Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CM Devendra Fadnavis : सिंहस्थ कुंभमेळ्याआधी नाशिकमध्ये मोठी तयारी! फडणवीसांनी घेतला विकासकामांचा आढावा

CM Devendra Fadnavis, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील विकासकामांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. द्वारका सर्कल, दर्शनपथ, गोदाघाट आणि ओझर विमानतळाच्या कामांची त्यांनी पाहणी केली.

  • By विवेक
Updated On: Oct 11, 2026 | 09:56 PM
CM fadnavis nashik kumbhmela visit

CM fadnavis nashik kumbhmela visit

Follow Us
Follow Us:
  • कुंभमेळ्यासाठी नाशिक सज्ज होणार
  • द्वारका सर्कलपासून विमानतळापर्यंत मुख्यमंत्र्यांची पाहणी
  • विकासकामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश
 

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरात सुरू असलेली विविध विकासकामे वेगाने पूर्णत्वाकडे जात असून, या कामांमुळे नाशिक व त्र्यंबकेश्वरचा चेहरामोहरा बदलणार आहे. पुढील २५ ते ३० वर्षांचा विचार करून आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याबरोबरच भाविक, पर्यटक आणि नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सुरू असलेली सर्व कामे निर्धारित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजारोहण संमारंभाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांनी आज त्र्यंबकेश्वर येथील दर्शनपथ व गोदाघाट तसेच नाशिक येथील द्वारका सर्कल तसेच ओझर विमानतळ येथे भेट देऊन सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांकडून कामांची सद्यस्थिती, प्रगती आणि भविष्यातील नियोजनाची माहिती घेतली. यावेळी कामांची गती वाढवून ती वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव तथा पालक सचिव एकनाथ डवले, आमदार हिरामण खोसकर, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय ऐनपुरे, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. एस. व्ही. स्वामी, त्र्यंबक नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, एमएसआयडीसीचे अधिकारी ब्रिजेश दीक्षित उपविभागीय अधिकारी पवन दत्ता, तहसीलदार गणेश जाधव, मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

DCM Eknath Shinde : देवीच्या चरणी बळीराजासाठी साकडे; दुष्काळात सरकार खंबीरपणे पाठीशी – एकनाथ शिंदे

पुढील २५ ते ३० वर्षांचा विकासाचा पाया

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने सुरू असलेली कामे केवळ कुंभमेळ्यापुरती मर्यादित नसून, पुढील २५ ते ३० वर्षांसाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या विकासाचा पाया मजबूत करणारी आहेत. आधुनिक शहराच्या दिशेने वाटचाल करताना वाहतूक व्यवस्था, पायाभूत सुविधा, भाविक व पर्यटकांसाठी सुविधा तसेच नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने ही कामे परिवर्तनात्मक ठरणार आहेत. पुढील टप्प्यात विमानतळाशी संबंधित विकासकामांनाही गती मिळणार आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विभाग आणि यंत्रणा समन्वयाने काम करीत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

सर्व यंत्रणांच्या समन्वयातून विकास

महानगरपालिका, एमएसआरडीसी, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच विविध संबंधित विभागांच्या समन्वयातून ही कामे सुरू आहेत. पालकमंत्री, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांचा समन्वय तसेच सर्व यंत्रणांची एकत्रित टीम म्हणून सुरू असलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. या विकासकामांना गती देणाऱ्या सर्व यंत्रणांचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी अभिनंदन केले. विशेषतः एमएसआरडीसीने हाती घेतलेल्या महत्त्वपूर्ण कामांचे त्यांनी कौतुक केले.

त्र्यंबकेश्वरच्या विकासाला नवी दिशा

त्र्यंबकेश्वर येथील दर्शनपथ व गोदाघाट परिसरातील कामे आव्हानात्मक असली तरी ती नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असून, परिसराचा चेहरामोहरा बदलण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहेत. देशभरातून येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यात येत आहेत. धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने त्र्यंबकेश्वरचे महत्त्व अधिक व्यापक करण्यासाठीही या कामांचा उपयोग होणार आहे.

द्वारका सर्कल व विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या कामाचीही पाहणी

नाशिक येथील द्वारका सर्कलचे काम अत्यंत महत्त्वाचे आणि आव्हानात्मक आहे. मात्र, हे काम नियोजनबद्ध पद्धतीने वेगाने सुरू असून निर्धारित वेळेपूर्वी पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. यंदाच्या पावसाळ्यात या ठिकाणी पाणी निचऱ्याची चाचणी करण्यात आली असून, पावसाचे पाणी साचणार नाही आणि निचरा सुरळीत होईल, यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यानंतर त्यांनी ओझर विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या कामाचीही पाहणी केली. सिंहस्थ कुंभमेळानिमित्त नाशिकला येणारे भाविक व पर्यटक यांना आवश्यक व पायाभूत सेवा-सुविधांबाबत अधिक दक्ष राहण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी आमदार प्रा देवयानी फरांदे, ॲड. राहुल ढिकले, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, एमएसआयडीसीचे अधिकारी ब्रिजेश दीक्षित, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Baramati News : सोमेश्वर कारखाना मतमोजणीचा वाहतुकीला फटका; शारदानगर ते राजहंस चौक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करा!

Web Title: Nashik trimbakeshwar simhastha kumbh mela development work cm devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 09:56 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Kumbh Mela 2026
  • Nashik News

संबंधित बातम्या

Mangal Prabhat Lodha: तरुणांनो, कल्पनांना द्या नवी झेप! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ची घोषणा
1

Mangal Prabhat Lodha: तरुणांनो, कल्पनांना द्या नवी झेप! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ची घोषणा

विद्यार्थ्यांसाठी संधी! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये सहभागी होण्याचे Mangal Prabhat Lodha यांचे आवाहन
2

विद्यार्थ्यांसाठी संधी! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये सहभागी होण्याचे Mangal Prabhat Lodha यांचे आवाहन

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन! ‘Participate Mumbai’मुळे शहराच्या विकासात नागरिकांचा थेट सहभाग
3

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन! ‘Participate Mumbai’मुळे शहराच्या विकासात नागरिकांचा थेट सहभाग

Devendra Fadnavis : ‘संविधान हातात घेऊन संविधानालाच नकार..,’ दिल्लीतील आंदोलनावरून फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा
4

Devendra Fadnavis : ‘संविधान हातात घेऊन संविधानालाच नकार..,’ दिल्लीतील आंदोलनावरून फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.