Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर; शून्य टक्के व्याजाने 1 लाखापर्यंत कर्ज मिळणार

मुंबईतील महिलांना शून्य टक्के दराने 1 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना मुंबई बँक मदतीचा हात देणार असून शून्य टक्के व्याज दराने कर्जपुरवठा केला जाणार आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jun 21, 2025 | 05:11 PM
लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर; शून्य टक्के व्याजाने 1 लाखापर्यंत कर्ज मिळणार

लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर; शून्य टक्के व्याजाने 1 लाखापर्यंत कर्ज मिळणार

Follow Us
Close
Follow Us:

 

गेल्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरली होती. महाविकास आघाडीचं वारं राज्यात असताना महायुतीला मोठं यश मिळालं. या योजनेंतर्गत लाखो पहिला थेट सरकारशी जोडल्या गेल्या आहेत. दरम्यान आता या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना १ लाखांपर्यंतच कर्ज मिळणार आहे. ते पण शून्य टक्के व्याजाने कर्ज मिळणार आहे.

आता वृद्ध, विधवा आणि अपंगांना दरमहा मिळणार १,१०० रुपये, काय आहे योजना? जाणून घ्या

या योजनेचा लाभ घेणाऱ्या मुंबईतील महिलांना शून्य टक्के दराने 1 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना मुंबई बँक मदतीचा हात देणार असून शून्य टक्के व्याज दराने कर्जपुरवठा केला जाणार आहे. लाडक्या बहिणींचे पैसे उद्योग-व्यवसायांच्या माध्यमातून बाजारात आले पाहिजे, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती. त्यामुळे, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना 9 टक्के व्याजदराने देण्यात येणारं कर्ज शून्य टक्के व्याजदराने मिळणार आहे. शासनाच्या 4 महामडंळातील विविध योजनांमधून ही सवलत देण्यात आहे, अशी माहिती मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिली.

राज्य सरकारच्या 4 महामंडळाच्या योजनांमधून 12 टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा दिला जातो. पर्यटन महामंडळाची आई योजना आहे. या योजनेतून महिलेला 12 टक्क्यांपर्यंत व्याजाचा परतावा दिला जातो. यासह, भटक्या विमुक्तांसाठीचं महामंडळ, ओबीसी महामंडळ, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांमधून व्याजाचा परतावा महिलांना दिला जातो. ज्या महिलांना कर्जपुरवठा केला जात आहे, त्या लाभार्थी महिला या योजनेत बसत असतील, तर या महिलांना शून्य टक्के व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिलं जाऊ शकतं, असंही त्यांनी म्हटलं आहे.

8th Pay Commission : महिन्याचा पगारात दुप्पट वाढ होणार? आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? वाचा सविस्तर बातमी

मुंबई बँकेकडून महिलांना 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज

एका महिलेला 1 लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं आणि 5-10 महिला एकत्र येऊन स्वत:चा व्यवसाय करू शकतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत चारही महामंडळाचे संचालक व संबंधित खात्याचे सचिव आणि अतिरिक्त सचिवांसोबत बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी तसे आदेशही दिले आहेत, अशी माहिती प्रवीण दरेकर यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. तसंच स्वयंपूनर्विकास हाऊसिंगचं ज्या पद्धतीने केलं, त्याच पद्धतीने मुंबईतील महिलांना या योजनेचा लाभ मिळेल. 12 ते 13 लाख लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला लाभार्थी असून 1 लाखांच्या आसपास मुंबई बँकेकडे सभासद आहेत, अशी माहिती त्यांन दिली.

Web Title: Mumbai bank give 1 lakh rupees loan to women with zero percent interest rate in ladki bahin yojana pravin darekar said

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2025 | 03:46 PM

Topics:  

  • Ladki Bahin Yojana
  • MLA Pravin Darekar
  • Mumbai Bank

संबंधित बातम्या

Ladki Bahin Yojana : धक्कादायक! ‘लाडक्या बहिणीं’चे संकेतस्थळ बंद, ग्रामीण भागात अडचणी
1

Ladki Bahin Yojana : धक्कादायक! ‘लाडक्या बहिणीं’चे संकेतस्थळ बंद, ग्रामीण भागात अडचणी

राज्यातील तब्बल 67 लाख लाडक्या बहिणींना धक्का; अनुदानाची रक्कम अद्याप नाहीच
2

राज्यातील तब्बल 67 लाख लाडक्या बहिणींना धक्का; अनुदानाची रक्कम अद्याप नाहीच

Ladki Bahin Yojana: दोन महिन्यांचा हप्ता अद्याप बाकी अन् त्यातच 47 हजार…; सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
3

Ladki Bahin Yojana: दोन महिन्यांचा हप्ता अद्याप बाकी अन् त्यातच 47 हजार…; सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.