Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

TMC खासदाराने संसदेत ओढली ई-सिगरेट? भाजपने Video शेअर करत विचारला जाब

Kirti Azad E Cigarette: संसदेत ई-सिगरेट (Vaping) ओढल्याच्या आरोपावरून राजकारण तापले आहे. भाजप नेते अमित मालवीय यांनी टीएमसी खासदार कीर्ति आझाद यांचा व्हिडिओ शेअर करत गंभीर आरोप केले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 17, 2025 | 08:04 PM
TMC खासदाराने संसदेत ओढली ई-सिगरेट? (Photo Credit - X)

TMC खासदाराने संसदेत ओढली ई-सिगरेट? (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • संसदेत ई-सिगरेटचा धूर!
  • भाजपचा टीएमसी खासदारावर गंभीर आरोप
  • अमित मालवीय यांनी व्हिडिओ केला शेअर
E Cigarettes In Lok Sabha News Marathi: संसदेच्या सभागृहात ई-सिगरेट (Vaping) ओढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, यावरून आता जोरदार राजकीय युद्ध पेटले आहे. भारतीय जनता पक्षाने थेट तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदारावर याचे खापर फोडले असून एक व्हिडिओही जारी केला आहे.

कीर्ति आझाद यांच्यावर भाजपचा निशाणा

भाजपचे नेते अमित मालवीय यांनी त्यांच्या अधिकृत ‘X’ (ट्विटर) हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. मालवीय यांनी दावा केला की, संसदेत ई-सिगरेट ओढणारे दुसरे कोणी नसून टीएमसी खासदार कीर्ति आझाद आहेत.

मालवीय यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “अनुराग ठाकूर यांनी ज्या खासदारावर आरोप केला होता, ते कीर्ति आझाद आहेत. अशा लोकांसाठी नियम आणि कायद्याला काहीच अर्थ नाही. संसदेत बसलेले असताना हाताच्या तळव्यात ई-सिगरेट लपवण्याचे धाडस त्यांनी केले. धूम्रपान बेकायदेशीर नसेल, पण संसदेत त्याचा वापर पूर्णपणे अस्वीकार्य आहे. ममता बॅनर्जी यांनी आपल्या खासदाराच्या या वर्तणुकीवर स्पष्टीकरण द्यावे.”

The TMC MP accused by BJP MP Anurag Thakur of vaping inside Parliament is none other than Kirti Azad. For people like him, rules and laws clearly hold no meaning. Just imagine the audacity, hiding an e-cigarette in his palm while in the House! Smoking may not be illegal, but… pic.twitter.com/kZGnYcP0Iu — Amit Malviya (@amitmalviya) December 17, 2025

हे देखील वाचा: Most Expensive Cigarettes: कोणत्या देशात विकली जाते सर्वात महाग सिगारेट? किंमत ऐकून व्हाल आश्चर्यचकित

अनुराग ठाकूर यांची लेखी तक्रार

गेल्या आठवड्यात भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे या प्रकरणाची लेखी तक्रार केली होती. सभागृहाचे कामकाज सुरू असताना टीएमसीचे एक खासदार आपल्या जागेवर बसून उघडपणे इलेक्ट्रॉनिक सिगरेटचा वापर करत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले होते. अनेक खासदारांनी हे दृश्य पाहिले असून, ही घटना संसदीय मर्यादेचे उल्लंघन असल्याचे ठाकूर यांनी म्हटले होते.

‘व्हॅप’ किंवा ई-सिगरेट म्हणजे काय?

व्हॅप (Vape) हे बॅटरीवर चालणारे एक छोटे यंत्र आहे, ज्याचा वापर ई-सिगरेट किंवा इतर नशीले पदार्थ ओढण्यासाठी केला जातो. महत्त्वाचे म्हणजे, भारत सरकारने इलेक्ट्रॉनिक सिगरेटवर देशात पूर्णपणे बंदी घातली आहे. अशा परिस्थितीत संसदेत याचा वापर होणे हा केवळ शिस्तभंगाचा विषय नसून कायदेशीर गुन्हाही आहे.

हे देखील वाचा: पुरुषांपेक्षा महिलांवर धूम्रपानाचा घातक परिणाम, वंध्यत्व येण्याचा धोका; काय सांगतात तज्ज्ञ

Web Title: Did a tmc mp smoke an e cigarette in parliament bjp shares video and demands an explanation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 08:04 PM

Topics:  

  • BJP
  • Loksabha
  • smoking
  • TMC

संबंधित बातम्या

सत्ताधारी आणि विरोधक बनले कट्टर शत्रू? अध्यक्षांवरील अविश्वास प्रस्ताव याचाच प्रत्यय
1

सत्ताधारी आणि विरोधक बनले कट्टर शत्रू? अध्यक्षांवरील अविश्वास प्रस्ताव याचाच प्रत्यय

AAP vs BJP: हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांवर ‘आप’चा खळबळजनक आरोप; पंजाबमध्ये आमदार खरेदीसाठी सरकारी पैशांचा गैरवापर
2

AAP vs BJP: हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांवर ‘आप’चा खळबळजनक आरोप; पंजाबमध्ये आमदार खरेदीसाठी सरकारी पैशांचा गैरवापर

आम्ही सत्तेला लाथाडून आघाडी धर्म पाळला, पण ठाकरेंच्या शिवसेनेने…; हर्षवर्धन सपकाळांचा निशाणा
3

आम्ही सत्तेला लाथाडून आघाडी धर्म पाळला, पण ठाकरेंच्या शिवसेनेने…; हर्षवर्धन सपकाळांचा निशाणा

शिवणे, उत्तमनगर, कोंढवे धावडे अन् कोपरे येथील पाणीप्रश्न सुटणार! नगरसेवक सुभाष नाणेकर यांचं आयुक्तांना निवेदन
4

शिवणे, उत्तमनगर, कोंढवे धावडे अन् कोपरे येथील पाणीप्रश्न सुटणार! नगरसेवक सुभाष नाणेकर यांचं आयुक्तांना निवेदन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.