35% probability of below-normal rainfall
मान्सून 2026 अंदाज – ठळक मुद्दे
Maharashtra Rain Alert: तीन दिवस छत्र्या घेऊनच फिरा; राज्यातील ‘या’ भागात पाऊस झोडपणार
१९७१ ते २०२० या कालावधीवर आधारित देशातील सरासरी मान्सून पाऊस ८७ सेंमी इतका आहे. त्याच्या तुलनेत यंदा पावसात घट होण्याचे संकेत आहेत. सध्या प्रशांत महासागरात कमकुवत लानिनासारखी परिस्थिती असली तरी एप्रिल ते जूनदरम्यान एन्सो (ईएनएसओ-न्यूट्रल) स्थिती राहण्याची शक्यता आहे. मात्र, मान्सून हंगामात एल-निनो विकसित होण्याची दाट शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. साधारणपणे एल-निनोमुळे भारतातील पावसावर नकारात्मक परिणाम होतो.हिंद महासागरात सध्या इंडियन ओशन डायपोल (आयओडी) न्यूट्रल स्थितीत आहे. मात्र मान्सूनच्या शेवटाकडे सकारात्मक आयओडी विकसित होण्याची शक्यता असून, त्याचा काही प्रमाणात पावसावर अनुकूल परिणाम होऊ शकतो. जानेवारी ते मार्च या कालावधीत उत्तर गोलार्धातील हिमावरण सामान्यापेक्षा कमी राहिल्याचा परिणाम मान्सूनवर होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
Maharashtra Rain Alert: अबब! आज घरातच थांबा; ‘या’ जिल्ह्यांना पाऊस धुवून काढणार, अलर्ट काय?
काय सांगते आकडेवारी ?
यंदाच्या पावसाळ्याबाबत हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज आणि त्याची वर्गवारी खालीलप्रमाणे आहे:
| पावसाची श्रेणी | पावसाचे प्रमाण (%) | अंदाजाची शक्यता (%) | ऐतिहासिक सरासरी (%) |
| अत्यल्प | ९० पेक्षा कमी | 35 | 16 |
| सरासरीपेक्षा कमी | ९० ते ९५ | 31 | 17 |
| सरासरी | ९६ ते १०४ | 27 | 33 |
| सरासरीपेक्षा जास्त | १०५ ते ११० | 6 | 16 |
महत्त्वाचा निष्कर्ष
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, यंदा अत्यल्प (३५%) आणि सरासरीपेक्षा कमी (३१%) पाऊस पडण्याची शक्यता सर्वाधिक आहे. म्हणजेच एकूण ६६% शक्यता ही पाऊस कमी पडण्याकडे झुकणारी आहे.






