
मुंबई : शिवसेना, कॉग्रेस आणि राष्ट्रवादी (Shivsena, Congress, NCP) कोरोना सुपर स्पेडर आहेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) म्हणाले. वांद्रेमध्ये त्यावेळी आपण हेच पाहिले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष महाराष्ट्रद्रोही आहे. असे म्हणत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यानी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रतिक्रिया देणा-या महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रत्युत्तर दिले आहे. खासदार सुप्रिया सुळे, संजय राऊत तुमचा पक्ष चीनचा हस्तक म्हणून काम करत होता का? केंद्र सरकारने रेल्वेने पाठवण्याआधी तुमचा अनधिकृत कार्यक्रम का सुरू होता ? असे सवालही शेलार (Ashish Shelar) यानी केले आहेत.
चीनचे हस्तक म्हणून काम केले का?
आशिष शेलार म्हणाले की, काँग्रेस पक्ष अफवा पसरवत होती, या तिन्ही पक्षावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. गरिबाला रस्त्यावर आणून त्याची फसवणूक करून त्याला अन्य राज्यात जाण्यासाठी परावृत्त केले, तुम्ही चीनचे हस्तक म्हणून काम केले का? असा सवाल त्यांनी केला. मोदींच्या वक्तव्यांविरोधात काँग्रेस भाजप कार्यालयांसमोर आंदोलन करणार असल्याबाबत ते म्हणाले की, त्यांनी जरूर आंदोलन करावे पण आधी हे सांगा की तुम्ही श्रमिक मजूर माणसाला का फसवले. करोनाच्या काळात माथी का फिरवली? चिनी हस्तक म्हणून तुम्ही जे चीनला हवे होते ते का केले याचे उत्तर द्यावे असे ते म्हणाले.
[read_also content=”शेतकऱ्याच्या पोरानं केली कमाल! बुलडाण्याचं राजू केंद्रेचं नाव आलं फोर्ब्सच्या यादीत! https://www.navarashtra.com/maharashtra/raju-kendre-form-lonar-buldana-included-in-forbes-30-under-30-nrps-234782.html”]
स्व. सावरकरांची गीते गायली म्हणून अंत्ययात्रेवर बहिष्कार
मैदानाची स्मशान भूमी नको. पण शिवाजी पार्क परिसरात लता दिदींचे स्मारक व्हायला हवे अशी आमची मागणी आहे. पण त्याबाबत शिवसेनेची बोटचेपी भूमिका का? वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच स्मारक होते तर मग इथे लता दिदींच स्मारकाला शिवसेनेची वेगळी भुमिका का? बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक होत आहे याचा आम्हाला अभिमान पण लतादीदींचे पण व्हायला हवे असे ते म्हणाले. ते म्हणाले की, जी काँगेस सावरकरांचा अवमान करत आहे त्यांच्या सोबत शिवसेना आहे. त्यांनी याबद्दल विचार करावा. लता दिदींच्या अंत्यसंस्कारावर कॉंग्रेसने तर बहिष्कार टाकला होता. स्वा.सावरकर यांच्या गीतांना चाली लावल्या. ती मंगेशकर कुटुंबाने गायली म्हणून काँग्रेसने दिदींच्या अंत्ययात्रेवर बहिष्कार टाकला हा खरा महाराष्ट्रात द्रोह आहे.
[read_also content=”‘द काश्मीर फाइल्स’ ला मिळाली रिलीज डेट; बऱ्याच वर्षांनी मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर यांना एकत्र पाहायला मिळणार https://www.navarashtra.com/latest-news/mithun-chakraborty-ani-anupam-kher-will-share-screen-in-the-kadhmir-files-nrps-234757.html”]