Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“शासन, समाजाने नशामुक्तीचा संदेश …”; काय म्हणाले मंत्री Mangal Prabhat Lodha?

या बैठकीत नशा मुक्ती अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. २६ जून या जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याचे नियोजन करण्यात आले.

  • By तेजस भागवत
Updated On: May 26, 2026 | 08:30 PM
“शासन, समाजाने नशामुक्तीचा संदेश …”; काय म्हणाले मंत्री Mangal Prabhat Lodha?
Follow Us
Follow Us:

नेस्को प्रकरणाशी संबंधित पार पडली महत्वाची बैठक
संपूर्ण वर्षभर नशा मुक्ती अभियान राबवण्याची लोढा यांची घोषणा
मंगल प्रभात लोढा उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष

मुंबई:  नेस्को येथे ड्रग्सच्या सेवनामुळे घडलेल्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, कॅबिनेट मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री श्री मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी बृहन्मुंबई पालिका क्षेत्रात संपूर्ण वर्षभर नशा मुक्ती अभियान राबवण्यात येईल, अशी घोषणा केली होती. मा. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मान्यतेने गृह विभागाने शासन निर्णय जारी करून या संदर्भात उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून, मंगल प्रभात लोढा हे त्या समितीचे अध्यक्ष आहेत. आजची बैठक ही त्या उच्चस्तरीय समितीची पहिली बैठक होती.

या बैठकीत नशा मुक्ती अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. २६ जून या जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याचे नियोजन करण्यात आले. यामध्ये शाळा, महाविद्यालये, गृहनिर्माण संस्था, व्यायामशाळा, स्पोर्ट्स क्लब तसेच मनपाच्या प्रभाग कार्यालय यासारख्या महत्वाच्या ठिकाणी २६ जून रोजी ऑनलाइन पद्धतीने एकाच वेळेस कार्यक्रम आयोजित करण्याचा समावेश आहे.

“महाराष्ट्र व दक्षिण कोरियात झालेल्या सामंजस्य…”; CM Devendra Fadnavis यांनी व्यक्त केले मत

या मोहिमेअंतर्गत वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून त्याचे मासिक वेळापत्रक देखील तयार करण्यात आले आहे. या मोहिमेत महानगरपालिका, महिला व बाल विकास विभाग, शिक्षण विभाग तसेच पोलीस प्रशासन यांचा सक्रिय सहभाग असणार असून, इतर सर्व विभागांचाही सक्रीय सहभाग राहणार आहे. शाळा व महाविद्यालयांमध्ये विशेष जनजागृतीसाठी पोस्टर्स, शॉर्ट फिल्म्स, पथनाट्य, जिंगल्स, गाणी तसेच विविध स्पर्धांचा वापर करण्यात येणार आहे.

Maharashtra Politics: “हिंदू समुदायावर अन्याय करणाऱ्यांना…”; मंगलप्रभात लोढा काय म्हणाले?

यावेळी मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात नशा मुक्ती अभियान प्रभावीपणे राबवले जात आहे. २६ जून हा केवळ एक दिवस नसून, समाजाला योग्य दिशेने नेण्याची जबाबदारी आठवण करून देणारा महत्त्वाचा क्षण आहे. विशेषतः युवकांमध्ये वाढत्या व्यसनाधीनतेच्या पार्श्वभूमीवर, शासन आणि समाजाने एकत्र येत नशामुक्तीचा संदेश घराघरात पोहोचवणे अत्यावश्यक आहे.” आजच्या बैठकीस आंचल गोयल (मुंबई शहर जिल्हाधिकारी), सौरभ कटियार (मुंबई उपनगर जिल्हाधिकारी) तसेच संबंधित विभागांचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Minister mangal prabhat lodha appealed for the message of de addiction to reach every household drugs mumbai news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 08:30 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Drugs
  • Mangal Prabhat Lodha

संबंधित बातम्या

CM Devendra Fadnavis : सिंहस्थ कुंभमेळ्याआधी नाशिकमध्ये मोठी तयारी! फडणवीसांनी घेतला विकासकामांचा आढावा
1

CM Devendra Fadnavis : सिंहस्थ कुंभमेळ्याआधी नाशिकमध्ये मोठी तयारी! फडणवीसांनी घेतला विकासकामांचा आढावा

Mangal Prabhat Lodha: तरुणांनो, कल्पनांना द्या नवी झेप! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ची घोषणा
2

Mangal Prabhat Lodha: तरुणांनो, कल्पनांना द्या नवी झेप! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ची घोषणा

‘नशा ही शरीर आणि समाजाला पोखरणारा…’; Mangal Prabhat Lodha यांचे पालकांना काय आवाहन?
3

‘नशा ही शरीर आणि समाजाला पोखरणारा…’; Mangal Prabhat Lodha यांचे पालकांना काय आवाहन?

विद्यार्थ्यांसाठी संधी! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये सहभागी होण्याचे Mangal Prabhat Lodha यांचे आवाहन
4

विद्यार्थ्यांसाठी संधी! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये सहभागी होण्याचे Mangal Prabhat Lodha यांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.