Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Elephanta Boat Accident: समुद्रात बोट उलटली; उपमुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये; यंत्रणांना दिले ‘हे’ निर्देश

Eknath Shinde: समुद्रात उलटलेल्या बोटीचे नाव नीलकमल असे आहे. या बोटीत 80 प्रवासी असल्याचे समजते आहे. काही प्रवाशांचा शोध अत्यंत वेगाने घेतला जात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 18, 2024 | 07:23 PM
Mumbai Elephanta Boat Accident: समुद्रात बोट उलटली; उपमुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये; यंत्रणांना दिले 'हे' निर्देश

Mumbai Elephanta Boat Accident: समुद्रात बोट उलटली; उपमुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये; यंत्रणांना दिले 'हे' निर्देश

Follow Us
Close
Follow Us:

Eknath Shinde: मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी निलकमल नावाची बोट समुद्रात उलटली आहे. त्यानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. प्रवाशांनी भरलेली बोट समुद्रात उलटली. या घटनेत बोटीतील सर्व प्रवासी बुडाले. माहिती मिळताच मदत पथक दुसऱ्या बोटीतून घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरू केले. बोटीत 80 प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. बचावकार्य सुरू करण्यात आले. आतापर्यंत 77 प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. तर तीन प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या माहिती समोर येत आहे. तर मुख्यमंत्र्यांनी मदतीचे आश्वासन दिले आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करत बचावकार्याचा वेग वाढवण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबईतील दुर्घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवश्यक ती मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगड आणि मुंबई शहरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी समोरक करत आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. भारतीय नौदल, तटरक्षक दल, स्थानिक मच्छिमार यांच्या मदतीने प्रवाशांना बचावकार्यात वेग आणण्याबाबत निर्देश त्यांनी जिल्हाधिकारी आणि आवश्यक अधिकाऱ्याना दिले आहेत.  एलिफंटा येथे समुद्रात बुडालेल्या प्रवासी बोटीची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेगाडचे जिल्हाधिकारी आणि मुंबई शहरचे जिल्हाधिकारी यांच्या तातडीने संपर्क साधला. तसेच पोलीस उपायुक्त (बंदरे) यांच्याशी फोनवरून बोलून आवश्यक त्या सूचना केल्या आहेत.

दरम्यान आता या घटनेची शेकापचे नेते जयंत पाटील यांनी देखील पाहणी केली आहे. बचावकार्याला वेग आला आहे. दरम्यान आता हा अपघत कसा घडला याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. नेव्हीच्या बोटीने या प्रवासी बोटीला धडक दिल्याचे म्हटले जात आहे. मात्र नौदलाकडून याचे खंडन करण्यात आल्याचे समजते आहे. नौदल, तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने बचावकार्य केले जात आहे.

मुंबईत एलिफंटा परिसरात आज सायंकाळी प्रवासी बोट बुडाल्याची घटना घडली असून त्याबाबतच्या बचावकार्याची माहिती मुंबई शहर व रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली. नौदल, जेएनपीटी, तटरक्षक दल आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने बचाव कार्याला वेग देण्याचे निर्देश देत दुर्घटनाग्रस्त बोटीतील… — Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 18, 2024

समुद्रात उलटलेल्या बोटीचे नाव नीलकमल असे आहे. या बोटीत 80 प्रवासी असल्याचे समजते आहे. काही प्रवाशांचा शोध अत्यंत वेगाने घेतला जात आहे. हवामान निरभ्र असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक गेट वे ऑफ इंडियावर पोहोचले होते. यातील अनेक लोक बोटिंगसाठी समुद्रातही गेले होते. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, काही पर्यटक बोटीने एलिफंटाच्या दिशेने जात होते. त्यांची बोट किनारा सोडून सुमारे 50 मीटर आत गेल्यावर अचानक काहीतरी झाले आणि ती बुडू लागली. या अपघताची दृश्ये कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तसेच यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मदतीचे आश्वासन दिले आहे.

एका स्पीड बोटने या फेरीबोटीला धडक दिल्याचे सांगितले जात आहे. ही बोट कोस्ट गार्ड किंवा भारतीय नौदलाची बोट असल्याचे म्हटले जात आहे.  पोलीस आणि नौदल व इतर यंत्रणांकडून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. मात्र अंधार होत असल्याने बचावकार्य करण्यात अडचण येण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, माहिती मिळताच इतर अनेक बोटीतील मदत पथके घटनास्थळी पोहोचली असून प्रवाशांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

 

Web Title: Mumbai elephanta boat accident dcm eknath shinde give instructiosn to navy coast guard and all system

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2024 | 07:23 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Mumbai

संबंधित बातम्या

Mumbai Crime: ‘डिलिव्हरी बॉय बनून घरात घुसला, चाकूचा धाक दाखवला अन्….’ अंधेरीत धक्कादायक घटना
1

Mumbai Crime: ‘डिलिव्हरी बॉय बनून घरात घुसला, चाकूचा धाक दाखवला अन्….’ अंधेरीत धक्कादायक घटना

Maharashtra Politics: “महायुतीचाच विजय होणार, शिवसेनेचे ७ उमेदवार बिनविरोध”, शिवसेना प्रवक्त्या शायना एन.सी यांचे प्रतिपादन
2

Maharashtra Politics: “महायुतीचाच विजय होणार, शिवसेनेचे ७ उमेदवार बिनविरोध”, शिवसेना प्रवक्त्या शायना एन.सी यांचे प्रतिपादन

BMC Election 2026: शिंदेंच्या शिवसेनेत बंडखोरी, विभागप्रमुखांसह सुमारे 200 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
3

BMC Election 2026: शिंदेंच्या शिवसेनेत बंडखोरी, विभागप्रमुखांसह सुमारे 200 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

Weather Update : मुंबईत प्रदूषित हवेवर ‘पावसाचा’ दिलासा, कसं असेल जानेवारीत हवामान? वाचा सविस्तर
4

Weather Update : मुंबईत प्रदूषित हवेवर ‘पावसाचा’ दिलासा, कसं असेल जानेवारीत हवामान? वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.