणीचे काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी संपवण्याची धमकी दिल्याचे प्रकरण समाज माध्यमात चर्चिले जात आहे. यासंदर्भात मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे पत्र लिहून तक्रार देखील केली आहे.

दरम्यान अस्लम शेख यांच्या धमकी नंतर अनेक स्थानिक नागरिकांनीही संताप व्यक्त केला आहे. या मोर्चाच्या निमित्ताने स्थानिक नागरिकांनीही आता घुसखोर बांग्लादेशीं विरोधातील मोहिमेत सहभाग घेतल्याचे दिसून येत आहे. राज्याच्या मंत्र्यांना संपवण्याची धमकी देणे हे अतिशय गंभीर असून यावर कडक कारवाईची मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष अमितजी साटम यांनी केली आहे. घुसखोर बंगलादेशी आणि रोहिंग्यांना वसवून त्यांच्या मतांवर आमदारकीचा मिळवण्याचा नाव मालवणी पॅटर्न राबवला जात असून , आम्ही आता हा पॅटर्न उखडून फेकणार आहोत, या शब्दात साटम यांनी आपला संताप व्यक्त केला होता.

Mangal Prabhat Lodha: ४५ ‘आयटीआय’मध्ये सुसज्ज प्रयोगशाळा अन् 8 हजार…; Toyota सोबतचा करार काय?

अस्लम शेख यांची मंत्री लोढा यांना धमकी

राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा सातत्याने मुंबईच्या सुरक्षेबाबत भाष्य करत असतात. तसेच ते सातत्याने रोहिंगे आणि घुसखोर बांग्लादेशींचा मुद्दा उचलून धरताना आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान याच कारणावरून मुंबईमधील कॉँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी मंत्री मंगल प्रभात लोढा यांना संपवण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले मंत्री लोढा? 

मालाड मालवणीचे आमदार अस्लम शेख यांनी मला व माझ्या कुटुंबाला दिलेल्या धमकी विरुद्ध कारवाई करण्याची विनंती मुंबई पोलीस आयुक्त श्री देवेन भारती जी यांना पत्राद्वारे केली. आमदार अस्लम शेख सारख्या विघटनवादी शक्तींनी कितीही धमक्या दिल्या तरी देशाच्या सुरक्षेच्या मुद्यावर कसलीही तमा न बाळगता रोहिंगे आणि घुसखोर बांग्लादेशींच्या विरोधात कठोर कारवाईचा पाठपुरावा करत राहणार आहे.

जीवे मारण्याची धमकी मिळताच मंत्री लोढा आक्रमक; म्हणाले, “अस्लम शेख सारख्या विघटनवादी…”

अमित साटम यांनी व्यक्त केला संताप

मालाड – मालवणीचे आमदार हे सातत्याने रोहिंगे आणि बांग्लादेशींच्या घुसखोरीला प्राधान्य देऊन त्यांनी मालवणी पॅटर्न राबवला आहे. चौक सभा घेऊन त्यांनी दिलेल्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. उलट त्यांचा मालवणी पॅटर्न आम्ही मुळापासून उपटून टाकणार आहोत,असा संताप मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी व्यक्त केला आहे. मंत्री लोढा यांनी दाखल केलेल्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन मुंबई पोलीस आयुक्तांनी कठोर कारवाई करावी.

 

Web Title: Mangal prabhat lodha protest in malvani against infiltration of bangladeshis rohingyas front of aslam sheikh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2025 | 07:49 PM

Topics:  

  • Aslam Sheikh
  • Bangladesh News
  • Mangal Prabhat Lodha

संबंधित बातम्या

जीवे मारण्याची धमकी मिळताच मंत्री लोढा आक्रमक; म्हणाले, “अस्लम शेख सारख्या विघटनवादी…”
1

जीवे मारण्याची धमकी मिळताच मंत्री लोढा आक्रमक; म्हणाले, “अस्लम शेख सारख्या विघटनवादी…”

Mangal Prabhat Lodha: ४५ ‘आयटीआय’मध्ये सुसज्ज प्रयोगशाळा अन् 8 हजार…; Toyota सोबतचा करार काय?
2

Mangal Prabhat Lodha: ४५ ‘आयटीआय’मध्ये सुसज्ज प्रयोगशाळा अन् 8 हजार…; Toyota सोबतचा करार काय?

8 हजार विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी! मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली Toyota Kirloskar Motor आणि ITI मध्ये सामंजस्य करार
3

8 हजार विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी! मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली Toyota Kirloskar Motor आणि ITI मध्ये सामंजस्य करार

“राज्य शासनाकडे ‘आयटीआय’च्या माध्यमातून…”; काय म्हणाले मंत्री Managl Prabhat Lodha?
4

“राज्य शासनाकडे ‘आयटीआय’च्या माध्यमातून…”; काय म्हणाले मंत्री Managl Prabhat Lodha?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.