Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Powai Lake Restoration: मुंबईची पाण्याची चिंता मिटणार? पवई तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी महापालिकेचा मोठा प्लॅन

Mumbai Powai Lake Restoration: मुंबईतील भविष्यातील पाणीटंचाईचा धोका लक्षात घेऊन महापालिकेने ऐतिहासिक पवई तलावाच्या पुनरुज्जीवनाची योजना हाती घेतली आहे. तलावातील गाळ काढणे, जलपर्णी हटवणे आणि पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी आधुनिक जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 18, 2026 | 12:43 PM
Mumbai Powai Lake Restoration (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Mumbai Powai Lake Restoration (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • पवई तलावाचे पुनरुज्जीवन
  • साठवण क्षमता 32.30% घटली
  • आधुनिक फिल्टर प्लांट
  • जलपर्णी हटवण्याचे काम

मुंबई :
मुंबईत पाण्याचा प्रश्न दरवर्षी मोठा होतोय. कधी कमी पाऊस पडतो, तर कधी एल निनोचा परिणाम होतो. त्यामुळे पुढे जाऊन मुंबईकरांना पाण्याचे मोठे संकट येऊ शकते, याची कल्पना महापालिकेला आली आहे. म्हणूनच आता महापालिकेने कंबर कसली आहे आणि एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईचा ऐतिहासिक पवई तलाव पुन्हा जिवंत करण्याचे काम हाती घेतले आहे. Mumbai Powai Lake Restoration:

या तलावाचे पाणी पिण्यायोग्य करण्याच्या हालचाली आता वेगाने सुरू झाल्या आहेत. लवकरच यासाठी एक सल्लागार नेमला जाणार आहे. तलावातील गाळ काढून तिथे एक आधुनिक फिल्टर प्लांट म्हणजे जलशुद्धीकरण केंद्र बांधण्याचा प्लॅन महापालिकेचा आहे.

पवई तलाव किती मोठा आहे?

पवई तलाव हा काही छोटा तलाव नाही. हा मुंबईचा खूप जुना आणि महत्वाचा तलाव आहे. जवळपास 210 हेक्टर म्हणजे 557 एकर परिसरात हा पसरला आहे. त्याचा गोलाकार परीघ 10.2 किलोमीटर इतका मोठा आहे. यात अब्जावधी लिटर पाणी साठवता येते. पण गेल्या अनेक वर्षांपासून या तलावाकडे दुर्लक्ष झाले.

तलावात मोठ्या प्रमाणात गाळ, माती, आणि जलपर्णी म्हणजे हिरवे गवत साचले आहे. शिवाय आजूबाजूचे सांडपाणी पण यात येते. त्यामुळे तलावाची पाणी साठवण्याची क्षमता खूपच कमी झाली आहे. सध्या या तलावाचे पाणी पिणे तर लांबच, साधे हातपाय धुण्यासाठी पण वापरता येत नाही. आता हा अनमोल ठेवा वाचवण्यासाठी महापालिकेने पावले उचलली आहेत. याबाबतचा प्रस्ताव लवकरच स्थायी समितीसमोर मांडला जाणार आहे.

तलावाची क्षमता 32 टक्क्यांनी घटली

नुकताच एक गाळ सर्वेक्षण अहवाल आला आहे, त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पवई तलावाची खरी पाणी साठवण क्षमता 5.455 दशलक्ष घनमीटर होती. पण आता ती फक्त 3.693 दशलक्ष घनमीटर राहिली आहे. म्हणजे तब्बल 32.30 टक्के क्षमता कमी झाली आहे. विचार करा, एक तृतीयांश तलाव फक्त गाळानेच भरला आहे.

सध्या या तलावात अंदाजे 5455 दशलक्ष लिटर पाणी आहे, पण ते पिण्यायोग्य नसल्यामुळे त्याचा वापर फक्त काही व्यावसायिक कामांसाठी होतो. जर हे पाणी साफ झाले तर मुंबईच्या पाणीपुरवठ्याला मोठा आधार मिळेल.

