
'सत्या'च्या मोर्चाविरोधात मूक आंदोलन, विरोधकांच्या मतचोरीच्या आंदोलनाला भाजपाचं प्रत्युत्तर
BJP Mook Andolan News in Marathi : विरोधकांच्या सत्याच्या मोर्चा विरोधात सत्ताधारी भाजपनेही दंड थोपाटले आहे. आज मुंबईत भाजपकडून ‘मुक आंदोलन’ आयोजित करण्यात आले आहे. गिरगाव चौपाटीवरील टिळक उद्यानासमोर हे आंदोलन होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन यशस्वी होणार असल्याचे भाजपने स्पष्ट केलं आहे. महाविकास आघाडीच्या दुटप्पी धोरणांविरुद्ध असल्याचे स्पष्ट केले आहे.विरोधकांचा मोर्चा आणि भाजपचे आंदोलन या दोन्ही कार्यक्रमांमुळे मुंबईत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दोन्ही आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. वाहतुकीच्या दृष्टीनेही विशेष व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विरोधी पक्षांकडून भाजपावर सातत्याने मतचोरीचा आरोप केला जात आहे. मतांची चोरी करुन हे सरकार सत्तेत आल्याची टीका विरोधक करत आहे. याचपार्श्वभूमीवर शनिवारी 1 नोव्हेंबरला मुंबईत मतचोरीच्या विरोधात सर्वच विरोधी पक्ष एकत्र येत सत्याचा विराट मोर्चा काढत आहेत. दरम्यान, विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपा देखील सज्ज झाली आहे. विरोधकांच्या मतचोरीच्या आंदोलनाला भाजपा प्रत्युत्तर देणार असून, साधारण 12 ते 1 वाजण्याच्या दरम्यान भाजपाकडून ‘मूक आंदोलन’ केलं जाणार आहे.
विरोधकांच्या मतचोरीच्या आंदोलनाला भाजप प्रत्युत्तर देईल. भाजपचं प्रत्युत्तर म्हणून शनिवारी मूक आंदोलन करण्यात येत आहे. दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ मंदिरात या भागात भाजपचे मूक आंदोलन केले जाईल. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थित आंदोलन सुरु आहे. विरोधकांचा मोर्चा आणि भाजपाचे आंदोलन या दोन्ही कार्यक्रमांमुळे मुंबईत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दोन्ही आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. वाहतुकीच्या दृष्टीनेही विशेष व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, शनिवार, १ नोव्हेंबर रोजी सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन मतचोरीच्या निषेधाविरुद्ध मुंबई मोर्चा काढतील. खरे काय आणि खोटे काय हे लोकांना सांगण्यासाठी मोर्चा काढण्यात येत आहे. दुपारी १ वाजता फॅशन स्ट्रीट येथून मोर्चा सुरू होईल आणि मेट्रो सिनेमामार्गे म्युनिसिपल गेटपर्यंत जाईल, अशी माहिती शिवसेना नेते आणि आमदार अनिल परब यांनी दिली. मतचोरी बाबत आंदोलन पार पडल्यानंतर आम्ही पुढील दिशा जाहीर करणार आहोत. आयोगाकडे आम्ही केलेल्या मागण्यांबाबत आम्ही मोर्चात बोलू असे परब म्हणाले. 1 नोव्हेंबरच्या मोर्चानंतर अधिक तीव्रतेने या विरोधात शिवसेना उबाठा, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट व इतर विरोधी पक्ष या विरोधात एकत्र भूमिका जाहीर करणार आहेत. दरम्यान, या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपा ने देखील कंबर कसली असून मुंबईत मूक आंदोलन करणार आहे. सरकारच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजपच्यावतीनं हे आंदोलन करण्यात येणार आहे.
सांगली, मिरज, कुपवाड महापालिका निवडणुकीत भाजपने जिंकलेल्या 43 जागांवर आम्ही लढणार हे फिक्स आहे. पक्षात नव्याने आलेल्या आणि घटकपक्षातील उमेदवारांना हाच न्याय असेल. तेथे उमेदवार कोण द्यायचे, हा निर्णय सर्व्हेनंतर मेरिटवर होईल. उर्वरित जागांबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, निष्ठावंतांवर अन्याय होणार नाही, अशी भूमिका पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केली.