Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Controvercy : मराठी-अमराठी वाद चिघळणार; टॅक्सी-ऑटोचालक संपावर ठाम, गोरेगावमध्ये आज निर्णायक बैठक

मराठी-अमराठी वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, टॅक्सी आणि ऑटोचालक संपावर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर आज गोरेगावमध्ये महत्त्वाची बैठक होणार असून, पुढील आंदोलनाची दिशा ठरण्याची शक्यता आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 27, 2026 | 02:18 PM
मराठी-अमराठी वाद चिघळणार; टॅक्सी-ऑटोचालक संपावर ठाम, गोरेगावमध्ये आज निर्णायक बैठक

मराठी-अमराठी वाद चिघळणार; टॅक्सी-ऑटोचालक संपावर ठाम, गोरेगावमध्ये आज निर्णायक बैठक

Follow Us
Follow Us:
  • मराठी-अमराठी वाद चिघळणार
  • टॅक्सी-ऑटोचालक संपावर ठाम
  • गोरेगावमध्ये आज निर्णायक बैठक
मुंबई : राज्य सरकारने १ मे पासून टॅक्सी आणि ऑटो रिक्षाचालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या आदेशानंतर मराठी विरुद्ध बिगर-मराठी वाद वाढला आहे. टॅक्सी आणि ऑटो रिक्षाचालकांनी ४ मे पासून संपाची घोषणा केली आहे. शशांक राव यांच्या नेतृत्वाखालील मुंबई ऑटो रिक्षा-टॅक्सीमेन संघटना सोमवारी गोरेगाव पश्चिम येथे बैठक घेत आहे. दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी मुंबई कशी बंद पडते ते पाहण्याची धमकी दिली आहे. ज्यांना मराठीला आक्षेप आहे, त्यांनी आपापल्या राज्यात परत जावे, असा इशारा त्यांनी दिला आहे.

म्हाडाच्या घरांना अल्प प्रतिसाद! मुंबईतील सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी अवघे चार दिवस शिल्लक, मुदतवाढ देण्याची शक्यता

राज्य सरकारचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी मुंबई ऑटो रिक्षा आणि टॅक्सीमेन संघटनेने संपाची घोषणा केली आहे. सोमवारी गोरेगाव पश्चिम येथील केशव गोरे मेमोरियल ट्रस्ट हॉलमध्ये टॅक्सी आणि ऑटो रिक्षा चालक व मालकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पुढील रणनीती ठरवली जाईल. दरम्यान, मराठी प्रश्नावर मनसे आक्रमक झाली आहे.

प्रकरण काय आहे?

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी १ मे २०२६ पासून राज्यातील परवानाधारक ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी बोलणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ओला आणि उबरसारख्या अॅप-आधारित चालकांचाही समावेश आहे, प्रादेशिक आणि उप-प्रादेशिक परिवहन कार्यालये टॅक्सी चालकांची तपासणी करण्यासाठी मोहीम सुरू करणार आहेत. ज्या चालकांना मराठी वाचता किंवा लिहिता येत नाही, त्याचे परवाने रद्द केले जातील.

…तर आम्ही रस्त्यावर उतरून धडा शिकवू

पुणे आणि पिपरी चिंचवडच्या दोन दिवसीय दौ-यावर असलेले अमित ठाकरे म्हणाले, आम्ही सरकारच्या निर्णयाचे स्वागत करतो. ऑटी चालकांना काही आक्षेप असेल तर त्यानी आपापल्या राज्यात जावे. आता बाहेरचे लोक मुंबई बंद पाडणार का? आम्ही मराठी लोकांसोबत खंबीरपणे उभे आहोत.

मुंबई कशी बंद पडते ते पाहू. महाराष्ट्रात मराठीचा आदर झालाच पाहिजे, त्यांच्या संपाचा आमच्यावर परिणाम होणार नाही. मराठी ऑटो चालक १२ तास गाडी चालवायला तयार आहेत. कट्टरता सहन केली जाणार नाही आणि त्यांना रस्त्यावर उतरून धडा शिकवला जाईल.

आम्हीही मराठीचा आदर करतो. बाळासाहेब ठाकरे यांचे सैनिक आहोत. या प्रकरणाला मराठी विरुद्ध गैर-मराठी असा वाद बनवू नये. रोजच्या कमाईसाठी कष्ट करणाऱ्या गरजू ऑटो-टॅक्सी चालकांचे परवाने रद्द करणे योग्य नाही. त्यांना मराठी शिकण्यासाठी वेळ दिला पाहिजे, अशी प्रतिक्रिया शिंदे गट नेते संजय निरुपम यांनी दिली.

परिवहन मंत्री सरनाईक यांनी हा अन्यायकारक निर्णय तात्काळ रद करावा, युनियनने सरकारला २८ एप्रिलपर्यंतची मुदत दिली आहे. आम्ही मराठी भाषेचा आदर मान्य करती, पण परवाने आणि परवानगी रद्द करणे योग्य नाही. हा कामगार वर्गावर अन्याय आहे. आम्ही आज गोरेगावमध्ये ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालक व मालकांची बैठक बोलावली आहे. भविष्यातील रणनीती तिथेच ठरवली जाईल,अशी प्रतिक्रिया ऑटो रिक्षा-टॅक्सीसेन यूनियन अध्यक्ष शशांक राव यांनी दिली.

Ladki Bahin Yojna: खात्यात ३००० रुपये जमा होणार? पण ‘या’ त्रुटी असल्यास लाभापासून मुकणार; लाडक्या बहिणींनो, तातडीने करा ‘हे’ काम

Web Title: Marathi non marathi dispute taxi auto strike goregaon meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 02:18 PM

Topics:  

  • Goregaon
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद
1

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

Chhagan Bhujbal : भुजबळांना मोठा दिलासा! ‘त्या’ प्रकरणाचा निकाल लागला; विशेष कोर्टाचा मोठा निर्णय
2

Chhagan Bhujbal : भुजबळांना मोठा दिलासा! ‘त्या’ प्रकरणाचा निकाल लागला; विशेष कोर्टाचा मोठा निर्णय

मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला मिळणार नवी झेप; ५ वर्षांनी दुसरे जहाज दाखल, २३ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत
3

मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला मिळणार नवी झेप; ५ वर्षांनी दुसरे जहाज दाखल, २३ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत

Mumbai News: प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी वास्तुविशारदांवर का? आक्षेप ‘वास्तुकला परिषदे’चा मुंबई पालिकेच्या निर्णयाला आक्षेप
4

Mumbai News: प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी वास्तुविशारदांवर का? आक्षेप ‘वास्तुकला परिषदे’चा मुंबई पालिकेच्या निर्णयाला आक्षेप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.