
मुंबई ते ठाणे प्रवास आता अवघ्या 25 मिनिटांत, कसं ते जाणून घ्या
हा कॉरिडॉर आनंद नगर पासून मुलुंड, ऐरोली, JVLR, विक्रोळी, कांजूरमार्ग, मानखुर्द आणि घाटकोपर मार्गे जाईल आणि शेवटी छेडानगर येथे संपेल. पूर्व द्रुतगती महामार्गावरील होणाऱ्या वाहतूक कोंडीवर त्यामुळे नियंत्रण मिळवता येणार आहे. हा महामार्ग दररोज लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या मुंबईतील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी एक आहे.
ठाण्यात हा प्रकल्प आनंद नगर ते साकेत उड्डाण पुलाशी मुलुंड ऑक्ट्रोय नाका येथे आणखी एका उन्नत कॉरिडॉरशी सुलभपणे जोडला जाईल, ज्यामुळे मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या वाहनांचा प्रवास अधिक गतिमान होणार आहे. याशिवाय समृद्धी महामार्गाशी देखील हा उन्नत मार्ग जोडला जाणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वाहतूक सुरळीत होईल, प्रदूषण कमी होईल तसेच लाखो नागरिकांना अधिक वेगवान, विश्वासार्ह आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा अनुभव मिळेल. त्याचप्रमाणे संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात आर्थिक गतिविधींनाही गती मिळेल.
एमएमआरडीएच्या शाश्वत विकासाचा भाग म्हणून तसेच तज्ञ आणि पर्यावरणप्रेमी यांच्याशी विचारविमर्श करून याआधी प्रकल्पाचा विक्रोळी ते घाटकोपर पट्टा पुनर्रचित करण्यात आला आहे. त्यामुळे १२७ पिंक ट्रम्पेट वृक्ष वाचवले गेले आहेत. त्याचप्रमाणे भरपाई लागवड स्वरूपात एकूण ४,१७५ नवी झाडे लावली जाणार आहेत.
हा रस्ता २५ मीटर रुंद असेल, प्रत्येक कॅरेजवेवर तीन लेन असतील, ज्यामुळे एकूण सहा लेन होतील. स्पॅन ४० मीटर लांब असतील. दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी, प्राधिकरणाने मुलुंड चेक नाका, ऐरोली जंक्शन आणि विक्रोळी जंक्शन येथे अप आणि डाउन रॅम्प बांधण्याचा प्रस्ताव दिला आहे.
२.५ मीटर व्यासाचे मोनोपाइल्स, मजबूत पीयर्स, ४० मीटर स्पॅन आणि २५ मीटर सिंगल-सेगमेंट सुपर स्ट्रक्चर .
MMR मधील उन्नत रस्त्यासाठी पहिल्यांदाच सिंगल पाईल, सिंगल पियर प्रणाली .
मुलुंड चेक नाका, ऐरोली जंक्शन आणि विक्रोळी जंक्शन येथे २ पदरी अप-डाऊन रॅम्प .
नवघर उड्डाणपूल येथे ३+३ पदरी उन्नत टोल प्लाझा .
अखंड, सुरक्षित आणि हाय-स्पीड प्रवासासाठी डिझाइन.
• प्राथमिक सर्व्हेची कामे पूर्ण .
• टेस्ट पाइल्स पूर्ण .
• भू-तांत्रिक तपासणी जवळपास पूर्ण .
• युटिलिटी ओळखण्याचे काम मोठ्या प्रमाणावर पूर्ण .
• वर्किंग पाइल्स आणि पियर कास्टिंग प्रगतीपथावर.