पुण्यातील वाहतूक कोंडी सुटणार (फोटो- सोशल मीडिया)
पुणे: अहिल्यानगर महामार्गावरील शिक्रापूर व वाघोली येथील वाहतूक कोंडी (Traffic) टाळण्यासाठीच्या उपाययोजना व नियोजना पीएमआरडीए‘च्या बुधवारी झालेल्या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा झाली. वाघोली ते शिक्रापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करायच्या दृष्टीने पुणे – अहिल्यानगर मार्गास समांतर ३० मीटर रस्ते प्रादेशिक आराखड्यानुसार तयार करण्यात येईल. त्यानुसार, खराडी जकात नाका ते केसनंद ते बकोरी रस्ता हा वाघोली बायपास रस्ता असून, रस्त्याचे सीमांकनाचे काम पीएमआरडीएकडून पूर्ण केले आहे.
पुणे महानगरपालिकेमार्फत रस्ता विकसित करण्यात येईल. या रस्त्याच्या प्रत्यक्ष केलेल्या आखणीमध्ये व आरपी रस्त्याच्या मार्गामध्ये तफावत असल्याचे दिसते.पुणे मनपा यांच्याकडून हा रस्ता विकसित करण्याची कार्यवाही सुरु असून या रस्त्याचे काम होण्याच्या दृष्टीने पीएमआरडीएचा नियोजन विभाग, विकास परवानगी विभाग, अधीक्षक भूमी अभिलेख यांनी पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागाशी समन्वय साधून रस्त्याचे काम सुरू होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच, या संबंधित पीएमआरडीए क्षेत्रातील एफएसआय, टीडीआर देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही विकास परवानगी विभाग यांच्यामार्फत करण्याचे निर्देश महानगर आय़ुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी यावेळी दिले.हिंजवडीत IT कर्मचाऱ्यांचे हाल बेहाल! खड्डे, वाहतूक कोंडी अन्…; राजकीय नेत्यांच्या दौऱ्यानंतरही स्थिती ‘जैसे थे’
वाघोली व केसनंद परिसरातील वाहतूक कोंडी कमी करून खराडीपासून केसनंद चौक बायपास करून पुणे – अहिल्यानगर मार्गावरील लोणीकंदपर्यंतच्या नवीन वाघोली -केसनंद बायपास रस्त्याच्या नवीन मार्गाबाबत प्रत्यक्ष पाहणी करून प्रस्तावित करण्यात यावा, जेणेकरून वाघोली व केसनंद या परिसराला नवीन बायपास रस्ता उपलब्ध होईल, असेही डॉ. म्हसे यांनी निर्देशित केले.
पीएमआरडीएमार्फत वाघोली अर्बन ग्रोथ सेंटर (UGC) अंतर्गत पीएमआरडीएच्या क्षेत्रातील सुरभी हॉटेल ते भावडी ,लोहगाव रस्ता, तुळापूर – भावडी – वाघेश्वर मंदिर रस्ता व आव्हाळवाडी ते मांजरी खुर्द रस्ता भूसंपादन करून विकसित करण्याबाबत कार्यवाही सूरु आहे. या मुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
अनधिकृत प्लॉटिंगला बसणार आळा! PMRDA ची पुरंदरमध्ये धडक कारवाई; नागरिकांची फसवणूक होत असल्याने…
शिक्रापूर चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्याचे दृष्टीने पीएमआरडीएकडून प्रस्तावित प्रादेशिक योजनेतील सणसवाडी ते पिंपळे जगताप जोडणारा प्रमुख मार्ग (इस्पात कंपनी) रस्ता करणे, तळेगाव ढमढेरे -मझाक इंडिया कंपनी – एल ॲंण्ड टी फाटा – पिंपळे जगताप ते करंदी फाटा रस्ता करणे, सणसवाडी ते तळेगाव ढमढेरे रस्ता करणे, कोंढापूरी ते तळेगाव ढमढेरे रस्ता करणे, कासारी फाटा – वाबळेवाडी जातेगाव ते राज्यमार्ग ५४८-ड रस्ता करणे, शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे ते धायकर वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वेळ नदीवरील पूल व पुलाच्या दोन्ही बाजूच्या पोहोच रस्त्याचे बांधकाम करणे, आदीबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. ही कामे मंजूर असून, भूसंपादनासह विकसित करण्याचे नियोजन आहे. यामुळे भविष्यातील शिक्रापूर चौकातील वाहतूक कोंडीकमी होण्यास मदत होणार असल्याचे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.






