
महिला प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, मुंबईत परिवहन विभागाची बाईक टॅक्सीला परवानगी (फोटो सौजन्य-X)
Mumbai Bike Taxis News in Marathi: मुंबईमध्ये दररोज दिसणारी तुफान गर्दी पाहता परिवहन विभागाकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. यामुळे मुंबईकरांचा प्रवासही जलद आणि स्वस्तात मस्त होणार आहे. यासाठी परिवहन विभागाने ओला आणि उबर नंतर आता बाईक टॅक्सी सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे ट्रॅफिकमध्ये अडकून पडण्यावर हा उत्तम पर्याय मुंबईकरांसाठी उपलब्ध झाला आहे.
वाहतूक सेवा वाढविण्यासाठी परिवहन विभागाने बाईक टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवासासाठी ही सुविधा दोन महिन्यांत सुरू केली जाईल. पण जर मुंबईत हा प्रयोग यशस्वी झाला तर ठाणे आणि इतर महानगरांमध्ये ही सुविधा सुरू होई शकते,अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
बाईक टॅक्सी सुरू करतांना महिला सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाणार आहे. बाईक चालकाला मागे प्रवासी बसवतांना बाईकच्या मधोमध पार्टीशन लावणे बंधनकारक असेल अशी अट ठेवली जाणार आहे. दरम्यान, एका किलोमीटरसाठी ३ रूपये बाईक टॅक्सीचं भाडं असणार आहे. तसेच बाईक टॅक्सीत GPS आवश्यक असून पाठी बसणाऱ्याला हेल्मेट बंधनकारक असणार आहे.
🗓 २८ जानेवारी २०२५ | 📍मंत्रालय, मुंबई “परिवहन व्यवस्थेत आधुनिकतेची वाटचाल! महाराष्ट्रातील परिवहन यंत्रणा अधिक सक्षम, सुसज्ज आणि आधुनिक करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. वॉटर टॅक्सी, रोप वे, पार्किंग प्लाझा यांसारख्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी या बैठकीत… pic.twitter.com/1oEfqcS784 — Pratap Baburao Sarnaik (@PratapSarnaik) January 29, 2025
बाईक टॅक्सी सुरू झाल्यास मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका तर होईलच, पण त्याचबरोबर मुंबईकरांच्या पैशांची सुद्धा बचत होणार आहे. कारण, बाईक टॅक्सीचे दर हे तुलनेने कमी असणार आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बाईक टॅक्सीमध्ये प्रती किलोमीटर 3 रुपये इतके भाडे आकारले जाते.
महाराष्ट्रातील परिवहन यंत्रणा अधिक सक्षम, सुसज्ज आणि आधुनिक करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. वॉटर टॅक्सी, रोप वे, पार्किंग प्लाझा यांसारख्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
परिवहन आयुक्त विवेक भीमनवार आणि इतर अधिकाऱ्यांना या प्रकल्पांच्या कार्यवाहीसाठी आवश्यक पावले उचलण्याबाबत मार्गदर्शन केले. या प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी समन्वय साधत राज्य सरकार सर्वोत्तम प्रयत्न करत आहे. नागरिकांना जागतिक दर्जाच्या परिवहन सुविधा उपलब्ध करून देणे ही आमची प्राथमिकता आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीला गती देणारे हे प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात येतील.