Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mhada चा मोठा निर्णय! GTB नगरच्या रहिवाशांना मिळणार महिन्याला २० हजार, तर…

Mhada: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) मार्फत C&D एजन्सीमार्फत राबविण्यात येत असलेल्या शीव कोळीवाडा येथील सिंधी निर्वासितांच्या गुरु तेग बहादुर नगर (जी.टी.बी. नगर) समूह पुनर्विकास प्रकल्प हा म्हाडाचा पहिला पुनर्विकास प्रकल्प आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 06, 2026 | 07:38 PM
GTB Urban Redevelopment

GTB Urban Redevelopment

Follow Us
Follow Us:
  • जी.टी.बी. नगर पुनर्विकासाला गती; १ नोव्हेंबरपासून पात्र रहिवाशांना भाडे
  • गाळेधारक व झोपडीधारकांना दरमहा १० हजार रुपये भाडे
  • पात्रता सिद्ध करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत
मुंबई/Mhada: म्हाडातर्फे बांधकाम व विकास करार अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या जी.टी.बी. नगर पुनर्विकास प्रकल्पातील निष्कासित १,२०० निवासी सदनिकाधारकांना दरमहा २० हजार रुपये, तर पात्र ठरलेल्या १२१ अनिवासी गाळेधारक व झोपडीधारकांना दरमहा १० हजार रुपये भाडे दि. ०१ नोव्हेंबर २०२६ पासून देण्यात येणार (Mumbai) असून १९६ सशर्त पात्र धारकांनाही पुढील सहा महिन्यांचे भाडे अदा करण्यात येणार असल्याचे , आज म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी  संजीव जयस्वाल यांनी आज सांगितले.

सशर्त पात्र गाळेधारकांना या सहा महिन्यांच्या कालावधीत संबंधित गाळेधारकांनी आवश्यक कायदेशीर कागदपत्रे सादर करून आपली पात्रता सिद्ध करणे आवश्यक राहील, असे त्यांनी पुढे सांगितले. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) मार्फत C&D एजन्सीमार्फत राबविण्यात येत असलेल्या शीव कोळीवाडा येथील सिंधी निर्वासितांच्या गुरु तेग बहादुर नगर (जी.टी.बी. नगर) समूह पुनर्विकास प्रकल्प हा म्हाडाचा पहिला पुनर्विकास प्रकल्प आहे.

पैसे भरले, अर्ज केला; तरीही घर नावावर नाही! गोरेगावच्या मोरारजी मिल म्हाडा संकुलातील रहिवासी वर्षभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेत

जी.टी.बी. नगर पुनर्विकास प्रकल्पातील गाळेधारक व झोपडीधारकांच्या पात्र-अपात्रतेची प्रक्रिया राबविण्यात येत असून महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) ३५६ अनिवासी गाळेधारक व झोपडीधारकांसाठी सुधारित प्रारूप परिशिष्ट-२ (Re-draft Annexure-2) प्रसिद्ध केले आहे.

सुधारित प्रारूप परिशिष्ट-२ नुसार, ३५६ अनिवासी गाळेधारक व झोपडीधारकांपैकी १२१ अनिवासी गाळेधारक व झोपडीधारक पूर्णपणे पात्र, १९६ अनिवासी गाळेधारक व झोपडीधारक सशर्त पात्र, तर ३९ धारक अपात्र ठरले आहेत. सशर्त पात्र ठरलेल्या गाळेधारकांना आवश्यक कागदपत्रे सादर करून आपली पात्रता सिद्ध करण्यासाठी पुढील सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून पात्रता सिद्ध करणे संबंधित धारकांसाठी बंधनकारक राहणार आहे.

सशर्त पात्र गाळेधारकांनी निर्धारित सहा महिन्यांच्या कालावधीत पात्रतेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे म्हाडाकडे सादर करणे आवश्यक आहे. संबंधित कागदपत्रांची छाननी व पडताळणी पूर्ण झाल्यानंतर अंतिम पात्रतेबाबत निर्णय घेण्यात येईल. याशिवाय, म्हाडाच्या पात्रता निश्चिती प्रक्रियेसाठी संबंधित गाळेधारकांनी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रमाच्या (B.E.S.T.) प्रलंबित वीज देयकांची पूर्तता करणे देखील आवश्यक राहणार आहे.

पुनर्विकासाअंतर्गत १२०० लाभार्थ्यांकरिता तीन आधुनिक व आकर्षक निवासी टॉवर्स उभारण्यात येणार असून त्यामध्ये ३९ ते ४८ मजल्यांच्या इमारती उभारण्याचे नियोजन आहे. विकास नियंत्रण नियमावली ३३ (९) अन्वये फंजिबलसह किमान ४.५ चटई क्षेत्रफळ उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पातील लाभर्थ्यांना ६३५ चौरस फुटांची आधुनिक सोयोसुविधांयुक्त सदनिका विनामूल्य मिळणार आहे.

MHADA Lottery 2026: सर्वसामान्यांसाठी ‘म्हाडा’ची गुड न्यूज! ३३३ घरांची सोडत; विजेत्या अर्जदारांचा सत्कार

गृहनिर्माण प्रकल्पाच्या बांधकामास प्राधिकृत प्राधिकरणाकडून बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र (CC) प्राप्त झाल्यानंतर सर्व पात्र रहिवासी लाभार्थ्यांना दरमहा रुपये २०,००० इतके भाडे अनुदान अदा करण्यात येणार आहे. तसेच प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी इमारतींची देखभाल व व्यवस्थापनाची जबाबदारी म्हाडातर्फे पार पाडण्यात येणार आहे. प्रत्येक सदनिका धारकाला स्वतंत्र गेटेड कम्युनिटी संकल्पनेनुसार या प्रकल्पात पारंपरिक रॅम्पद्वारे प्रवेशयोग्य बहुमजली बेसमेंट व पोडियम स्तरांवर वाहनतळाची सोय करण्यात आली आहे.

Web Title: Momentum for gtb nagar redevelopment mhada pay rent mumbai news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 07:38 PM

Topics:  

  • mhada
  • MHADA Homes
  • Mumbai News

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन! ‘Participate Mumbai’मुळे शहराच्या विकासात नागरिकांचा थेट सहभाग
1

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन! ‘Participate Mumbai’मुळे शहराच्या विकासात नागरिकांचा थेट सहभाग

Mumbai Crime News: मैदानात खेळत होता १२ वर्षीय मुलगा; मागून आले अन् मानेत इंजेक्शन टोचलं, घाटकोपरमध्ये खळबळ
2

Mumbai Crime News: मैदानात खेळत होता १२ वर्षीय मुलगा; मागून आले अन् मानेत इंजेक्शन टोचलं, घाटकोपरमध्ये खळबळ

बाणगंगा तलावातील जलजीवन धोक्यात? मृत माशांचा खच, Mangal Prabhat Lodha यांनी केली पाहणी
3

बाणगंगा तलावातील जलजीवन धोक्यात? मृत माशांचा खच, Mangal Prabhat Lodha यांनी केली पाहणी

Mumbai News: कवच ५.०! दोन लोकलमधील अंतर होणार कमी, मुंबईकरांना मिळणार मोठा दिलासा
4

Mumbai News: कवच ५.०! दोन लोकलमधील अंतर होणार कमी, मुंबईकरांना मिळणार मोठा दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.