Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईची हवेची गुणवत्ता खालावली, ‘मॅरेथॉन’ वर होणार परिणाम? महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र

Mumbai Marathon 2026: 18 जानेवारी रोजी टाटा मुंबई मॅरेथॉन आयोजित केली आहे. या मॅरेथॉनवर मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता आगामी मॅरेथॉन होणार की नाही, याबाबत आता शंका निर्माण झाली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 13, 2026 | 02:30 PM
मुंबईची हवेची गुणवत्ता खालावली, 'मॅरेथॉन' वर होणार परिणाम? महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र

मुंबईची हवेची गुणवत्ता खालावली, 'मॅरेथॉन' वर होणार परिणाम? महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र

Follow Us
Follow Us:
  • मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा मॅरेथॉनवर होणार परिणाम?
  • AQI वाढला, धावपटूंना धोका!
  • मॅरेथॉनच्या आयोजनावर संकट
१८ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या टाटा मुंबई मॅरेथॉनच्या पार्श्वभूमीवर शहरातील खालावलेल्या हवेच्या गुणवत्तेबाबत आवाज फाउंडेशनने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तातडीच्या आरोग्य सुरक्षात्मक उपाययोजनांची मागणी केली आहे. या संदर्भात पाठविण्यात आलेल्या पत्राची पालिका प्रशासनाने दखल घेतल्याचे संकेत मिळाले.

Municipal Election 2026: 15 जानेवारीला सार्वजिनिक सुट्टी जाहीर; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

आवाज फाउंडेशनच्या अध्यक्षा सुमैरा अब्दुलाली यांनी पालिका आयुक्त, प्रदूषण महामंडळ अधिकारी तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात १ जानेवारी २०२६ पासून मुंबईत धुरकटपणा आणि स्मॉगसदृश स्थिती कायम असल्याकडे लक्ष वेधले आहे. मात्र मुंबईतील हवेच्या गुणवत्तेमुळे ‘मॅरेथॉन’ वादात येण्याची शक्यता आहे. दरम्यान मुंबईतील प्रदूषण परिस्थितीत मॅरेथॉनसारख्या दीर्घकाळ चालणाऱ्या शारीरिक कसरतीदरम्यान धावपटूंना मोठ्या प्रमाणात प्रदूषित हवा श्वासात घ्यावी लागते, ज्यामुळे दमा, श्वसनविकार तसेच हृदयावर ताण येण्याचा धोका वाढतो, असे त्यांनी नमूद केले आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

जानेवारी २०२५ मधील मुंबई मॅरेथॉनपूर्वी करण्यात आलेल्या अभ्यासाचाही संदर्भ देण्यात या पत्रात दिला आहे. विशेष म्हणजे करण्यात आलेली प्रदूषण नोंद पहाटेच्या वेळेत करण्यात आली होती. याच वेळेत मॅरेथॉन धावपटू रस्त्यावर असतात आणि प्रदूषण जमिनीच्या जवळ अडकून राहते. त्यामुळे धावपटूंना दीर्घकाळ अपायकारक हवा श्वासात घेण्याचा धोका असल्याचे या अभ्यासातून समोर आले होते. आवाज फाउंडेशनने यंदाच्या मॅरेथॉनपूर्वी मॅरेथॉन मार्गावर काही दिवस आधीच मोबाइल एअर क्वालिटी मॉनिटरिंग व्हॅन तैनात कराव्यात, अशी मागणी केली आहे.

मुंबई पालिकेकडून प्रतिसाद

पत्रावर पालिका प्रशासनाकडून प्राथमिक प्रतिसाद देण्यात आला आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) यांच्या निर्देशानुसार हे पत्र संबंधित अधिका-यांकडे आवश्यक कार्यवाहीसाठी पुढे पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे मॅरेथॉनपूर्वी हवेच्या गुणवत्तेच्या मुद्दयावर ठोस उपाययोजना होतील का, याकडे आता लक्ष लागले आहे.

Political News: राज ठाकरेंच्या मुंबईतील सभेपूर्वीच मनसेला मोठा धक्का, ‘या’ बड्यानेत्याने हाती घेतला भाजपचा झेंडा

पहाटेची प्रदूषण गंभीर नोंद

नागरिक विज्ञान उपक्रमांतर्गत मॅरेथॉन मार्गावर पहाटेच्या वेळेत पीएम २. ५ चे मोजमाप करण्यात आले होते. या मोजमापांमध्ये काही ठिकाणी पीएम २.५ पातळी ९५ ते १५० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटरपेक्षा अधिक आढळली होती. ही पातळी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या २४ तासांच्या ६० मायक्रोग्रॅम मानकांपेक्षा तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शवा मर्यादेपेक्षा अनेक पटीने अधिक आढळले. त्यात मॅरेथॉन सकाळी लवकरच सुरु होणार असल्याने गंभीर बाब आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Mumbai air quality deteriorates marathon may be affected letter sent to pollution control board

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Marathon
  • Mumbai
  • Mumbai Marathon

संबंधित बातम्या

Medical Success Story: 20 वर्षीय तरुणीवर वॉकहार्टमध्ये यशस्वी मिनिमली इन्व्हेसिव्ह माइट्रल व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया
1

Medical Success Story: 20 वर्षीय तरुणीवर वॉकहार्टमध्ये यशस्वी मिनिमली इन्व्हेसिव्ह माइट्रल व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया

Mumbai protest : मुंबईत नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांचा दणका, चैत्यभूमी प्रकरणाची चौकशी सुरू; 8 गुन्हे दाखल
2

Mumbai protest : मुंबईत नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांचा दणका, चैत्यभूमी प्रकरणाची चौकशी सुरू; 8 गुन्हे दाखल

Mumbai Crime: पहिल्या पतीशी फोनवर बोलत असल्याच्या संशयातून पत्नीची हत्या; ओशिवरा येथील धक्कादायक घटना
3

Mumbai Crime: पहिल्या पतीशी फोनवर बोलत असल्याच्या संशयातून पत्नीची हत्या; ओशिवरा येथील धक्कादायक घटना

Mhada Lottery : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! म्हाडा लॉटरीचे शेड्यूल लवकरच जाहीर;75 हजारांहून अधिक अर्जदारांची प्रतीक्षा संपणार
4

Mhada Lottery : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! म्हाडा लॉटरीचे शेड्यूल लवकरच जाहीर;75 हजारांहून अधिक अर्जदारांची प्रतीक्षा संपणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.