Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MGL ग्राहक सावधान! एक क्लिक आणि निवृत्त अधिकाऱ्याला 4 लाखांचा फटका… अशी घ्या खबरदारी

मुंबईत महानगर गॅस ग्राहकांना लक्ष्य करणाऱ्या नव्या सायबर फसवणुकीने चिंता वाढवली आहे. कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक करणारे स्कॅमर्स ग्राहकांना फोन करून एपीके फाईल डाउनलोड करायला सांगत आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 07, 2026 | 10:47 AM
MGL ग्राहक सावधान! एक क्लिक आणि निवृत्त अधिकाऱ्याला 4 लाखांचा फटका... अशी घ्या खबरदारी

MGL ग्राहक सावधान! एक क्लिक आणि निवृत्त अधिकाऱ्याला 4 लाखांचा फटका... अशी घ्या खबरदारी

Follow Us
Close
Follow Us:
  • मुंबईतील 63 वर्षीय निवृत्त अधिकाऱ्याने एपीके फाईल डाउनलोड करताच त्याच्या खात्यातून 4 लाख रुपये काढले गेले.
  • फसवणूक करणारे गॅस कनेक्शन बंद करण्याची भीती दाखवून ग्राहकांकडून तातडीने कृती करून घेत आहेत.
  • पोलिसांनी फक्त अधिकृत एमजीएल कनेक्ट अ‍ॅप वापरण्याचा आणि संशयास्पद लिंक टाळण्याचा इशारा दिला आहे.
स्कॅमर्सनी पुन्हा एकदा लोकांची फसवणूक करण्यासाठी एक नवीन पद्धत शोधली आहे. यामुळे मुंबईतील उच्चभ्रू वस्त्या आणि प्रतिष्ठित भागांमध्ये एक नवीन भीती पसरत आहे. सायबर गुन्हेगार आता पारंपरिक सिलिंडर ग्राहकांना लक्ष्य करत नाहीत, तर महानगर गॅस (एमजीएल) पाइपलाइन वापरणाऱ्या उच्चभ्रू नागरिकांना लक्ष्य करत आहेत. लोकांची फसवणूक करणारे स्कॅमर्स कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवून लोकांना फोन किंवा मेसेज करतात आणि न भरलेली बिले किंवा अपूर्ण केवायसी माहितीची धमकी देतात. त्यांची युक्ती इतकी अचूक आहे की, उच्च पदावरील लोकही त्यांच्या जाळ्यात अडकत असून आयुष्यभराची बचत गमावत आहेत. अशाच एका घटनेत एका निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्याने ४ लाख रुपये गमावल्याचे समोर आले आहे.

डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठात अमली पदार्थविरोधी युवा संवाद; पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार विद्यार्थ्यांशी साधणार थेट संवाद

नेहरू नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नुकतीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका ६३ वर्षीय निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्याला फसवणूक करणाऱ्यांनी लक्ष्य केले. फसवणूक करणाऱ्यांनी त्यांना फोन करून, बिल त्वरित न भरल्यास गॅस कनेक्शन तोडण्याची धमकी दिली. सध्या, इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक गॅस संकटाच्या बातम्या चर्चेत आहेत. गुन्हेगारांनी याच भीतीचा गैरफायदा घेतला. पीडित व्यक्तीला वाटले की एकदा कनेक्शन तुटले की, संकटाच्या काळात पुन्हा गॅस मिळणे अशक्य होईल.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

अशी करतात फसवणूक

गॅसपुरवठा खंडित होण्याच्या ग्राहकांच्या भितीचा गैरफायदा घेऊन, फसवणूक करणाऱ्याऱ्यांनी पीडित व्यक्तीला एक एपीके (अँड्रॉइड अ‍ॅप्लिकेशन पॅकेज) फाईल पाठवली आणि ‘पेमेंट अपडेट’साठी ती डाउनलोड करण्यास सांगितले. पीडित व्यक्तीने अ‍ॅप इन्स्टॉल करताच, त्याचा फोन हॅक झाला आणि फसवणूक करणाऱ्यांनी त्याच्या बँक खात्यातून ४ लाख रुपये काढून घेतले. अलीकडेच मुंबईत अशा प्रकारची चाळीसहून अधिक प्रकरण नोंदवली गेली आहेत.

Mumbai Metro : मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात बदल, मेट्रो 9 आणि 2B कधी सुरु होणार? जाणून घ्या तारीख

अशी खबरदारी घेण्याचे पोलिसांचे आवाहन

  • अज्ञात लिंक टाळा अज्ञात व्यक्तींनी पाठवलेल्या एपीके फाईल्स किवा अन्य लिंक कधीही डाउनलोड करू नका.
  • अधिकृत अ‍ॅप वापरा बिल भरण्यासाठी फक्त ‘एमजीएल कनेक्ट’ किवा अधिकृत वेबसाईटचा वापर करा.
  • काळजी करू नका गैस कंपन्या कधीही फोन करून, गॅसपुरवठा तात्काळ खंडित करण्याची धमकी देऊन पैशाची मागणी करत नाहीत.
  • संपर्क करा जर तुम्हाला असा अनुभव आला. तर तात्काळ १९३० वर फोन करा किंवा cy-bercrime.gov.in वर तक्रार दाखल करा.

Web Title: Mgl customers alert one click cost a retired officer 4 lakh in mumbai cyber scam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 10:47 AM

Topics:  

  • cyber scam
  • MGL
  • scam

संबंधित बातम्या

सावधान! सुट्टीत ऑनलाईन बुकिंग करताय? ट्रॅव्हल एजंटच्या नावाखाली होतेय फसवणूक, मुंबई सायबर सेल अलर्ट मोडवर
1

सावधान! सुट्टीत ऑनलाईन बुकिंग करताय? ट्रॅव्हल एजंटच्या नावाखाली होतेय फसवणूक, मुंबई सायबर सेल अलर्ट मोडवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.