'या' स्थानकांवर लोकल थांबणार नाही! काय आहे मध्य रेल्वेचा निर्णय? वाचा वेळापत्रक
Railway Megablock News in Marathi: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही रविवारी (31 ऑगस्ट) लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी आणि मुंबईचा राजा गणेशगल्ली यासारख्या प्रसिद्ध गणेश मंडळांना भेट देण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला तुमचे नियोजन बदलावे लागणार आहे. कारण मध्य रेल्वेने रविवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते विद्याविहार दरम्यानच्या धीम्या मार्गावर ब्लॉक जाहीर केला आहे. धीम्या मार्गावरील ब्लॉकमुळे लोकल गाड्या चिंचपोकळी आणि करी रोड स्थानकांवर थांबणार नाहीत. त्याचबरोबर पश्चिम रेल्वेने उत्सवानिमित्त रात्रीचा ब्लॉक जाहीर केला आहे.
रविवारी पाच दिवसांच्या गणेशोत्सवाचे विसर्जन आहे. उत्सवादरम्यान रविवारी सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशभक्तांची गर्दी होणार. मात्र रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे गणेश भक्तांना अनावश्यक त्रास सहन करावा लागेल. कारण उत्सवादरम्यान वाढत्या गर्दीमुळे लोकल गाड्या रद्द केल्या जातील. रविवारी सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत सीएसएमटी ते विद्याविहार स्लो अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११:१० ते पहाटे ४:१० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. पश्चिम रेल्वेने शनिवारी मध्यरात्रीनंतर दुपारी १२:३० ते रविवारी पहाटे ४ वाजेपर्यंत ब्लॉक जाहीर केला असल्याने, रविवारी पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक राहणार नाही.
मध्य रेल्वे
स्टेशन – सीएसएमटी ते विद्याविहार
मार्ग – अप आणि डाउन
वेळ – सकाळी १०:५५ ते दुपारी ३:५५
हार्बर रेल्वे
स्टेशन – कुर्ला ते वाशी
मार्ग – अप आणि डाउन
वेळ – सकाळी ११:१० ते पहाटे ४:१०
पश्चिम रेल्वे
स्टेशन – मुंबई सेंट्रल
मार्ग – सर्व मार्ग
वेळ – शनिवारी मध्यरात्री १२:३० ते रविवार पहाटे ४.ृ
शुक्रवारी सकाळी अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान एका मालगाडीच्या इंजिनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने बदलापूर आणि कर्जत दरम्यानची रेल्वे सेवा सुमारे एक तास उशिराने सुरू झाली. या विलंबामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागला. शुक्रवारी सकाळी ५.५२ वाजता अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान एका मालगाडीच्या इंजिनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. यानंतर, भिवपुरीहून दुसरे इंजिन मागवण्यात आले आणि मालगाडी कर्जतकडे रवाना करण्यात आली.