Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Dahi Handi 2026: दहीहंडीच्या जल्लोषात अपघातांची नोंद; मुंबईत 22 गोविंदा जखमी, एकावर उपचार सुरू

Mumbai Dahi Handi 2026: मुंबईत दहीहंडी उत्सवादरम्यान दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 22 गोविंदा जखमी झाल्याची माहिती बीएमसी आणि सरकारी रुग्णालयांकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. जखमींपैकी 21 गोविंदांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला असून एका गोविंदावर अद्याप उपचार सुरू आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 05, 2026 | 02:30 PM
दहीहंडीच्या जल्लोषात अपघातांची नोंद; मुंबईत 22 गोविंदा जखमी, एकावर उपचार सुरू

दहीहंडीच्या जल्लोषात अपघातांची नोंद; मुंबईत 22 गोविंदा जखमी, एकावर उपचार सुरू

Follow Us
Follow Us:
  • मुंबईत दहीहंडी उत्सवात दुपारी 12 वाजेपर्यंत 22 गोविंदा जखमी
  • एका जखमी गोविंदावर उपचार सुरू
  • 21 जखमी गोविंदांना मिळाला डिस्चार्ज
  • बीएमसी आणि सरकारी रुग्णालयांकडून जखमी गोविंदांची माहिती प्रसिद्ध
Mumbai Dahi Handi 2026: राज्यभर दहीहंडीचा जल्लोष सुरू असताना मुंबईतही विविध ठिकाणी मानाच्या दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मात्र या उत्सवादरम्यान (Mumbai Dahi Handi 2026) काही ठिकाणी मानवी मनोरे कोसळल्याने गोविंदांना दुखापती झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि सरकारी रुग्णालयांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, आज (5 सप्टेंबर) दुपारी 12 वाजेपर्यंत मुंबईत एकूण 22 गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

जखमींपैकी 21 गोविंदांना प्राथमिक उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एका जखमी गोविंदावर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. जखमींपैकी 21 गोविंदांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून, एका गोविंदावर उपचार सुरू आहेत.

Dahi Handi 2026 Jai Jawan: ‘1..2..3 नाही तर’, जय जवानचा 10 थरांचा निर्धार; जमलं तर 11 थरांसाठीही प्रयत्न, संदीप ढवळेंची मोठी घोषणा

प्रशासनाकडून काय व्यवस्था?

दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी शहरातील सुरक्षा व्यवस्था वाढवली होती. संवेदनशील आणि गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्याचबरोबर दहीहंडीच्या थरांवरून पडून जखमी होणाऱ्या गोविंदांवर तातडीने उपचार करता यावेत, यासाठी महापालिकेने रुग्णालयांमध्ये विशेष व्यवस्था केली होती. दहीहंडी उत्सवानिमित्त बीएमसीने मुंबईतील प्रमुख महापालिका आणि सरकारी रुग्णालयांमध्ये विशेष आरोग्य व्यवस्था उभी केली आहे.

उपनगरांतील 16 महापालिका रुग्णालयांसह सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालय, परळमधील केईएम रुग्णालय आणि मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालय सज्ज ठेवण्यात आले होते. जखमी गोविंदांच्या उपचारांसाठी या रुग्णालयांमध्ये 100 हून अधिक खाटांची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, दहीहंडी कार्यक्रमादरम्यान गोविंदांच्या सुरक्षिततेबरोबरच उत्सव संपल्यानंतर उभारण्यात आलेले तात्पुरते मंडप, स्टेज आणि इतर संरचना हटवतानाही पुरेशी खबरदारी घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन

उत्सवादरम्यान मानवी मनोरे उभारताना सुरक्षितता नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. हेल्मेट, सेफ्टी हार्नेस, संरक्षक जाळी आणि प्रशिक्षित पथकांचा वापर करण्यासह नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी सावधगिरी बाळगावी, असेही प्रशासनाने सांगितले आहे. दहीहंडी उत्सव सुरू असल्याने दिवसभरातील जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता असून, बीएमसीकडून वेळोवेळी अद्ययावत आरोग्य माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे.

Mumbai News: खाजगी रुग्णालय बिलांना लगाम कधी? ‘जनआरोग्य अभियाना’चा सवाल, उपचारांचे प्रमाणित दर निश्चित करण्याची मागणी

Web Title: Mumbai dahi handi 2026 22 govindas injured bmc government hospitals update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • BMC
  • Dahi Handi 2026
  • Mumbai

संबंधित बातम्या

Dombivali : नशामुक्ती, नारीशक्तीचा संदेश देत डोंबिवलीत ‘स्वराज्य काला महोत्सवा’चा दहीहंडी थरार; रवींद्र चव्हाणांची प्रमुख उपस्थिती
1

Dombivali : नशामुक्ती, नारीशक्तीचा संदेश देत डोंबिवलीत ‘स्वराज्य काला महोत्सवा’चा दहीहंडी थरार; रवींद्र चव्हाणांची प्रमुख उपस्थिती

Rain Update: गोविंदांच्या उत्साहात पावसाची भर! आज महाराष्ट्रात कुठे बरसणार सरी? जाणून घ्या हवामानाचा अंदाज
2

Rain Update: गोविंदांच्या उत्साहात पावसाची भर! आज महाराष्ट्रात कुठे बरसणार सरी? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

पुण्यात दहीहंडीसाठी उभारलेली लोखंडी कमान अंगावर कोसळली; 45 वर्षीय महिलेचा मृत्यू
3

पुण्यात दहीहंडीसाठी उभारलेली लोखंडी कमान अंगावर कोसळली; 45 वर्षीय महिलेचा मृत्यू

Dahi Handi 2026 Jai Jawan: ‘1..2..3 नाही तर’, जय जवानचा 10 थरांचा निर्धार; जमलं तर 11 थरांसाठीही प्रयत्न, संदीप ढवळेंची मोठी घोषणा
4

Dahi Handi 2026 Jai Jawan: ‘1..2..3 नाही तर’, जय जवानचा 10 थरांचा निर्धार; जमलं तर 11 थरांसाठीही प्रयत्न, संदीप ढवळेंची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.