Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Metro Car Shed : मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना जारी, परिवहनमंत्र्यांची माहिती

मीरा-भाईंदर-दहिसर मेट्रो 9 आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ-अंधेरी मेट्रो 7A प्रकल्पांसाठी पहिला मेट्रो कारशेड प्रकल्प भाईंदरमधील राय गावात बांधण्याची योजना होती. मात्र आता रद्द करण्यात आले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 01, 2025 | 06:57 PM
मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना जारी, परिवहनमंत्र्यांची माहिती

मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना जारी, परिवहनमंत्र्यांची माहिती

Follow Us
Follow Us:
  • मेट्रो कारशेड प्रकल्प अखेर रद्द करण्याचा निर्णय
  • स्थानिक नागरिकांचा सातत्यपूर्ण विरोध
  • पर्यावरणीय परिणाम आणि भू-उपयोगाशी संबंधित तांत्रिक अडचणी
मुंबई: मिरा – भाईंदर येथील डोंगरी परिसरातील प्रस्तावित मेट्रो कारशेड प्रकल्प अखेर रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या संदर्भातील अधिकृत अधिसूचना लवकरच जारी होणार आहे. स्थानिक नागरिकांचा सातत्यपूर्ण विरोध, पर्यावरणीय परिणाम आणि भू-उपयोगाशी संबंधित तांत्रिक अडचणी लक्षात घेत प्रशासनाने हा निर्णय घेतल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) मुख्यालय या अनुषंगाने घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये बोलत होते. या वेळी महानगर आयुक्त आश्विन कुमार मुदगल, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, मिरा – भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा, पत्रकार तथा पर्यावरणवादी कार्यकर्ते धिरज परब आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

लोकलचा प्रवास होणार सुखकर! मध्य रेल्वेवर उभारली जाणार 20 नवीन स्थानके, कुठे ते जाणून घ्या…

मिरा – भाईंदर येथील डोंगरी कारशेडसाठी मोठ्या प्रमाणावर जागेची आवश्यकता असल्याने झाडतोड, वाहतूक कोंडी तसेच परिसराच्या विकास आराखड्यावर परिणाम होणार असल्याबाबत स्थानिक ग्रामस्थ , शहरातील नागरिक, विविध संस्था व पर्यावरणवादी संस्थांनी अनेक आक्षेप नोंदवले होते. या सर्व बाबींचा व्यापक आढावा घेतल्यानंतर पर्यायी जागांचा विचार करणे अधिक योग्य ठरेल, असा निष्कर्ष शासनाने काढला आहे. अधिसूचना जाहीर झाल्यानंतर कारशेडसाठी नवी जागा निश्चित करण्याची प्रक्रिया वेगाने हाती घेतली जाणार असून मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक नियोजन सुरू असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले. सरकारच्या या सकारात्मक प्रतिसादामुळे डोंगरीतील रहिवाशांनी व पर्यावरणवादी कार्यकर्ते, संघटनांनी समाधान व्यक्त केले असून पर्यावरण आणि नागरिकहिताला प्राधान्य देणारा हा निर्णय असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

मीरा-भाईंदर-दहिसर मेट्रो 9 आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ-अंधेरी मेट्रो 7A प्रकल्पांसाठी पहिला मेट्रो कारशेड प्रकल्प भाईंदरमधील राय गावात बांधण्याची योजना होती. मात्र स्थानिक शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे, एमएमआरडीएने उत्तनमधील डोंगरी गावात सरकारी जमिनीवर बांधकाम सुरू केले. जमीनही जप्त करण्यात आली. दरम्यान उत्तन या डोंगराळ गावात मेट्रो कार शेड प्रकल्पाशी संबंधित असलेल्या जागेवर हे कार शेड बांधले जाणार होते. तथापि, विविध प्रजातींची ११,३०० हून अधिक झाडे कार शेडच्या बांधकामात अडथळा आणत होती. ही झाडे कार शेडच्या बांधकामात अडथळा आणत असल्याने, झाडांवर कुऱ्हाड टाकून तोडावे लागले. प्रशासनाने ही झाडे तोडण्यासाठी आवश्यक ती कारवाई केली. परिणामी, उत्तन परिसराचे पर्यावरणाचे मोठे नुकसान होईल असे सांगून या तोडीला तीव्र विरोध झाला.

Mumbai Crime: ‘लग्नासाठी पैशांची गरज’… सावत्र सुनेचा भयानक कट; सीसीटीव्ही फुटेजवरून हत्येचा उलगडा, काय आहे प्रकरण? 

 

 

 

Web Title: Mmrda cancels dongri carshed metro line 5 project mumbai news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2025 | 06:57 PM

Topics:  

  • MMRDA
  • Mumbai

संबंधित बातम्या

Mumbai forest firing: मुंबईच्या वेशीवर चेना जंगलात गोळीबार! एकाचा मृत्यू, दोघे जखमी; मृतदेहावर शवविच्छेदनाविनाच अंत्यसंस्कार?
1

Mumbai forest firing: मुंबईच्या वेशीवर चेना जंगलात गोळीबार! एकाचा मृत्यू, दोघे जखमी; मृतदेहावर शवविच्छेदनाविनाच अंत्यसंस्कार?

Jitendra Awhad: ‘आधी जित्याला गोळ्या घालेन, मग तुलाही…’ जितेंद्र आव्हाडांना धमकीचा फोन; कार्यकर्त्यालाही जीवे मारण्याची धमकी
2

Jitendra Awhad: ‘आधी जित्याला गोळ्या घालेन, मग तुलाही…’ जितेंद्र आव्हाडांना धमकीचा फोन; कार्यकर्त्यालाही जीवे मारण्याची धमकी

MMRDA News: कोपरी पुलावर काळजाचा ठोका चुकवणारी घटना! कारवर कोसळल्या लोखंडी सळ्या; MMRDA ने ठोठावला २ कोटींचा दंड
3

MMRDA News: कोपरी पुलावर काळजाचा ठोका चुकवणारी घटना! कारवर कोसळल्या लोखंडी सळ्या; MMRDA ने ठोठावला २ कोटींचा दंड

Mumbai Hotel Price Hike: हॉटेलमध्ये खाणं आता महागणार! इडली, डोसा ते जेवणाच्या थाळीपर्यंत दरवाढ; ‘आहार’ संघटनेचे मोठे संकेत
4

Mumbai Hotel Price Hike: हॉटेलमध्ये खाणं आता महागणार! इडली, डोसा ते जेवणाच्या थाळीपर्यंत दरवाढ; ‘आहार’ संघटनेचे मोठे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.