Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira-Bhayandar: पालिकेची सीबीएसई शाळा पुन्हा लांबणीवर? २४ वर्ग खासगी शाळेला भाड्याने देण्याचा प्रस्ताव, महासभेच्या निर्णयाकडे लक्ष

मिरा-भाईंदर महापालिकेने सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्याचे नियोजन केलेली CBSE शाळा अद्याप प्रत्यक्षात सुरू झालेली नाही. आता या शाळेसाठी प्रस्तावित इमारतीतील २४ वर्गखोल्या एन. एल. डालमिया शाळेला एका वर्षासाठी भाड्याने देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने महासभेपुढे मांडला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 11, 2026 | 09:26 AM
Mira-Bhayander: पालिकेची सीबीएसई शाळा पुन्हा लांबणीवर? २४ वर्ग खासगी शाळेला भाड्याने देण्याचा प्रस्ताव, महासभेच्या निर्णयाकडे लक्ष

Mira-Bhayander: पालिकेची सीबीएसई शाळा पुन्हा लांबणीवर? २४ वर्ग खासगी शाळेला भाड्याने देण्याचा प्रस्ताव, महासभेच्या निर्णयाकडे लक्ष

Follow Us
Follow Us:
  • मिरा-भाईंदर महापालिकेची CBSE शाळा तीन वर्षांनंतरही सुरू झालेली नसून, आता प्रस्तावित इमारतीतील २४ वर्गखोल्या खासगी शाळेला देण्याचा प्रस्ताव आहे.
  • एन. एल. डालमिया शाळेला २४ वर्गखोल्या एका वर्षासाठी भाड्याने दिल्यास पालिकेला दरमहा सुमारे दीड कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे.
  • खासगी शाळेला जागा दिल्यास पालिकेची CBSE शाळा सुरू होण्यास आणखी विलंब होण्याची शक्यता असल्याने पालक आणि शहरवासीयांचे लक्ष महासभेच्या निर्णयाकडे लागले आहे.
विजय काते

मिरा-भाईंदर : सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी मिरा-भाईंदर महापालिकेने २०२३ मध्ये सीबीएसई शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, निर्णय होऊन तीन वर्षे उलटत आली तरी प्रत्यक्षात शाळा सुरू झालेली नाही. आता इंद्रलोक परिसरातील सीबीएसई शाळेसाठी प्रस्तावित इमारतीतील २४ वर्गखोल्या नामांकित एन. एल. डालमिया शाळेला एका वर्षासाठी भाड्याने देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने महासभेपुढे मांडला आहे. त्यामुळे पालिकेची सीबीएसई शाळा सुरू होण्यास आणखी विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यात 526 अनधिकृत शाळांचे जाळे; शिक्षण विभागाची केवळ 8 शाळांवर कारवाई, दंडही वसूल

महापालिकेच्या शहरात सध्या ३६ शाळा असून त्यामध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना मराठी, हिंदी, उर्दू आणि गुजराती माध्यमातून शिक्षण दिले जाते. खासगी शाळांच्या धर्तीवर सीबीएसई अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने २०२३ मध्ये पालिकेने सीबीएसई शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.

या शाळेसाठी इंद्रलोक परिसरातील नवीन इमारत प्रस्तावित करण्यात आली. सुरुवातीला खासगी शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून शाळा चालविण्याचा निर्णय घेऊन स्वारस्य अभिव्यक्ती मागवण्यात आली. मात्र, अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर २०२५ मध्ये पुन्हा निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. यावेळी नामांकित शैक्षणिक संस्थांकडून प्रतिसाद मिळाला. मात्र, त्यानंतरची पुढील कार्यवाही प्रशासनाकडून रखडल्याने चालू शैक्षणिक वर्षातही सीबीएसई शाळा सुरू होऊ शकलेली नाही.

२४ वर्ग भाड्याने देण्याचा प्रस्ताव

याच प्रस्तावित इमारतीतील २४ वर्गखोल्या आता एन. एल. डालमिया शाळेला एका वर्षासाठी भाड्याने देण्याचा प्रस्ताव महासभेपुढे ठेवण्यात आला आहे. संबंधित संस्थेकडून महापालिकेला दरमहा सुमारे दीड कोटी रुपये भाडे मिळणार असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. एन. एल. डालमिया शाळेच्या मिरा रोड येथील इमारतीत नुकत्याच लागलेल्या आगीमुळे काही भागाचे नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर दुरुस्तीचे काम सुरू असताना काही वर्ग प्रस्तावित इमारतीत स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगण्यात येत आहे.

पालिका शाळा आणि खासगी शाळा एकाच इमारतीत?

विशेष म्हणजे, या प्रस्तावित इमारतीत सध्या महापालिकेच्या शाळेचे काही वर्ग सुरू आहेत. तसेच काही जागेत फिजिओथेरपी केंद्रही सुरू आहे. अशा परिस्थितीत उर्वरित २४ वर्गखोल्या खासगी शैक्षणिक संस्थेला भाड्याने दिल्यास महापालिकेची शाळा आणि खासगी शाळेचे कामकाज एकाच इमारतीत कसे चालणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या निर्णयामुळे भविष्यात महापालिकेच्या शाळेचे स्थलांतर करण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत महापालिका प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.

आगीच्या कारणावरूनही प्रश्नचिन्ह

एन. एल. डालमिया शाळेला लागलेल्या आगीमध्ये संबंधित इमारतीतील नाट्यगृह आणि संगणक कक्षाचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली होती. वर्गखोल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नसल्यास विद्यार्थ्यांना प्रस्तावित महापालिका इमारतीत स्थलांतरित करण्याची गरज का निर्माण झाली, असा सवालही उपस्थित केला जात आहे. त्यामुळे प्रस्तावित सीबीएसई शाळेची इमारत एका खासगी शैक्षणिक संस्थेला अप्रत्यक्षपणे वापरासाठी देण्याचा प्रयत्न तर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, हा केवळ व्यक्त करण्यात आलेला संशय असून त्याला अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.

मुंबईत एकनाथ शिंदेंचा नवा प्लान? सचिन अहिरांकडे संघटनेची धुरा सोपवण्याच्या हालचालींना वेग

मुदतवाढ मिळाल्यास सीबीएसई शाळेला आणखी विलंब?

एन. एल. डालमिया संस्थेला एका वर्षासाठी जागा देण्यात आल्यानंतर दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण न झाल्यास संबंधित संस्थेकडून मुदतवाढ मागितली जाऊ शकते. अशी मुदतवाढ मंजूर झाल्यास पुढील वर्षी देखील प्रस्तावित इमारतीत महापालिकेची सीबीएसई शाळा सुरू करण्यास अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महासभा प्रशासनाच्या या प्रस्तावाला मंजुरी देते की प्रस्तावित सीबीएसई शाळेचा प्राधान्याने विचार करून इमारत पालिकेच्या शाळेसाठी राखून ठेवते, याकडे आता पालक, विद्यार्थी आणि शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Mira bhayandar cbse school delayed 24 classrooms proposed to be rented to private school

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 09:26 AM

Topics:  

  • Marathi News
  • mira bhayandar
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
1

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
2

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!
3

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!

Inspector Manju Satya Manju Wedding: सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक! अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम
4

Inspector Manju Satya Manju Wedding: सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक! अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.