Panvel-Karjat Local Train Update: मुंबईकरांसाठी खुशखबर! पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर 99 टक्के पूर्ण; जाणून घ्या A to Z माहिती

महापालिका काय काम करत आहे?

पवई तलावाला त्याचे जुने वैभव मिळवून देण्यासाठी महापालिकेने अनेक कामे सुरू केली आहेत.पहिले काम म्हणजे जलपर्णी काढणे. तलावावर तरंगणारे ते हिरवे गवत काढण्यासाठी दोन आधुनिक हार्वेस्टर मशीन लावल्या आहेत.

त्या वेगाने काम करत आहेत.दुसरे काम म्हणजे गाळ काढणे. तलावातील गाळ कसा काढायचा, याची पाहणी करण्यासाठी ‘ग्रीन यात्रा’ या संस्थेला नेमले आहे. ते सगळा अभ्यास करून रिपोर्ट देतील.आणि तिसरे महत्वाचे काम म्हणजे पर्यावरण वाचवणे.

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात हवामानाचा मूड बदलणार! ‘या’ 7 जिल्ह्यांत पावसाचा इशारा

तलावात अनेक पक्षी, मासे आणि जीव आहेत. त्यांना जपण्यासाठी BNHS ची मदत घेणार आहे. त्यांच्यासाठी तलाव साफ होईल पण तिथली जैवविविधता पण टिकून राहील.एकंदरीत, पवई तलावाचा हा पुनरुज्जीवन प्रकल्प यशस्वी झाला तर मुंबईकरांना भविष्यात पाण्यासाठी भटकावे लागणार नाही. हा तलाव पुन्हा मुंबईच्या पिण्याच्या पाण्याचा मोठा स्रोत बनेल.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: पवई तलावाच्या पुनरुज्जीवनाचा उद्देश काय आहे?

    Ans: तलाव स्वच्छ करून त्याचे पाणी पिण्यायोग्य बनवणे.

  • Que: पवई तलाव किती क्षेत्रात पसरला आहे?

    Ans: सुमारे 210 हेक्टर म्हणजे 557 एकर परिसरात.

  • Que: तलावाची पाणी साठवण क्षमता किती घटली आहे?

    Ans: 32.30 टक्क्यांनी.

Web Title: Mumbai powai lake restoration water purification project rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 12:43 PM

Topics:  

  • BMC
  • Mumbai News
  • powai

संबंधित बातम्या

मुंबई पोलिसांची ड्रग्जविरोधात मोहीम; वांद्रे-खार-सांताक्रझसह अंधेरीत अनधिकृत बांधकामांवर हातोडा
1

मुंबई पोलिसांची ड्रग्जविरोधात मोहीम; वांद्रे-खार-सांताक्रझसह अंधेरीत अनधिकृत बांधकामांवर हातोडा

Mumbai News: गोवंडीचा RMC प्लाण्ट होणार बंद! सर्व पक्षांच्या १३ नगरसेवकांचा विरोध; प्रदूषणामुळे टीबी रुग्णांमध्ये वाढ
2

Mumbai News: गोवंडीचा RMC प्लाण्ट होणार बंद! सर्व पक्षांच्या १३ नगरसेवकांचा विरोध; प्रदूषणामुळे टीबी रुग्णांमध्ये वाढ

Sunday 1996 Marathi Movie Trailer Released:  प्रत्येक उत्तरातून उभा राहणार नवा प्रश्न! ‘संडे १९९६’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित
3

Sunday 1996 Marathi Movie Trailer Released: प्रत्येक उत्तरातून उभा राहणार नवा प्रश्न! ‘संडे १९९६’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित

BMC Notice to Ajay Devgn Juhu Bungalow: सिंघमच्याच बंगल्यावर BMC चा हातोडा! नेमकं काय घडलं? समोर आलं मोठं कारण
4

BMC Notice to Ajay Devgn Juhu Bungalow: सिंघमच्याच बंगल्यावर BMC चा हातोडा! नेमकं काय घडलं? समोर आलं मोठं कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.