Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 28 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Highway News: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहनांचा महाजाम! १५ ते २० किमीपर्यंत रांगा; प्रवाशांचे हाल

Mumbai Highway News: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली. वर्सोवा पुलापासून विरार हद्दीपर्यंत सुमारे १५ ते २० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल झाले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 28, 2026 | 12:53 PM
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहनांचा महाजाम! १५ ते २० किमीपर्यंत रांगा; प्रवाशांचे हाल

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहनांचा महाजाम! १५ ते २० किमीपर्यंत रांगा; प्रवाशांचे हाल

Follow Us
Follow Us:
  • मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी
  • ठाणे-मुंबई वाहिनीवर २० किमीपर्यंत वाहनांच्या रांगा
  • परीक्षार्थी विद्यार्थीही अडकले
Mumbai Highway News: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. वर्सोवा पुलापासून विरार हद्दीपर्यंत सुमारे १५ ते २० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. मंगळवारी (27 ऑक्टोबर) रात्रीपासून सुरू झालेली वाहतूक कोंडी बुधवारी सकाळपर्यंत कायम राहिल्याने अनेक वाहनचालकांना तासन् तास महामार्गावर अडकून पडावे लागले.

ठाण्यातील बहुचर्चित प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या आंदोलनाचा थेट परिणाम महामार्गावरील वाहतुकीवर झाल्याचे सांगण्यात आले. या आंदोलनामुळे मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. बुधवारी सकाळी वाहतूक संथ गतीने सुरू करण्यात आली असली, तरी वाहनांची मोठी संख्या असल्याने कोंडी कमी होण्यास वेळ लागण्याची शक्यता होती.

Mumbai News: धूळ नियंत्रणात हयगय केल्यास कारवाई! न्यायालयाच्या फटाकेबंदी निर्देशांच्या अमलबजावणीची सूचना

कामगार, नोकरदार आणि परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे हाल

या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका सकाळी कामावर जाणाऱ्या नोकरदारांना, कामगारांना आणि विद्यार्थ्यांना बसला. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने अनेकांना नियोजित वेळेत इच्छित स्थळी पोहोचणे कठीण झाले. सध्या शाळांच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली. परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मोठी कसरत करावी लागली. वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली.

दोन तास वाहतूक कोंडीत अडकून पडल्याचा रहिवाशांचा अनुभव

महामार्गालगत राहणाऱ्या स्थानिक रहिवासी भाविका भोईर यांनी वाहतूक कोंडीबाबत संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या, “आम्ही सकाळी पावणेसात वाजताच मुलांना घेऊन शाळेसाठी निघालो होतो. मात्र, तब्बल दोन तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले. महामार्गालगत राहणाऱ्या नागरिकांना सातत्याने अशा समस्यांना सामोरे जावे लागते.” मुलांच्या परीक्षा सुरू असताना अशा प्रकारची वाहतूक कोंडी झाल्यास त्यांच्या शैक्षणिक नुकसानाची शक्यता असते. त्यामुळे प्रशासनाने वाहतुकीचे योग्य नियोजन करावे, अशी मागणीही भाविका भोईर यांनी केली.

वाहतूक नियोजनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील या कोंडीमुळे परिसरातील वाहतूक व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असताना आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पर्यायी मार्गांची व्यवस्था आणि वाहतूक वळविण्याचे नियोजन प्रभावीपणे करणे आवश्यक असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले.

वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचा बहुमूल्य वेळ वाया जात असून, कामावर जाणारे कर्मचारी, कामगार आणि विद्यार्थ्यांच्या दैनंदिन वेळापत्रकावरही परिणाम होत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत वाहतूक पोलिसांनी वेळेवर उपाययोजना करणे आणि प्रवाशांना पर्यायी मार्गांची माहिती देणे महत्त्वाचे ठरणार आहे. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी वाहतुकीची सद्यस्थिती लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.

Mumbai News: मेट्रो-रेल्वेनंतर आता रिक्षा, टॅक्सीही एका ॲपवर; एमएमआरडीएचा मोठा निर्णय

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी कुठे झाली?

    Ans: वर्सोवा पुलापासून विरार हद्दीपर्यंत मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर सुमारे १५ ते २० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या.

  • Que: महामार्गावरील वाहतूक कोंडीचे कारण काय होते?

    Ans: ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या आंदोलनाचा महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाल्याचे सांगण्यात आले.

  • Que: वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका कोणाला बसला?

    Ans: कामगार, नोकरदार, वाहनचालक आणि परीक्षा सुरू असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला. अनेक प्रवाशांना तासन् तास महामार्गावर अडकून पडावे लागले.

Web Title: Mumbai ahmedabad highway traffic jam 15 20 km pradip purnekar murder protest sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2026 | 12:53 PM

Topics:  

  • Mumbai
  • Mumbai-Ahmedabad highway
  • traffic jam

संबंधित बातम्या

Mumbai Pune Missing Link वरून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या नवे नियम, ‘या’ वाहनांना प्रवेशबंदी
1

Mumbai Pune Missing Link वरून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या नवे नियम, ‘या’ वाहनांना प्रवेशबंदी

मुंबईचा विकास वेगात! उंच इमारती, सागरी पूल अन् मेट्रोचे जाळे; पाहा बदलत्या शहराची झलक
2

मुंबईचा विकास वेगात! उंच इमारती, सागरी पूल अन् मेट्रोचे जाळे; पाहा बदलत्या शहराची झलक

Mumbai Mayor Cup: बुद्धिबळाच्या पटावर युवा खेळाडूंचा जलवा! अर्जुन कुलकर्णी, अहान काटरुका गटविजेते
3

Mumbai Mayor Cup: बुद्धिबळाच्या पटावर युवा खेळाडूंचा जलवा! अर्जुन कुलकर्णी, अहान काटरुका गटविजेते

‘शाळेवर ग्रेनेड हल्ला, तर महालक्ष्मी रेसकोर्सवर बॉम्बस्फोट…’, मुंबईच्या महापौर कार्यालयाला पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी
4

‘शाळेवर ग्रेनेड हल्ला, तर महालक्ष्मी रेसकोर्सवर बॉम्बस्फोट…’, मुंबईच्या महापौर कार्यालयाला पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.