काँग्रेस नेते नितीन राऊतांच्या वाहनाचा अपघात (फोटो सौजन्य-X)
काँग्रेसचे माजी मंत्री आणि नागपूर उत्तरचे उमेदवार नितीन राऊत यांच्या कारचा अपघात झाला आहे. त्यांच्या कारला एका ट्रकने धडक दिली. सुदैवाने या अपघातात नितीन राऊतांना कोणतीही दुखापत झाली नाही. प्रचाराहून घरी परत असताना हा अपघात झाला. याप्रकरणी कपिलनगर परिसरात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या अपघाताची माहिती मिळताच नितीन राऊत यांच्या समर्थकांनी घटनास्थळी धाव घेतली.
समर्थकांकडून त्यांच्या प्रकृतीविषयी विचारपुस करण्यात आली. या अपघातात नितीन राऊत हे थोडक्यात बचावले आहेत. ते एकदम सुखरूप असून कारला धडक देणाऱ्या ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल झालाय.
हे सुद्धा वाचा: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नरिमन पॉइंटवरून अवघ्या 35-40 मिनिटांत पोहोचणार विरार,काय आहे प्रकल्प?
नितीन राऊत यांच्या गाडीचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओत त्यांच्या कारला ट्रकने जोरदार धडक दिली. त्यात त्यांच्या कारचे नुकसान झाले आहे.यात ट्रक चालक आणि त्यांचे काही सहकारी कार बाहेर येऊन किती नुकसान झाले हे पाहताना दिसत आहे. यात तो ट्रक चालक आणि त्यांचे काही सहकारी कार बाहेर येऊन किती नुकसान झाले हे पाहताना दिसत आहेत. हा अपघात कसा घडला याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. याप्रकरणी कपिलनगर पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस पुढील तपास करत आहे.
दरम्यान, उत्तर नागपूर मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. येथे काँग्रेस नेते व विद्यमान आमदार डॉ. नितीन राऊत यांच्याविरोधात भाजपचे डॉ. मिलींद माने, बसपचे मनोज सांगोळे, वंचितचे अशोक वाघमारे, खोरिपचे चंद्रकांत रामटेक तसेच अपक्ष अतुल खोब्रागडे यांच्यासह अनेक उमेदवार रिंगणात उतरले आहेत. नितीन राऊत यांनी 2019 मध्ये भाजपच्या डॉ. मिलिंद मानेंना पराभूत केले होते. यावेळी दोघांमध्ये लढत पाहायला मिळत आहे.
राज्यात बुधवार 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. राज्यातील मतमोजणी ही शनिवार 23 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येंने मतदानासाठी यावे याकरिता निवडणूक आयोगाकडून प्रयत्न केले जात आहेत.
हे सुद्धा वाचा: दिल्लीत आज महापौरपदाची निवडणूक; आप आणि भाजप आमने-सामने, कोण मारणार बाजी?