Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यानंतर आता मुंबईतही पेटकेअर प्रशिक्षण संस्था? मंत्री Mangal Prabhat Lodha यांचा पुढाकार

Mangal Prabhat Lodha: पेटकेअर एज्युकेशन अँड ट्रेनिंग इकोसिस्टिम (PETE) हा पाळीव प्राण्यांची देखभाल आणि प्राणी कल्याणाच्या क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 12, 2026 | 06:19 PM
मुंबईतही सुरू होणार पेटकेअर शिक्षण व प्रशिक्षण संस्था 

मुंबईतही सुरू होणार पेटकेअर शिक्षण व प्रशिक्षण संस्था 

Follow Us
Follow Us:
  • मुंबईतही सुरू होणार पेटकेअर शिक्षण व प्रशिक्षण संस्था 
  • मुंबईतील संस्थेसाठी प्राणीप्रेमी व नागरिकांनी गुगल फॉर्मद्वारे सूचना व हरकती नोंदवाव्यात
  • आयटीआयमध्ये पेटकेअरविषयक विशेष अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस
मुंबई/Mangal Prabhat Lodha: पुण्यात नुकतीच पेटकेअर एज्युकेशन अँड ट्रेनिंग संस्थेची सुरुवात करण्यात आली असून, याच धर्तीवर मुंबईतही पेटकेअर शिक्षण व प्रशिक्षण संस्था सुरू करण्यासाठी कौशल्य विकास विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पुढाकार घेतला आहे. यासोबतच राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) पेटकेअरविषयक विशेष अभ्यासक्रम सुरू करण्याचाही मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईत पेटकेअर शिक्षण व प्रशिक्षण संस्था सुरू करण्याच्या दृष्टीने प्राणीप्रेमी आणि नागरिकांकडून सूचना व हरकती मागविण्यात येत आहेत. यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अधिकृत समाजमाध्यम खात्यांवर गुगल फॉर्मची लिंक (https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfZsMPGIodkUXWu5Su2DRtFEVnyWb2SjFepoxkOqUcfdSe97g/viewform)  उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी खालील लिंकवर जाऊन आपली मते, सूचना व हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन मंत्री लोढा यांनी केले आहे.

Mangal Prabhat Lodha: तरुणांनो, कल्पनांना द्या नवी झेप! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ची घोषणा

मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, पेटकेअर एज्युकेशन अँड ट्रेनिंग (PETE) या उपक्रमाच्या माध्यमातून पाळीव प्राण्यांची काळजी, आरोग्य, सुरक्षितता आणि कल्याण यांना प्राधान्य देत आधुनिक, शास्त्रीय आणि नैतिक पद्धतींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. पेटकेअर क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे युवक-युवती, या क्षेत्रात कार्यरत असलेले व्यावसायिक तसेच पाळीव प्राण्यांचे संगोपन करणारे नागरिक यांच्यासाठी विविध मान्यताप्राप्त प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

या प्रशिक्षणामध्ये पेट हँडलिंग, डॉग वॉकिंग, पेट सिटिंग, पेट ग्रूमिंग आणि पाळीव प्राण्यांसाठी निवास व देखभाल सुविधा व्यवस्थापन अशा विविध विषयांचा समावेश असेल. प्रात्यक्षिक प्रशिक्षणावर विशेष भर देण्यात येणार असून, आधुनिक सुविधांमध्ये प्रत्यक्ष अनुभवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कौशल्ये आत्मसात करता येतील. तसेच, पाळीव प्राण्यांचे आरोग्य, संगोपन आणि कल्याण याविषयी माहिती देणारे ऑनलाइन अभ्यासक्रमही पेट पॅरेंट्ससाठी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

पेटकेअर एज्युकेशन अँड ट्रेनिंग इकोसिस्टिम (PETE) हा पाळीव प्राण्यांची देखभाल आणि प्राणी कल्याणाच्या क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या माध्यमातून पाळीव प्राण्यांना जागतिक दर्जाच्या सेवा व योग्य काळजी मिळण्यासाठी आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ तयार करण्यास मदत होईल. तसेच, या क्षेत्रात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्यास चालना मिळेल.

विद्यार्थ्यांसाठी संधी! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये सहभागी होण्याचे Mangal Prabhat Lodha यांचे आवाहन

पाळीव प्राण्यांचे जीवनमान उंचावण्यासोबतच त्यांची काळजी घेणाऱ्या व्यक्तींची कौशल्ये आणि व्यावसायिक क्षमता विकसित करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. मुंबईतही अशी संस्था सुरू करण्याच्या दृष्टीने प्राणीप्रेमी आणि नागरिकांच्या सूचना व अपेक्षा जाणून घेऊन पुढील नियोजन करण्यात येईल, असे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले.

Web Title: Mangal prabhat lodha said a pet care training institute is now set to open in mumbai after pune tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 06:19 PM

Topics:  

  • Mangal Prabhat Lodha
  • Mumbai News
  • Skill Development

संबंधित बातम्या

Mumbai News: काश्मिरी सफरचंद आता अवघ्या ३० तासांत मुंबईत! वाहतूक खर्चात ६०% कपात, रस्ते मार्गाऐवजी रेल्वे स्वस्त
1

Mumbai News: काश्मिरी सफरचंद आता अवघ्या ३० तासांत मुंबईत! वाहतूक खर्चात ६०% कपात, रस्ते मार्गाऐवजी रेल्वे स्वस्त

Paris Youth in Mumbai: मुंबईत फक्त 21 दिवस राहिला अन् Paris च्या तरुणाला उमगलं शहराचं गुपित! म्हणतो, ‘इथे…’
2

Paris Youth in Mumbai: मुंबईत फक्त 21 दिवस राहिला अन् Paris च्या तरुणाला उमगलं शहराचं गुपित! म्हणतो, ‘इथे…’

Mumbai News: ‘झोपु’ कायद्याचा घेतला आढावा! उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीच्या पहिल्या बैठकीत प्रक्रियेला गती देण्याचे धोरण
3

Mumbai News: ‘झोपु’ कायद्याचा घेतला आढावा! उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीच्या पहिल्या बैठकीत प्रक्रियेला गती देण्याचे धोरण

CJP Mumbai Protest : आंदोलकांची धरपकड सुरूच! शिवाजी पार्क परिसरात पोलिसांची फिल्डिंग, दंगली भडकवण्याचा पोलिसांचा डाव? मनसेचा आरोप
4

CJP Mumbai Protest : आंदोलकांची धरपकड सुरूच! शिवाजी पार्क परिसरात पोलिसांची फिल्डिंग, दंगली भडकवण्याचा पोलिसांचा डाव? मनसेचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.