Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra News: “बांधकाम कामगारांची फसवणूक करणाऱ्यांवर…”; कामगार मंत्री फुंडकरांचा थेट इशारा

दक्षता पथकांना नेमून दिलेल्या जिल्ह्यांमध्ये बनावट कागदपत्रांद्वारे होणारी नोंदणी, नोंदणीसाठी पैसे मागण्याचे प्रकार तसेच खोटे दाखले सादर करून मिळविले जाणारे लाभ यावर लक्ष केंद्रित करून तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 26, 2025 | 09:39 PM
Maharashtra News: "बांधकाम कामगारांची फसवणूक करणाऱ्यांवर..."; कामगार मंत्री फुंडकरांचा थेट इशारा

Maharashtra News: "बांधकाम कामगारांची फसवणूक करणाऱ्यांवर..."; कामगार मंत्री फुंडकरांचा थेट इशारा

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: राज्यातील बांधकाम कामगारांची बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करून त्यांच्याकडून आर्थिक फसवणूक करणाऱ्या दलालांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील विविध भागातून लोकप्रतिनिधी व बांधकाम कामगारांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. नोंदणी, कीट वाटप व अन्य बाबतीत गैरप्रकार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून आता राज्यभरात जिल्हास्तरावर दक्षता पथके स्थापन करून प्रभावी तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे.

प्रत्येक विभागात, प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा कार्यालय प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली एक स्वतंत्र जिल्हास्तरीय दक्षता पथक गठीत करण्यात येणार आहे. या पथकांचे कार्यक्षेत्र मात्र त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्याऐवजी दुसऱ्या जिल्ह्यावर असेल, जेणेकरून कारवाई अधिक निष्पक्ष आणि प्रभावी राहील.

दक्षता पथकांना नेमून दिलेल्या जिल्ह्यांमध्ये बनावट कागदपत्रांद्वारे होणारी नोंदणी, नोंदणीसाठी पैसे मागण्याचे प्रकार तसेच खोटे दाखले सादर करून मिळविले जाणारे लाभ या बाबींवर लक्ष केंद्रित करून तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. संबंधित दलालांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल. या मोहिमेसाठी क्षेत्रीय कार्यालयांना वाहन भाडेतत्वावर घेण्याची परवानगी देण्यात आली असून, तपासणीसाठी आवश्यक इतर खर्चही प्रशासकीय निधीतून नियमानुसार करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय दक्षता पथक प्रमुखांनी त्यांच्या कारवाईचा सविस्तर अहवाल विभागीय प्रमुखांना सादर करावयाचा आहे. विभागीय प्रमुख सर्व जिल्ह्यांचे अहवाल एकत्र करून आपल्या अभिप्रायासह मंडळ मुख्यालयास सादर करतील.

ही विशेष तपासणी मोहीम प्रथम टप्प्यात १० जुलै, २०२५ अखेरपर्यंत राबविली जाणार आहे. या तपासणी दरम्यान ज्यांना काही तक्रारी असतील त्यांना त्या दक्षता पथकाकडे देता येतील. प्रत्येक पथकाने दरमहा किमान एक तपासणी करणे बंधनकारक असून, त्या तपासण्यांचे संकलित अहवाल मंडळास दरमहा सादर करणे आवश्यक राहील. या निर्णयामुळे राज्यातील बांधकाम कामगारांची फसवणूक करणाऱ्या दलालांवर प्रभावी आळा बसेल, अशी अपेक्षा कामगारमंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी व्यक्त केली आहे.

“त्या” 259 कामगारांना आम्ही न्याय देणार- कामगारमंत्री फुंडकर

अंबरनाथच्या मिरॅकल कंपनीतील त्या 259 अन्यायग्रस्त कामगारांना आम्ही नक्कीच न्याय देऊ असे आश्वासन राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आज दिले. भाजपचे माजी आमदार आणि महाराष्ट्र परिश्रम कामगार संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने मुंबईत ही बैठक घेण्यात आली. ज्यामध्ये कामगार मंत्री फुंडकर यांनी कंपनी व्यवस्थापनाच्या मनमानी कारभारावर ताशेरे ओढत या बैठकीबाबत पूर्वसूचना देऊनही कंपनी मालक त्याला अनुपस्थित राहिल्याबद्दल संताप व्यक्त केला.

KDMC News: “त्या” 259 कामगारांना आम्ही न्याय देणार, कामगारमंत्री आकाश फुंडकर यांचे आश्वासन

अंबरनाथमधील मिरॅकल केबल कंपनीने बेकायदेशीरपणे काढून टाकलेल्या 259 कामगारांना पुन्हा कामावर घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र परिश्रम संघ या कामगार संघटनेतर्फे गेल्या काही महिन्यांपासून कायदेशीर लढा सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज कामगार मंत्र्यांच्या प्रमूख उपस्थितीत ही महत्त्वाची बैठक आज पार पडली.

Web Title: Minister akash fundkar said strict action will be taken against those who cheat construction workers maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2025 | 09:39 PM

Topics:  

  • Building Construction
  • Mumbai News

संबंधित बातम्या

मुंबईत शिक्षकांच्या थकीत देयकांचा प्रश्न गंभीर; आमदार अभ्यंकरांनी मागितला तातडीचा अहवाल
1

मुंबईत शिक्षकांच्या थकीत देयकांचा प्रश्न गंभीर; आमदार अभ्यंकरांनी मागितला तातडीचा अहवाल

आता LPG गॅस सिलेंडरला करा ‘बायबाय’; तुमच्याही घरात पाईपने येणार गॅस तोही PNG
2

आता LPG गॅस सिलेंडरला करा ‘बायबाय’; तुमच्याही घरात पाईपने येणार गॅस तोही PNG

“… आता अल्पसंख्यांकांमधून बाहेर पडण्याची वेळ”; Mangal Prabhat Lodha  यांचे विधान
3

“… आता अल्पसंख्यांकांमधून बाहेर पडण्याची वेळ”; Mangal Prabhat Lodha यांचे विधान

Maharashtra Breaking News Updates Today:  राजकारण, अर्थव्यवस्थेसह आणि  देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
4

Maharashtra Breaking News Updates Today: राजकारण, अर्थव्यवस्थेसह आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.