मुंबई विमानतळावर पुन्हा बॅाम्बने उडवण्याची धमकी (फोटो सौजन्य-X)
Mumbai Bomb Threat news in marathi : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ बॉम्बने उडवण्याच्या धमकीचे सत्र सुरुच आहे. अशातच बुधवारी (13 नोव्हेंबर) दुपारच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने मुंबई विमानतळ T1 येथील CISF नियंत्रण कक्षाला फोन करून बॉम्बस्फोटाची धमकी दिली. यावेळी मुहम्मद नावाचा व्यक्ती मुंबईहून अझरबैजानला जात असून त्याच्याकडे स्फोटक सामग्री असल्याचे फोन करणाऱ्याने सांगितले. या माहितीनंतर सीआयएसएफने तात्काळ पोलिसांना सतर्क केले आणि अधिकाऱ्यांनी विमानतळावर आपत्कालीन तपास सुरू केला.
ही माहिती मिळताच सीआयएसएफने सहार पोलिसांना माहिती दिली. यानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने विमानतळावर आणीबाणी जाहीर करून तपास सुरू केला. 14 ऑक्टोबरपासून आतापर्यंत शेकडो विमानांना बॉम्बच्या धमक्या आल्या आहेत.
हे सुद्धा वाचा: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नरिमन पॉइंटवरून अवघ्या 35-40 मिनिटांत पोहोचणार विरार,काय आहे प्रकल्प?
विमानांवर बॉम्बच्या धमक्या मिळण्याचा हा ट्रेंड गेल्या काही महिन्यांत खूप वाढला आहे. 20 ऑक्टोबर रोजी विविध विमान कंपन्यांच्या किमान 14 फ्लाइटना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. दरम्यान, इंडिगोच्या सहा विमानांना बॉम्बची धमकी देण्यात आली होती, त्यापैकी तीन आंतरराष्ट्रीय उड्डाणे होती.
16 ऑक्टोबर रोजी दिल्लीहून बेंगळुरूला जाणाऱ्या अकासा एअरच्या फ्लाइटला आणि मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइटला बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या. या काळात तीन दिवसांत इंडियन एअरलाइन्सच्या एकूण 12 फ्लाइट्सना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या.
याशिवाय 27 ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका व्यक्तीने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानाला धमकावून विमान टेक ऑफ केल्यास एकाही प्रवाशाला जिवंत सोडणार नाही, असे सांगितले होते. त्यानंतर तपास केला असता तो तरुण खोटे बोलत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे विमानाचे उड्डाण करण्यास विलंब झाला.
14 ऑक्टोबरपासून देशभरातील विविध विमानतळांवर शेकडो बॉम्बच्या धमक्या आल्या आहेत. या धोक्यांमुळे विमानतळ आणि विमान कंपन्यांच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे. प्रत्येक कॉलनंतर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा कसून तपास करत आहेत.
सीआयएसएफ आणि सहार पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करत विमानतळाच्या विविध भागांची तपासणी सुरू केली. विमानतळावर येणारी आणि निघणारी सर्व उड्डाणे आणि प्रवाशांवर बारीक नजर ठेवण्यात आली. मात्र,स्फोटक साहित्याला दुजोरा मिळालेला नाही. अजूनही तपास सुरू आहे. तसेच मुंबई विमानतळाची सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. प्रवाशांना त्यांच्या प्रवासादरम्यान सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. कोणत्याही प्रकारच्या संशयास्पद हालचालींवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला.
हे सुद्धा वाचा: काँग्रेस नेते नितीन राऊत यांच्या कारचा अपघात, प्रचाराहून घरी परत असताना…