Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुझी अवस्थासुध्दा कोलकाता तरूणीसारखी… अल्पवयीन मुलाची महिला डॉक्टरला धमकी, मुंबईतील घटना

मुंबईतील मानखुर्द भागात एका अल्पवयीन मुलाने महिला डॉक्टरला धमकी दिल्याची घटना घडली आहे. तुझी अवस्था देखील कोलकाता डॉक्टरसारखी होईल, असं अल्पवयीन मुलाने महिला डॉक्टरला म्हटलं. डॉक्टर आणि अल्पवयीन मुलामध्ये दुचाकी पार्किंगवरून वाद झाला, त्यावेळी महिला डॉक्टरने अल्पवयीन मुलाला कानशिलात लगावली. याचा राग मनात ठेवत त्याने डॉक्टरला धमकी दिली.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 25, 2024 | 01:47 PM
तीन तोळ्यांची सोनसाखळी लंपास; सासरच्यांचा थेट जावयावर संशय, पोलिसांतही तक्रार

तीन तोळ्यांची सोनसाखळी लंपास; सासरच्यांचा थेट जावयावर संशय, पोलिसांतही तक्रार

Follow Us
Close
Follow Us:

मुंबईतील मानखुर्द परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मानखुर्द परिसरात एका अल्पवयीन मुलाने महिला डॉक्टरला धमकी दिल्याची घटना घडली आहे. तुझी अवस्था देखील कोलकाता डॉक्टरसारखी होईल, असं त्या अल्पवयीन मुलाने महिला डॉक्टरला म्हटलं होतं. याप्रकरणामुळे काही काळ परिसरात गोंधळ निर्माण झाला होता. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असल्याचं सांगितलं जात आहे. महिला डॉक्टर आणि अल्पवयीन मुलामध्ये दुचाकी पार्किंगवरून वाद झाला होता. यावेळी डॉक्टरने अल्पवयीन मुलाला कानशिलात लगावली. त्यानंतर तो मुलगा संतापला आणि कोलकाता प्रकरणाबाबत तू ऐकले आहेस, तुझ्यासोबतही असेच होईल, अशी धमकी त्याने डॉक्टरला दिली.

हेदेखील वाचा-राज ठाकरे उद्या बदलापूरकरांच्या भेटीला येणार; बदलापूरमधील घटनेबाबत नागरिकांशी संवाद साधणार 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, हे प्रकरण मुंबईतील मानखुर्द भागातील असून शनिवारी दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास एक महिला डॉक्टर तिच्या क्लिनिकमध्ये पोहोचली. क्लिनिकच्या बाहेर एक दुचाकी उभी होती, त्यामुळे डॉक्टरांना क्लिनिकचा दरवाजा उघडता आला नाही. त्यामुळे महिला डॉक्टरने बाईक भिंतीला लावली आणि तिचे क्लिनिक उघडले आणि रुग्णांना तपासायला सुरुवात केली. बाईक दुसऱ्या ठिकाणी पार्क केल्यामुळे अल्पवयीन मुलाला राग अनावर झाला आणि त्याने डॉक्टरला धमकी दिली.

या प्रकरणाबाबत महिला डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास एक मुलगा दवाखान्यात आला आणि शिवीगाळ करत माझी दुचाकी या बाजूला कोणी पार्क केली आहे, अशी विचारणा करू लागला. जेव्हा महिला डॉक्टरने हे कृत्य केल्याचे सांगितले. तेव्हा अल्पवयीन मुलाने डॉक्टरांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महिला डॉक्टरने मुलाला दोनदा कानशिलात लगावली. त्यानंतर तो मुलगा तेथून निघून गेला आणि काही वेळाने त्याच्या काही नातेवाईकांसह तेथे आला आणि पुन्हा शिवीगाळ करू लागला.

हेदेखील वाचा- ‘नो मीन्स नो’, अल्पवयीन मुलीने नकार दिल्यानंतर वारंवार प्रेम व्यक्त करणं लैंगिक छळासमान; मुंबई हायकोर्टाचा निर्णय

त्याने महिला डॉक्टरला छत्री फेकून मारली. यावेळी या मुलाने डॉक्टरांना धमकी दिली की, तुला कोलकातामधील घटना माहित आहे, तुझ्यासोबतही असेच वागले जाईल, तुला विवस्त्र करून तुझ्या दवाखान्याला आग लावली जाईल असे म्हणत त्या मुलाने आणि त्याच्या महिला नातेवाईकाने डॉक्टरला मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या प्रकरणाची माहिती देताना झोन 6 चे डीसीपी हेमराज राजपूत यांनी सांगितलं की, आम्ही पीडित महिला डॉक्टरांशी बोललो आहोत. डॉक्टर आणि अल्पवयीन मुलामध्ये दुचाकी पार्किंगवरून वाद झाला, त्यावेळी महिला डॉक्टरने अल्पवयीन मुलाला कानशिलात लगावली. त्यानंतर मुलगा त्याच्या नातेवाईकाला घेऊन आला होता. यावेळी त्याने डॉक्टरांना धमकी दिली आणि त्या मुलाने आणि त्याच्या महिला नातेवाईकाने डॉक्टरला मारहाण केली. या प्रकरणात एक अल्पवयीन मुलगा आणि तीन महिला आरोपी आहेत. या लोकांवर पोलीस कडक कारवाई करतील.

Web Title: Mumbai crime news minor boy threaten female doctor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2024 | 01:47 PM

Topics:  

  • Kolkata doctor case
  • Mumbai
  • Mumbai crime news

संबंधित बातम्या

Mumbai Crime: ‘डिलिव्हरी बॉय बनून घरात घुसला, चाकूचा धाक दाखवला अन्….’ अंधेरीत धक्कादायक घटना
1

Mumbai Crime: ‘डिलिव्हरी बॉय बनून घरात घुसला, चाकूचा धाक दाखवला अन्….’ अंधेरीत धक्कादायक घटना

Weather Update : मुंबईत प्रदूषित हवेवर ‘पावसाचा’ दिलासा, कसं असेल जानेवारीत हवामान? वाचा सविस्तर
2

Weather Update : मुंबईत प्रदूषित हवेवर ‘पावसाचा’ दिलासा, कसं असेल जानेवारीत हवामान? वाचा सविस्तर

पत्नी, भाऊ, वहिनी, मुलगा आणि सून सर्वांनाच मिळाली तिकीटं, बीएमसी निवडणुकीत “कुटुंबाला प्राधान्य” देणारे राजकारण समीकरणे बदलली?
3

पत्नी, भाऊ, वहिनी, मुलगा आणि सून सर्वांनाच मिळाली तिकीटं, बीएमसी निवडणुकीत “कुटुंबाला प्राधान्य” देणारे राजकारण समीकरणे बदलली?

आरोग्य विम्याचे कवच! राज्यात ३ कोटी ४४ लाख नागरिकांना मिळाले आयुष्मान कार्ड; मानधनातही वाढ
4

आरोग्य विम्याचे कवच! राज्यात ३ कोटी ४४ लाख नागरिकांना मिळाले आयुष्मान कार्ड; मानधनातही वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.